Irrigation Scheme : ‘उपसा सिंचन’साठी एकतपूर, शिवणे येथे ड्रोन सर्वेक्षण

Drone Survey : गेल्या २५ वर्षांपासून बासनात गुंडाळलेली सांगोला उपसा सिंचन योजना सातत्याने पाठपुरावा करून, योजनेला नव्याने मंजुरी मिळवून घेतली आहे.
Drone Survey
Drone SurveyAgrowon
Published on
Updated on

Sangola News : स्व. बाळासाहेब ठाकरे उपसा सिंचन प्रकल्पात नव्याने समावेश झालेल्या सांगोला तालुक्यातील शिवणे व एखतपूर गावात ड्रोन सर्वेक्षणाचा प्रारंभ आमदार शहाजी पाटील व माजी आमदार दीपक साळुंखे यांच्या हस्ते नुकताच करण्यात आला. या सिंचन योजनेतून ३९ हजार एकर क्षेत्राला पाण्याचा लाभ होणार आहे.

पाटील म्हणाले, ‘‘गेल्या २५ वर्षांपासून बासनात गुंडाळलेली सांगोला उपसा सिंचन योजना सातत्याने पाठपुरावा करून, योजनेला नव्याने मंजुरी मिळवून घेतली आहे. तसेच वंचित असणाऱ्या १२ गावांचा त्यात समावेश केला. त्याचा लाभ ३९ हजार एकर क्षेत्राला होणार आहे. स्व. बाळासाहेब ठाकरे उपसा सिंचन प्रकल्प असे नाव या प्रकल्पाला देण्यात आले असून, ८८३ कोटी ७८ लाख रुपयांच्या खर्चास मंत्रिमंडळाची प्रशासकीय मान्यताही मिळाली आहे.

Drone Survey
Godavari Irrigation Scheme : किमान शंभर कोटींचे पॅकेज द्या

या गावातील शेतकऱ्यांच्या दृष्टीने हा मोठा निर्णय आहे. त्यांचे स्वप्न पूर्ण होत आहे, याचा आनंद आहे.’’ साळुंखे म्हणाले, ‘‘तालुक्याच्या विकासासाठी मी व बापू नेहमीच कटिबद्ध असणार आहोत.

या अगोदर तालुक्यातील जनतेला दिलेली आश्‍वासने आम्ही पाळण्याचा प्रयत्न करीत आहोत. जनतेला दिलेल्या शब्दातून आम्ही कधीही मागे हटणार नाही. तालुक्याच्या विकासात कधीही राजकारण करणार नाही.’’

Drone Survey
Wadaj Irrigation Scheme : ‘वडज’ सिंचन योजनेसाठी ३५ कोटी ५० लाखांचा निधी

या वेळी शिवसेना तालुकाप्रमुख दादासाहेब लवटे, माजी पंचायत समिती सदस्य सुभाष इंगोले, सरपंच दादासो घाडगे, शंकर जाधव, विजय इंगोले, महादेव शिंदे, प्रवीण नवले उपस्थित होते.

स्व. बाळासाहेब ठाकरे उपसा सिंचन प्रकल्पातून सांगोला तालुक्यातील लक्ष्मीनगर, अचकदाणी, बागलवाडी, सोनलवाडी, अजनाळे, वाकी शिवणे, नरळेवाडी, य. मंगेवाडी, बंडगरवाडी, चिकमहूद, कटफळ, खवासपूर, जुनी लोटेवाडी, नवी लोटेवाडी व इटकी या गावांचा समावेश होता. त्यामध्ये एखतपूर, शिवणेचा नव्याने समावेश केला.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com