Team Agrowon
यंदा जी-२० चं अध्यक्ष पदाची जबाबदारी भारताकडे आहे. या निमित्तानं देशभरात विविध कार्यक्रमाचं आयोजन करण्यात येतं आहे.
आज हैद्राबाद येथे जी-२० च्या कृषी क्षेत्रात काम करणाऱ्या सदस्य देशांच्या गटाची तीन दिवसीय (१५ ते १७ जून) बैठक सुरू झाली आहे.
या बैठकीसाठी विविध देशातील २०० हून अधिक प्रतिनिधी उपस्थित आहेत. या बैठकीत प्रामुख्याने कृषी क्षेत्रातील विविध विषयांवर चर्चा केली जाणार आहे.
देशाची अन्नसुरक्षा आणि पोषणयुक्त आहार यावर भारताने विशेष लक्ष केंद्रित केलं आहे. तसेच ग्रीन एनर्जी, ईको फ्रेंडली अॅग्रीकल्चर, अॅग्रीकल्चर डिजिटालझेशन, आणि मूल्यसाखळी निर्मिती या बाबि अजेंडावर आहेत.
या बैठकीच्या उद्घाटनासाठी केंद्रीय कृषीमंत्री नरेंद्र तोमर सिंग उपस्थित होते. तोमर म्हणाले, "माझा विश्वास आहे की, या बैठकीतून 'एक पृथ्वी एक कुटूंब आणि एक भविष्य' या ध्येयवादाचा वसा जी-२० च्या या बैठकीत सहभागी झालेली देश घेतील."
दरम्यान, या बैठकीमध्ये चौधरी यांनी सकाळी विविध प्रकारच्या ७१ शेती संबंधित स्टॉलचं प्रदर्शन आयोजित केलं होतं. ज्यामध्ये टाकाऊपासून टिकाऊ, पीक संरक्षण, मूल्यसाखळी, तसेच विविध प्रदर्शन करण्यात आले.