Aashti Irrigation Scheme : ‘आष्टी योजने’च्या तिसऱ्या टप्प्यासाठी प्रस्ताव सादर करा

Ashti Upsa Irrigation Scheme : मोहोळ तालुक्यातील ‘आष्टी उपसा सिंचन योजना टप्पा क्रमांक तीन’ या २३० कोटी रुपयांच्या योजनेचा प्रस्ताव तातडीने सादर करण्याची सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली आहे.
Ajit Pawar
Ajit PawarAgrowon
Published on
Updated on

Solapur News : मोहोळ तालुक्यातील ‘आष्टी उपसा सिंचन योजना टप्पा क्रमांक तीन’ या २३० कोटी रुपयांच्या योजनेचा प्रस्ताव तातडीने सादर करण्याची सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जलसंपदा विभागाचे पुणे येथील अधीक्षक अभियंता धुमाळ यांना दिल्या आहेत. त्यामुळे या योजनेचे काम लवकरच मार्गी लागण्याची चिन्हे आहेत.

आमदार यशवंत माने, माजी आमदार राजन पाटील यांनी उपमुख्यमंत्री पवार यांची पुणे येथे नुकतीच भेट घेतली. त्या वेळी ही सूचना उपमुख्यमंत्री पवार यांनी दिल्या. राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष प्रकाश चवरे या वेळी उपस्थित होते. या संदर्भात माहिती देताना माजी आमदार पाटील म्हणाले, की मोहोळ तालुक्यातील अनगर व परिसरातील गावांना कायम पाण्याचा दुष्काळ आहे.

Ajit Pawar
Irrigation Scheme : ‘उपसा सिंचन’साठी एकतपूर, शिवणे येथे ड्रोन सर्वेक्षण

वेळ प्रसंगी येथील शेतकऱ्यांना व सर्वसामान्य नागरिकांना पावसाळ्यात ही पिण्याच्या पाण्यासाठी वणवण करावी लागते. शेतीचा विषय तर लांबच. या गावांना जवळून कुठूनही जलवाहिन्या टाकून पाणी आणण्याची सुविधा नाही. यावर पर्याय म्हणून माजी आमदार पाटील यांनी अनगर व नऊ गावे उपसा सिंचन योजनेचा प्रस्ताव तयार केला.

Ajit Pawar
Agriculture Irrigation Subsidy : तुषार ठिबकचे १६ कोटींचे अनुदान रखडले

तो शासन दरबारी दाखल ही केला. त्या योजनेचा सर्वे करण्याचा आदेश शासनाने दिला होता, त्या प्रमाणे एका संस्थेने सर्व्हे ही केला. हा प्रस्ताव सध्या ‘एसएलटीसी’ या मुख्य विभागाकडे आहे. दरम्यान ‘अनगर व नऊ गावे उपसा सिंचन योजने’चे नामकरण करून शासनाने ते ‘आष्टी उपसा सिंचन योजना टप्पा क्रमांक तीन’ असे केले आहे, असे ते म्हणाले.

...या गावांना होणार लाभ

या योजनेसाठी आष्टी तलावातून पाणी उचलले जाणार आहे. जलवाहिन्या टाकून ते पाणी देवडीच्या उंच माळरानावर आणले जाणार असून, त्या ठिकाणी मुख्य चेंबर असणार आहे. त्यानंतर तेथून प्रत्येक गावाच्या क्षेत्रानुसार व्हॉल्व्हद्वारे पाण्याचे वितरण केले जाणार आहे. या प्रकल्पामध्ये देवडी, वाफळे, खंडोबाचीवाडी, नालबंद वाडी, कोंबडवाडी, कुरणवाडी, हिवरे, वडाचीवाडी, अनगर या गावांचा समावेश आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com