
Suagr Rate : राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाकडून यंदाच्या हंगामातील आकडेवारी जाहीर करण्यात आली आहे. मागील हंगामाच्या तुलनेत यंदा साखरेचे उत्पादन घटले आहे. एनएफसीएसएफने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, ३१ मार्च २०२५ पर्यंत, देशभरातील साखर कारखान्यांनी एकूण २६५३.२६ लाख टन ऊस गाळप केले आहे. ज्यामुळे २४८.५० लाख टन साखर उत्पादन झाले आहे. तर मागील हंगामात २०४ साखर कारखान्यांनी २९८१.०४ लाख टन ऊस गाळप केला होता. यामध्ये ३०२.५० लाख टन साखर उत्पादन झाले.
मागील वर्षीच्या तुलनेत अंतिम टप्प्यात ५४ लाख टन साखर कमी उत्पादीत झाली आहे. मार्च अखेर ४२० साखर कारखाने बंद झाले असून यामध्ये महाराष्टातील सर्वाधिक १९४ साखर कारखाने बंद झाले. यापाठोपाठ कर्नाटकातील सर्व ७२ तर उत्तरप्रदेशात ६५ कारखाने बंद झाले आहेत.
मार्च अखेर २४८ लाख टन साखरेची निर्मिती झाली. गेल्या वर्षी याच कालावधीत ३०२ लाख टन साखर तयार झाली होती. या कालावधीत २९८१ लाख टन उसाचे गाळप झाले. यंदा २६६३ लाख टन उसाचे गाळप झाले. महाराष्ट्र गेल्या वर्षीच्या तुलनेत २७ लाख टनांनी उत्पादन घटले आहे.
उत्तर प्रदेशही १० लाख टनांनी उत्पादनात घट झाली. या हंगामात उत्तरप्रदेशमध्ये सर्वाधिक ८७ लाख टन साखरेची निर्मिती झाली. तर महाराष्ट्रात ८० लाख टन साखर निर्मीती झाली. मागील वर्षी ५३५ कारखान्यांनी हंगाम सुरु केला होता. यंदा ५३३ साखर कारखान्यांना परवाना देण्यात आला होता. सध्या देशातील ११३ कारखाने सुरु आहेत. गेल्या वर्षी हीच संख्या २०४ इतकी होती.
गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा देशाचा साखर उतारा घटल्याने आकडेवारीवरून दिसून येते. गेल्या वर्षी या कालावधीत सरासरी साखर उतारा १०.१५ टक्के इतका होता. यंदा यात घसरण होवून तो ९.३७ टक्यावर आला आहे. प्रत्येक राज्यात सरासरी अर्ध्या ते एक टक्यांनी साखर उतारा घटला आहे. हंगामाची सध्याची स्थिती पाहता देशात गेल्या वर्षीच्या तुलनेत ५० लाख टन साखर कमी उत्पादित होईल असा अंदाज सहकारी साखर कारखाना महासंघाने व्यक्त केला आहे.
उत्तरप्रदेशमध्ये गेल्या हंगामाच्या तुलनेत १५ लाख, महाराष्ट्रात ३० लाख, तर कर्नाटकात १२ लाख टन साखरेची निर्मिती होईल असा अंदाज महासंघाने व्यक्त केला. यंदाच्या हंगामात महाराष्ट्रात फक्त ६ साखर कारखाने सुरु आहेत. कोल्हापूर विभाग आणि सोलापूर विभागाचा हंगाम संपुष्टात आला आहे. अन्य विभागाचाही गाळप अंतीम टप्प्यात आला आहे तर काही ठीकाणी १ किंवा २ साखर कारखाने सुरू आहेत.
तज्ज्ञांचे म्हणणे आहे की महाराष्ट्र, कर्नाटक आणि उत्तर प्रदेश या तीन प्रमुख उत्पादक राज्यांमध्ये गाळपात घट झाल्यामुळे या साखर उत्पादनात घट झाली आहे.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.