Success Story : संकटांना ना कधी हरले मी...

Inspirational Farming Story : मोठी दु:खे होती. मात्र मुलांकडे पाहून विमलबाईंनी मोठ्या हिमतीनं, कष्टानं पिकांची विविधता जपत आज शेतीचा व्याप यशस्वीपणे सांभाळत आहेत.
Vimalbai Shelke
Vimalbai ShelkeAgrowon
Published on
Updated on

Mix Cropping : पूर्वहंगामी उसासाठी संतुलित अन्नद्रव्य व्यवस्थापनपती व्यवसायांच्या निमित्ताने बाहेरगावी व व्यस्त असताना वडाळा (जि. छत्रपती संभाजीनगर) येथील विमलबाई शेळके घरच्या ५५ शेतीचा पसारा समर्थपणे सांभाळायच्या. मध्यंतरी जावई हृदयविकाराच्या धक्‍क्‍याने गेले. चार वर्षांतच पतीचेही निधन झाले.

दु:खे मोठी होती. मात्र मुलांकडे पाहून विमलबाई सावरल्या. खचून न जाता मोठ्या हिमतीनं, कष्टानं पिकांची विविधता जपत विमलबाई आज शेतीचा व्याप यशस्वीपणे व धडाडीने पुढे नेटाने सांभाळत आहेत. वाढवत आहेत.

('ॲग्रोवन'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात सिल्लोड तालुक्‍यातील खेळणा नदी खोऱ्यातलं वडाळा गाव. येथील रावसाहेब शेळके यांना तीन भाऊ, ते चौथे. त्यांचा विवाह ३३ वर्षांपूर्वी मामाच्या मुलीशी म्हणजे विमलबाई यांच्याशी झाला. वाटण्या झाल्यानंतर प्रत्येक भावाच्या वाट्याला वडिलोपार्जित साधारण अडीच एकर जमीन आली.

त्यात जगणं मुश्‍कील होत असल्यानं रावसाहेबांनी आपली जमीन भावंडांना दिली. पत्नीला गावीच ठेवत कुटुंबाच्या जगण्याचा आधार शोधण्यासाठी पुणे जिल्ह्याची वाट धरली.अधून मधून ते सुट्टीला गावी यायचे. या संघर्षात जगण्यासाठी अनेक बाका प्रसंग आल्याच्या आठवणी विमलबाई सांगतात.

बोअर घेण्याच्या व्यवसायात यश

हॉटेलमधील उरलेली भजी खाऊन दिवस काढलेल्या रावसाहेबांनी पै-पै जमविलेल्या पैशांमधून विहिरीत आडवे बोअर घेण्याचे यंत्र घेतले. त्या वेळी खऱ्या अर्थाने शेतीला आधार मिळाला. व्यवसाय वाढवत आणखी चार पाच यंत्रे घेत गावशिवारातील दीडशे जणांच्या हाताला काम दिले.

पुणे, फलटण परिसरात सुमारे १५ वर्षे हा व्यवसाय केला. गावी स्वकमाईतून थोडी थोडी करीत २२ एकर शेती घेतली. त्या शेतीची सर्व जबाबदारी विमलबाई सांभाळायच्या.

Vimalbai Shelke
E Peek Pahani : खरिपातील ४ लाख २२ हजांरावर हेक्टरची ई-पीक पेरा नोंदणी

गावाकडे मुकादम

सन १९९७ मध्ये बोअर संबंधीचा व्यवसाय बंद करून रावसाहेब गावी परतले. त्या वेळी शेतीच्या जबाबदारीसह अंजू व दैवशाला या दोन मुलींचा सांभाळ करण्यात विमलबाई व्यस्त होत्या. त्या वेळी रावसाहेबांनी शेतीसोबत कारखान्यांना मजूर पुरविण्यासाठी मुकादम म्हणून काम सुरू केले. या व्यवसायातही चांगलं यश मिळालं.

विमलबाईच्या साथीमुळेच त्यांनी सन दोनहजार पर्यंत जमिनीचे क्षेत्र ४५ एकरांपर्यंत नेले. कोणतं पीक, कसं आणि किती घ्यायचं हे रावसाहेब सांगायचे आणि विमलबाईंनी तसं व्यवस्थापन करायच्या. दोन तलावांवरून पाइपलाइन व पाच विहिरींच्या साथीने शेती सिंचनाखाली आणली. सन २००१ मध्ये शेळके दांपत्याच्या संसारवेलीवर आकाश नावाचं फूल उमललं. कालांतराने दोन्ही मुलींचे विवाह झाले.

चार वर्षांच्या अंतराने दोन आघात

सन २०१७ मध्ये मोठी मुलगी अंजूचे पती हृदयविकाराच्या धक्‍क्‍याने गेले. पोटची मुलगी आणि तिच्या चिमुकल्या मुलांवर आलेलं संकट सहन करणं शेळके दांपत्यासाठी कठीण होत. पण मुलीला खचू न देण्यासाठी त्यातून सावरणं आवश्‍यक होतं. दरम्यान, कोरोना काळ आला. आणि दुसऱ्या लाटेत रावसाहेबांचं निधन झालं. सर्वांत मोठा आधार गेल्यानं विमलबाई पोरक्‍या झाल्या. चार वर्षांत दोन आघात पचवणे ही छोटी बाब नव्हती.

झाल्या माय अन् बापही

रावसाहेब गेले त्या वेळी मुलगा आकाश ‘सिव्हिल इंजिनिअरिंग’च्या पहिल्या वर्षाला होता. नात्यागोत्यातील सर्वांनी मुलांकडे बघा आणि स्वत:ला सावरा असा धीर दिला. पती गेले त्या वर्षी खचून गेलेल्या विमलबाईंनी कशीबशी आपली शेती इतरांच्या सहकार्याने कसली. बटाईने ती करण्यास देण्याचा विचारही आला. परंतु या आधी तुम्हीच सगळी शेती पाहायचा, तुमचं मनही त्यात रमेल असा सल्ला नातेवाइकांनी दिला. मग विमलबाईं नव्या उमेदीने कामाला लागल्या.

Vimalbai Shelke
Fertilizer Use : ‘सीआयसीआर’चे कपाशीसाठी खत वापराचे ‘सॉफ्टवेअर’

पिकांची विविधता जपली

विमलबाईंना शेतीतला किमान २५ वर्षांचा अनुभव तयार झाला आहे. घरची ५५ एकर शेती करताना मुलाच्या (आकाश) त्या माय आणि बापही झाल्या. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर मुलगाही शेतीत आईचा आधार झाला आहे. कपाशी १२ एकर आहे. दोन-तीन एकरांत पॉली मल्चिंगवर मिरची आहे. त्याचं एकरी २० टनांपर्यंत उत्पादन घेतलं आहे.

दहा एकर मका, २ ते ३ एकर आले, सोयाबीन ६ एकर, गहू ८ एकर, हरभरा पाच एकर अशी विविधता जपली आहे. पतीचा विरह सहन करत पद्धतशीर नियोजनातून मोठ्या कष्टानं विमलबाईं शेतीला आकार देत आहेत. मल्चिंगवरील मिरचीच्या जागी मका घेतला आहे. फळबाग तज्ज्ञ व व्याही डॉ. भगवानराव कापसे यांच्या मार्गदर्शनाखाली केसर आंबा लागवडीचा मनोदय आहे.

Vimalbai Shelke
Sugarcane Fertilizer Management : पूर्वहंगामी उसासाठी संतुलित अन्नद्रव्य व्यवस्थापन

विमलबाईंचं शेतीतलं नियोजन

लागवड, मशागतीपासून निंदणी, खुरपणी, वेचणी, सोंगणी, पीक काढणी अशा सर्व कामांत विमलबाई कुशल आहेत. पहाटे पाचला त्यांचा दिवस सुरू होतो. घरची कामे सांभाळून त्या शेतीतील मजूर व्यवस्थापन व अन्य कामे पाहतात. अलीकडेच सून हाताखाली आली आहे.

मुलाच्या मदतीने शेतीमाल विक्रीची जबाबदारी विमलबाई पाहतात. कापूस, सोयाबीन किंवा अन्य शेतीमालासाठी व्यापारी जागेवर येण्याची सोय केली आहे. दोन एकरांत मिरचीतून काही लाख रुपये मिळवले. विहिरीवर सौर पंपाची सोय आहे. बांधावर सागाची पाचशे झाडे, पेरू व आंबा लागवड आहे. सुमारे २५ ते ३० एकर क्षेत्र ठिबक सिंचनाखाली आणले आहे. डॉ. कापसे यांच्या माध्यमातून केनियन शिष्टमंडळाने त्यांच्या शेतीला अलीकडेच भेट दिली आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com