Sugarcane Crushing Season : सांगलीत गाळप, उत्पादन अन् उताराही घटला

Sugar Production : २०२४ च्या हंगामात जिल्ह्यात ८८ लाख ८३ हजार २४५ टन उसाचे गाळप करून एक कोटी ४१ हजार ८८६ क्विंटल साखर उत्पादन मिळाले होते. सरासरी निव्वळ साखर उतारा ११.३ टक्के होता.
Sugar Production
Sugar Production Agrowon
Published on
Updated on

Sangli News : जिल्ह्यातील १७ साखर कारखान्यांचा गळीत हंगाम नुकताच संपला. यंदा गाळप, उत्पादनासह उताराही घटला आहे. गत हंगामापेक्षा यंदा ऊस गाळप ११ लाख १६ हजार ८८१ टनांनी, तर साखर उत्पादनात १८ लाख ९५ हजार ३४६ क्विंटलही घट झाली आहे. साखर उताऱ्यात ०.७३ टक्क्याने घटला आहे.

२०२५ चा हंगामामध्ये १ लाख ३७ हजार हेक्टर ऊस क्षेत्र गाळपासाठी होते. यंदाच्या हंगामात १७ साखर कारखान्यांनी गाळप केले असून ७७ लाख ६६ हजार ३६३ टन उसाचे गाळप करून ८१ लाख ४६ हजार ५४० क्विंटल साखर उत्पादन मिळाले आहे. साखर उतारा १०.५७ टक्के आहे.

Sugar Production
Sugarcane Crushing Season : रावळगाव कारखान्याच्या गळीत हंगामाची सांगता

२०२४ च्या हंगामात जिल्ह्यात ८८ लाख ८३ हजार २४५ टन उसाचे गाळप करून एक कोटी ४१ हजार ८८६ क्विंटल साखर उत्पादन मिळाले होते. सरासरी निव्वळ साखर उतारा ११.३ टक्के होता. गत वर्षी जिल्ह्यातील शेवटच्या साखर कारखान्याचा हंगाम ३० मार्च २०२४ रोजी संपला होता.

गत वर्षीच्या तुलनेत यंदा ०.७३ टक्क्यांनी उतारा घटला आहे. चालू हंगामात जिल्ह्यातील साखर कारखाने विधानसभा निवडणुकीनंतर वेळाने सुरू झाले. कर्नाटकातील कारखान्यांनी जिल्ह्यातील कारखान्यांपेक्षा पंधरा दिवस लवकर गाळप सुरू केले. त्यामुळे सांगली जिल्ह्यातील सीमेवरील ऊस कर्नाटकात गाळपासाठी गेला.

Sugar Production
Sugarcane Crushing Season : मराठवाडा व खानदेशातील पाच जिल्ह्यांमध्ये ऊस गाळप पूर्ण

गत वर्षी जिल्ह्यातील शेवटचा कारखाना ३० मार्च २०२४ रोजी बंद झाला होता. यंदा १२ मार्चला म्हणजे किमान १८ दिवस लवकर हंगाम संपला आहे. सांगली जिल्ह्यातील साखर कारखाने उशिरा सुरू होऊनही यंदा १८ दिवस लवकर संपले. याचा अर्थ असा होतो की, किमान एक महिना कारखाने कमी चालले.

साखर कारखाना गाळप (टन) उत्पादन (क्विंटल) उतारा (टक्के)

श्री दत्त इंडिया ८४०७५८ ८,८८,२०० १०.५९

राजारामबापू युनिट, साखराळे ६,७३,४३३ ७,९२,२८० ११.७८

विश्‍वास, चिखली ४,४३,०१६ ५३२७३० १२.०१

हुतात्मा, वाळवा ४,७०,८५० ५,२३,४७५ १२.८५

राजारामबापू युनिट, वाटेगाव ३,९८,५९३ ५,०७,६०० १२.५

एसईझेड, तुरची ४१,३२० २२,८४० ७.४८

राजारामबापू युनिट, जत २,०५,३६५ २,२६,७०० १०.३३

सोनहिरा, वांगी ९५,६३१० ८७,६०६० ९.१२

क्रांतिअग्रणी, कुंडल ९,९१,२९१ १०,८५,५५० १२.१४

राजारामबापू युनिट, कारंदवाडी ३,००,२५५ ३,६८,००० १२.३

मोहनराव शिंदे, आरग ३,१७,९८५ ३,४५,५०० १०.९२

दालमिया, कोकरूड ४,५३,५७४ ५,५९,४३० १२.२

यशवंत शुगर, नागेवाडी १,६८,२१० १,९३,४५० ११.३३

रायगाव शुगर १,४०,६३० १,४३,१०० १०.७८

उदगिरी, खानापूर ४,९४,८४१ ३,५९,७०० ७.१७

सद्‌गुरू श्री श्री ४,८९,१४४ ३,६४,२५५ ७.३७

श्रीपती शुगर, डफळापूर ३,२०,७९० ३,५७,६७० ११.२४

एकूण ७७,०६,३६४ ८१,४६,५४० ११.२४

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com