Rain Crop Damage : तासाभरात पाऊस पुरतं वाटोळं करून गेला

Heavy Rain Crop Loss : अगदी तासाभरात नदीला एवढं पाणी आलं की पळताभुई थोडी झाली. पाण्याचा लोंढा शेतात, नदीजवळच्या घरात, जनावरांच्या गोठ्यात घुसला. जनावरे, शेळ्या, कोंबड्या वाहून गेल्या.
Rain Crop Damage
Rain Crop DamageAgrowon
Published on
Updated on

Ahilyanagar News : मंगळवारी दुपारी दीडच्या सुमारात चास, कामरगाव, अकोळनेर भागात काळकुट्ट अभाळ भरून आलतं. पण एवढा पाऊस पडेल अन् पुरतं वाटोळं करुन जाईल, असं वाटलं नाही. अगदी तासाभरात नदीला एवढं पाणी आलं की पळताभुई थोडी झाली. पाण्याचा लोंढा शेतात, नदीजवळच्या घरात, जनावरांच्या गोठ्यात घुसला.

जनावरे, शेळ्या, कोंबड्या वाहून गेल्या. तासाभराच्या पावसाने पुरतं वाटोळं करून टाकलं, अशी हतबलता येथील शेतकरी, कष्टकऱ्यानी व्यक्त केली. नुकसानीची दाहकता दाखवणारे खडकी, वाळकी, सारोळा कासार परिसरातील हे चित्र चार दिवसानंतरही बदलायला तयार नाही.

चास, अकोळनेर, सारोळा कासारकडून येणाऱ्या दोन नद्याचा अहिल्यानगर-दौंड रस्त्यावरील खडकी येथे संगमन होते. वरच्या बाजुच्या परिसरातील गावांत झालेल्या जोरदार पावसाने दोन्ही नद्याला पुर आला आणि खडकी व पुढे वाळकी परिसरात रौद्र रुप धारण केले.

Rain Crop Damage
Rain Crop Damage : सोलापूर जिल्ह्यात ३,७०० हेक्टरवरील पिके जमीनदोस्त; मोठे नुकसान

मंगळवारी (ता. २६) दुपारी नदीला आलेल्या पुराने तासाभरात साधारण पाच गावांत प्रचंड नुकसान केलेय. त्या दिवशी अहिल्यानगर, श्रीगोंदा, पारनेरमध्ये अन्य भागातील ४५ गावांना पावसाचा फका बसला, पण खडकी, वाळकी, अकोळनेर, सारोळ कासार, भोरवाडी आदी गावांत तास-दोन तासात कोट्यावधींची हानी झाली.

अनेक शेतकरी, कष्टकऱ्यांना बेघर केलय. खडकीकडून सारोळा कासारकडे जाणाऱ्या रस्त्यावर नदीपासून काही आंतरावर दीपक गंगाधर कोठुळे यांचे घर असून त्यांच्या कुटूंबातील दहा लोक पाण्यात अडकले होते. घराला पाण्याचा वेढा होता.

पाण्यात अडकलेल्यांना लष्कर, पोलीस आणि स्थानिकांनी वाचवले. आधीच पाऊस सुरू असल्याने बहुतांश लोक घरीच होते. अचानक आलेल्या पुराने दाणादाण उडाली. नदीकाठची जमीन खरडून गेली. फळबागा वाहून गेल्या. लाखो रुपयांचा चारा पुरात नाहीसा झाला.

Rain Crop Damage
Onion Crop Damage : लाखमोलाचा कांदा पावसामुळे मातीमोल

प्राथमिक नुकसानीचा अंदाज

५० पेक्षा अधिक छोटी-मोठी जनावरे, ५०० कोंबड्या, २००च्या जवळपास शेळ्या वाहून गेल्या. पंचनाम्यासह चारा वाहुन गेल्याने चारा वाटपाचे काम सुरू असल्याची पशुसंवर्धन उपायुक्‍त डॉ. सुनील तुंबारे यांचे पथक परिसरात ठाण मांडून.

२ हजार ९०० हेक्टर क्षेत्रातील उन्हाळी बाजरी, कांदा, मिरची, फ्लॉवर, संत्रा, डाळिंब, शेवंती, भुईमूग या पिकांचे नुकसान झाले आहे. चाळीत साठवून ठेवलेला सुमारे १२ हजार टनापेक्षा अधिक कांदा वाहून गेल्याचा अंदाज. ४ हजार १७६ शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान.

अहिल्यानगर तालुक्यातील सर्वाधिक फटका बसलेल्या गावांत १२४ पेक्षा अधिक घरांची पडझड झाली असून अनेक कुटुंब बेघर झाली आहेत.

खडकीसह परिसरातील संत्रा, मोसंबीच्या बागांचे प्रचंड नुकसान. नदीकाठापासून अंदाज चारशे मीटरपर्यंत २०० एकरापेक्षा अधिक हेक्टर शेतजमिनीतील माती वाहून गेली आहे

अहिल्यानगर तालुक्यातील खडकी, खडकी, वाळकी, सारोळाकासार, अकोळनेर परिसरात शेतीचे अतीवृष्टी, पुराने मोठे नुकसान झाले असून काही भागात जमीनी वाहुन गेल्या आहेत. शासनाच्या आदेशानुसार पंचनामे करण्यासाठी कृषी विभागाकडून काम सुरु आहे. दोन दिवसात नुकसानीची निश्चित आकडेवारी समोर येईल.
सुधाकर बोराळे, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी, अहिल्यानगर

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com