Onion Crop Damage : लाखमोलाचा कांदा पावसामुळे मातीमोल

Rain Crop Damage : अवकाळी पावसामुळे निमोणे (ता. शिरूर) येथील प्रज्वल काळे या शेतकऱ्याच्या चार एकरातील सुमारे ८०० पिशवी कांद्याचे नुकसान झाले
Onion Crop Damage
Onion Crop Damage Agrowon
Published on
Updated on

Pune News : अवकाळी पावसामुळे निमोणे (ता. शिरूर) येथील प्रज्वल काळे या शेतकऱ्याच्या चार एकरातील सुमारे ८०० पिशवी कांद्याचे नुकसान झाले.‌ चार महिने अथक कष्टाच्या जोरावर जिवापाड जपलेला लाखमोलाचा कांदा, चार दिवसांच्या अवकाळी पावसाने मातीमोल केला.

प्रज्वल काळे या शेतकऱ्याने आपल्या चार एकर शेतात कांद्याची लागवड केली होती. मशागत, बि बियाणे, खते, औषध फवारणी, लागवड, खुरपणी, काढणी असा सुमारे दीड लाख रुपये खर्च आला.

कांदा काढणीच्या दरम्यान हवामान खात्याने पावसाचा अंदाज दिल्याने काळे कुटुंबायांनी शेतातच कांदा एका जागी जमा करून ठेवण्याचे व पाऊस उघडल्यावर कांदा चाळीत कांदा साठवण्याचे ठरवले.

Onion Crop Damage
Onion Crop Damage : मराठवाड्यातील कांद्यावर पावसाचा आघात

मात्र, अवकाळी पावसाचा मुक्काम व पावसाचा जोरही वाढल्याने कांदा जमा केलेल्या शेताचेच शेततळ्याचे रूपांतर झाले आणि सर्व कांदा पीक पाण्याखाली गेले.

Onion Crop Damage
Rain Crop Damage : अहिल्यानगर जिल्ह्यात महिनाभरात तेरा हजार हेक्टरवर पीक नुकसान
पावसामुळे झालेल्या नुकसानीमुळे आम्ही हतबल झालो आहे. त्यात दुर्दैव म्हणजे महसूल आणि कृषी विभागाच्या वतीने अद्याप ही पिकाचा पंचनामा सुध्दा झाला नाही. संबंधित विभागाच्या प्रशासनाने थेट शेताच्या बांधावर जाऊन पाहणी केल्यास त्यांना नुकसानीचा अंदाज येईल. माझ्यासारखे असे अनेक नुकसानग्रस्त शेतकरी आहेत, त्यांच्यापर्यंत प्रशासन पोहचलेच नाही.
प्रज्वल काळे, नुकसानग्रस्त शेतकरी, निमोणे
नुकसानग्रस्त शेतमालाचा पंचनामा करण्यासाठी शासनाने दिलेल्या अटी शर्तीची अंमलबजावणी करून आम्ही पंचनामा करत आहोत. संबंधित नुकसानग्रस्त काळे यांच्या पिकाचा पंचनामाही करण्यात येईल.
- सुनील पडवळ. तलाठी. निमोणे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com