Health Department
Health DepartmentAgrowon

Health Department : देशाच्या विकासात आरोग्य विभागाचे भरीव योगदान

Tanaji Sawant : येत्या काळातही आरोग्य विभाग देशाच्या विकासात भरीव योगदान देण्यास सज्ज असल्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री डॉ. तानाजी सावंत यांनी सांगितले.

Pandharpur News : राज्याच्या आरोग्य विभागाने कोरोना काळात चांगले काम केले आहे. चांगल्या कामाची देशासह संपूर्ण जगाने दखल घेतली आहे. आरोग्य विभागाने माता सुरक्षा घर सुरक्षा अभियान, सुदृढ बालक अभियान, आरोग्य तरुणाईचे वैभव महाराष्ट्राचे हे उपक्रम यशस्वी ठरले आहेत. त्यामुळे येत्या काळातही आरोग्य विभाग देशाच्या विकासात भरीव योगदान देण्यास सज्ज असल्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री डॉ. तानाजी सावंत यांनी सांगितले.

पंढरपूर उपजिल्हा रुग्णालयाच्या १०० वरून २०० बेड विस्तारीकरण कामाचे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री डॉ. सावंत यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले. या वेळी आरोग्य सेवा उपसंचालक डॉ. राधाकिशन पवार, राज्य आरोग्य शिक्षणचे उपसंचालक डॉ. कैलास बाविस्कर, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुहास माने, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संतोष नवले, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. एकनाथ बोधले व वैद्यकीय अधीक्षक महेश सुडके, जिल्हा शल्यचित्सक कार्यालयाचे डॉ. श्रीकांत कुलकर्णी, प्रा. शिवाजी सावंत यांच्यासह इतर मान्यवर पदाधिकारी उपस्थित होते.

Health Department
Agriculture Irrigation : वंचित १५०० हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येणार : कदम

आरोग्य मंत्री डॉ. सावंत म्हणाले, की उपजिल्हा रुगणालय येथे १०० बेडच्या ठिकाणी २०० बेडचे विस्तारीकरण करण्यात येत आहे. याकरिता १३ कोटी ७० लाख रुपये निधी खर्च केला जाणार आहे, हे काम दीड वर्षात पूर्ण केले जाणार आहे. येथे बेडची संख्या वाढल्यावर रुग्णांना उपचार करणे सोपे जाणार आहे.

Health Department
Crop Insurance : शेतकऱ्यांचा संताप, विमा भरलेल्याना फक्त २५% अग्रीम रक्कम

आरोग्य विभागातील समावेशन, भरती, बदली प्रक्रिया उपक्रम पारदर्शीपणे राबवला आहे. आरोग्य विभागाने माता सुरक्षा घर सुरक्षा अभियान राबवत ४ कोटी ९२ लाख मातांचे सर्वेक्षण केले. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. आरोग्य तरुणाईचे वैभव महाराष्ट्राचे हे अभियान प्रत्येक शहरात राबवले.

१८ वर्षांवरील सुमारे पावणे चार कोटी नागरिकांची तपासणी केली. या प्रसंगी कुपोषित माता बालक यांना प्रोटीनचे वाटप सावंत यांच्या हस्ते करण्यात आले. प्रास्ताविक रुगणालयाचे वैद्यकीय अधीक्षक महेश सुडके यांनी केले. डॉ. राधाकिशन पवार यांनी आभार मानले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon
agrowon.esakal.com