Agriculture Meet: उपकृषी अधिकारी संघटनेचा लातूरला विभागीय मेळावा

Agriculture Association: महाराष्ट्र राज्य उप कृषी अधिकारी संघटनेच्या राज्य कार्यकारिणीची बैठक व लातूर विभागाच्या वतीने रविवारी (ता. ३) येथे आयोजित विभागीय मेळाव्याला मोठा प्रतिसाद मिळाला.
Agriculture Meet
Agriculture MeetAgrowon
Published on
Updated on

Latur News: महाराष्ट्र राज्य उप कृषी अधिकारी संघटनेच्या राज्य कार्यकारिणीची बैठक व लातूर विभागाच्या वतीने रविवारी (ता. ३) येथे आयोजित विभागीय मेळाव्याला मोठा प्रतिसाद मिळाला. विभागातील जिल्ह्यांतून मोठ्या संख्येने उपकृषी अधिकारी मेळाव्याला उपस्थित होते. 

संघटनेचे प्रदेशाध्यक्ष संजय पाटील (सोलापूर), सरचिटणीस विक्रांत परमार (बुलडाणा), उपाध्यक्ष बाळासाहेब पाटील (सांगली), सहसचिव विजय पत्रे (गडचिरोली), राधाकृष्ण कारले (छत्रपती संभाजीनगर), राज्य कार्यकारिणी सदस्य अनंत देशमुख (अकोला), किरण देसले (जळगाव), दत्ता रामरूपे (नांदेड), विभागीय अध्यक्ष सूर्यकांत लोखंडे, गुणवंत ढोकणे, बाळासाहेब भोईटे, जयेश बोर्डे यांची उपस्थिती होती.

Agriculture Meet
Agriculture Review Meeting: खरीप तयारीचा मुख्यमंत्री बुधवारी आढावा घेणार

लातूर विभागीय अध्यक्ष सूर्यकांत लोखंडे यांनी संघटना बळकटीकरणासाठी एकत्रित राहण्याची गरज स्पष्ट केली. धाराशिवचे विनोद माळी, वैभव लेणेकर, हिंगोलीचे प्रमोद माने, परभणीचे बलभीम आवटे, अनुरथ पुंडगे, लातूरचे योगेश मूळजे यांनी मनोगत व्यक्त केले.

Agriculture Meet
G-20 Agriculture Meeting : कृषी क्षेत्रातील समस्यांवरील चर्चेसाठी हैद्राबाद येथे तीन दिवसीय बैठकीचं आयोजन 

प्रदेश कोषाध्यक्ष नितीन शिंदे यांनी वेतनश्रेणी सुधारणा, श्री. भोईटे यांनी प्रक्षेत्रावरील कामकाज सुधारणा, लेखा आणि आस्थापना विषयक कार्यपद्धती, बोर्डे यांनी कामाची गुणवत्ता व सातत्य, सहसचिव विजय पत्रे यांनी संघटना सक्षमीकरण, उपाध्यक्ष पाटील यांनी संघटनात्मक बांधणी, सरचिटणीस परमार यांनी आकृतिबंध व संघटना नोंदणीबाबत मार्गदर्शन केले.

प्रदेशाध्यक्ष पाटील यांनी संघटनेला गत वैभव प्राप्त करून देण्यासाठी निर्भीडपणे आणि प्रामाणिकपणे काम करण्याचे आवाहन केले. बुलडाणा जिल्हाध्यक्ष धनंजय सोनुने, यवतमाळ प्रतिनिधी निळकंठ घोडके, सातारा जिल्हाध्यक्ष विनोद पुजारी, नांदेड जिल्हाध्यक्ष विजयानंद भोसले, धाराशिव जिल्हाध्यक्ष उमेश पोतदार, हिंगोली जिल्हाध्यक्ष नंदू वाईकर, परभणी जिल्हाध्यक्ष प्रशांत देवकर उपस्थित होते.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com