
Jalgaon News : जिल्ह्यात ऐन खरिपात बदल्यांचा हंगाम सुरू झाला आहे. यातच काही रिक्त जागांवर नव्या अधिकाऱ्यांची नियुक्तीदेखील झाली आहे. परंतु काही प्रमुख पदे रिक्त असून, त्या जागांवर नवे अधिकारी केव्हा नियुक्त होतील, याची प्रतीक्षादेखील आहे.
कृषी विभागात बोदवड, भडगाव व धरणगाव येथे नवे तालुका कृषी अधिकारी नियुक्त करण्यात आले आहेत. या तिन्ही जागांवर काही महिन्यांपासून नव्या अधिकाऱ्यांच्या नियुक्तीची प्रतीक्षा होती. ही प्रतीक्षा संपली आहे.
हे नवे अधिकारी केव्हा रुजू होतात, याकडे लक्ष होते. जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कुर्बान तडवी हेदेखील रजेवर होते. त्यांचा कार्यभार कृषी विकास अधिकारी पद्मनाभ म्हस्के यांच्याकडे होता. तडवी हे सोमवारी (ता.२) रुजू झाल्याची माहिती मिळाली.
‘झेडपी’तही बदल्या..
जिल्हा परिषदेच्या कृषी विभागातही प्रमुख अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्या आहेत. त्यात मोहीम अधिकारी विजय पवार यांची बदली झाली आहे. जिल्हा कृषी अधिकारी (विशेष घटक योजना) कोकाटे यांचीही बदली झाली आहे. कोकाटे यांच्या जागी नाशिकमधील मयुरी झोरे यांची नियुक्ती झाली आहे. तर पवार यांच्या जागी पेठ (जि.नाशिक) येथील तालुका कृषी अधिकारी अविनाश खैरनार यांची नियुक्ती झाली आहे.
प्रमुख पदे रिक्त
नव्या अधिकाऱ्यांची तालुका स्तरावर नियुक्ती झाली आहे. परंतु जिल्हास्तरावर कृषी अधीक्षक कार्यालयात कृषी उपसंचालक हे पद रिक्तच आहे. तसेच तंत्र अधिकाऱ्यांची पदेही रिक्त आहेत. जिल्ह्यात १५ तालुके आहेत. खरिपात सुमारे आठ लाख किंवा सात लाख ७० हजार हेक्टरवर विविध पिके असतात. केळी, पपई, भाजीपाला पिकांचे मोठे प्रयोग, लागवडी जिल्ह्यात होत आहेत. या स्थितीत प्रमुख पदे रिक्त असू नयेत, अशी अपेक्षा शेतकऱ्यांत आहे.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.