Agriculture Internship: कृषी विभागात विद्यार्थी करणार आंतरवासिता

Maharashtra Agri Students Opportunity: कृषी शिक्षण अधिक व्यावहारिक बनवण्यासाठी राज्यातील कृषी आणि अकृषी महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांना मंत्रालय ते गावपातळीवर इंटर्नशिपची (आंतरवासिता) संधी देण्यात येणार आहे.
Agriculture Internship
Agriculture InternshipAgrowon
Published on
Updated on

Mumbai News: कृषी विभागाच्या अधिपत्याखालील कृषी, अकृषी आणि खासगी विद्यापीठांतील महाविद्यालये आणि शिक्षण संस्थांमधील विद्यार्थ्यांना आता मंत्रालयापासून गावपातळीपर्यंत आंतरवासिता करता येणार आहे. चार ते सहा महिन्यांपर्यंत आंतरवासिता उपक्रम पूर्ण करता येणार असून दररोज किमान दोन तास काम करण्याचा पर्याय विद्यार्थ्यांना उपलब्ध असेल.

या आंतरवासितेसाठी कोणत्याही प्रकारचा मोबदला दिला जाणार नाही, असेही शासन आदेशात स्पष्ट केले आहे. बदलती परिस्थिती आणि हवामान बदलाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना अनेक जोखिमींना सामोरे जावे लागते. त्यामुळे शेतकऱ्यांपर्यंत नवीन संशोधन पोहोचवणे, उच्च तंत्रज्ञान सुविधा उपलब्ध करून देणे, कृषी विषयक सल्ला सेवा आणि अद्ययावत माहिती उपलब्ध व्हावी यासाठी आंतरवासिता उपक्रमाचा निर्णय घेण्यात आला आहे.

Agriculture Internship
Agriculture University Funds: कृषी विद्यापीठांच्या निधी प्रस्तावांना सरसकट मंजुरी नाही

नव्या शैक्षणिक धोरणानुसार अभ्यासक्रमामध्ये आंतरवासिता हा उपक्रमही समाविष्ट करण्यात आला आहे. त्याअनुषंगाने उच्च व तंत्र शिक्षण विभागाने विद्यार्थ्यांना आंतरवासिता उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी केली होती. तसेच त्यासाठी मार्गदर्शक तत्वेही उपलब्ध करून दिली होती. त्यानुसार कृषी विभागाअंतर्गत गाव पातळीपासून मंत्रालय पातळीपर्यंत विविध कार्यालयांमध्ये आंतरसासिता उपक्रम उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

असे असतील स्तर

- राज्य स्तरावरील कार्यालये

- कृषी विभाग, मंत्रालय

- कृषी आयुक्तालय, पुणे

- नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प, मुंबई

- बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय आणि ग्रामीण परिवर्तन प्रकल्प, पुणे

Agriculture Internship
Agriculture Department : जळगावात कृषी विभागात नव्या नियुक्त्या; मोहीम अधिकाऱ्यांची बदली

- महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळ, अकोला

- वसंतराव नाईक कृषी विस्तार व्यवस्थापन प्रशिक्षण संस्था, नागपूर

- महाराष्ट्र कृषी औद्योगिक विकास महामंडळ, मुंबई

- महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषद, पुणे

विभाग स्तर

- विभागीय कृषी सहसंचालक कार्यालय, (ठाणे, पुणे, कोल्हापूर, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, लातूर, अमरावती, नागपूर)

- प्रादेशिक कृषी विस्तार व्यवस्थापन प्रशिक्षण संस्था (खोपोली, पुणे, कोल्हापूर, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, अमरावती, नागपूर)

- डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली

- महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी, अहिल्यानगर

- वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी

- डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला

जिल्हा स्तर

- जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालय

- प्रकल्प संचालक आत्मा कार्यालय

- कृषी विकास अधिकारी, जिल्हा परिषद

- विविध प्रयोगशाळा (माती, पाणी परीक्षण, बियाणे, डीएनए फिगर प्रिटिंग, खते, कीडनाशके उर्वरित अंश तपासणी)

‘एआयसीटीई’ पोर्टलवर अर्ज

आंतरवासिता करण्यासाठी विद्यार्थ्यांना एआयसीटीई या पोर्टलवर अर्ज करावा लागणार आहे. हे अर्ज मान्यतेचे अधिकार कृषी विभागातील विविध स्तरावरील प्रमुखांना राहतील. तालुका स्तरावरील अर्जांसाठी मान्यतेचे अधिकार तालुका कृषी अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com