Jalna Rain Crop Damage : जालना जिल्ह्यात पूर्वमोसमी पावसाने उडवली दाणादाण

Jalna Weather Update : पाऊस लवकर सुरू झाल्याने शेतीची मशागतीची कामे लांबली आहे. पावसाने छोटे-मोठे तलाव भरले असून मोठे तलाव अर्धवर आले आहेत.
Jalna Rain Crop Damage
Jalna Rain Crop Damageagrowon
Published on
Updated on

Jalna Rain : मागील आठवड्यापासून जिल्‍ह्यात अवकाळी पाऊस सुरूच आहे. बुधवारी (ता.२१) रात्रीही जोरदार पावसाने हजेरी लावली. यामुळे नद्या- नाल्यांना पूर आला असून पाझर तलावामध्ये पाणी साचले आहे. दरम्यान, पावसात वादळ असल्याने अनेक ठिकाणी विजेच्या खांबांसह झाडे पडली. तसेच जाफराबाद व बदनापूरमध्ये शाळेवरील पत्रेही उडाले. यासोबतच फळबागांचे नुकसान झाले असून अनेक गावे रात्रभर अंधारात बुडाली होती. यामुळे गुरुवारी (ता.२२) काही ठिकाणी पाणीपुरवठाही विस्कळित झाला.

अंबड शहरात रस्त्यांची दुरवस्था

अंबड शहरातील रस्त्यांची पावसामुळे प्रचंड दुरवस्था झाली आहे. रस्त्यावर जिकडे तिकडे खड्डेच खड्डे पडले आहेत. यामुळे रस्त्यावर पाण्याचे पाट व नाल्याचे पाणी वाहत असल्याने दुर्गंधी पसरत आहे. तसेच, दुसरीकडे भुयारी नाल्यावर अनेक ठिकाणी बनविलेल्या चेंबरवरील ढापे गायब झाले तर काहींची फूटतूट झाली आहे. नूतन वसाहत येथे मोठा जीवघेणा खड्डा पडल्याने अपघाताला कारणीभूत ठरत आहे. यावर ढापा टाकण्यासाठी पालिका प्रशासनाने पुढाकार घेऊन नागरिकांना सुविधा उपलब्ध करून देणे गरजेचे आहे.

Jalna Rain Crop Damage
Chhatrapati Sambhaji Maharaj Birth Anniversary: स्वराज्याचे शूर रक्षक छत्रपती संभाजी महाराज; चला जाणून घेऊया त्यांचे शौर्य!

हसनाबादमध्ये जोरदार सरी

परिसराला बुधवारी (ता.२१) रात्री नऊ ते पहाटे तीनपर्यंत जोरदार पावसाने झोडपून काढले. या पावसामुळे संपूर्ण गारवा निर्माण झाला आहे. तसेच यावर्षी पाऊस लवकर सुरू झाल्याने शेतीची मशागतीची कामे लांबली आहे. पावसाने छोटे-मोठे तलाव भरले असून मोठे तलाव अर्धवर आले आहेत. त्यामुळे जनावराचा पाण्याचा प्रश्न दूर झाला आहे. तसेच या पावसाने येथील गिरिजा नदीस भर उन्हाळ्यात पाणी आल्याने गिरिजा नदीकाठावरील ग्रामस्थांची पाण्याटंचाई दूर झाली. गत दोन दिवसांत विद्युत मंडळाचे खांब पडल्याने हसनाबाद व परिसरात वीस तास वीज गायब होती. त्यामुळे एक रात्र ग्रामस्थांना उकाडा सहन करावा लागला.

घनसावंगीत सात जनावरे दगावली

घनसावंगी तालुक्यात मागील तीन ते चार दिवसांपासून झालेल्या अवकाळी पावसामुळे वीज पडून एक व्यक्ती जखमी झाला, तर चार म्हशी, एक लहान जनावर, दोन मोठी जनावरे अशी एकूण सात जनावरे दगावली, तर जनावरांच्या एक गोठ्याचे नुकसान झाले.  काही ठिकाणी घरांचीही पडझड झाली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com