Soybean Production : राहुरी कृषी विद्यापीठ वाढविणार सोयाबीनचे उत्पादन ः आमदार पाटील

Agriculture AI : जिल्ह्यातील शंभर सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांच्या शिवारात स्मार्ट ‘पीआयएस’ तंत्रज्ञानाच्या माध्यमातून कृत्रिम बुद्धिमत्ता अर्थात ‘एआय’चा वापर करण्यात येणार आहे.
Soybean Sowing
Soybean SowingAgrowon
Published on
Updated on

Dharashiv News : जिल्ह्यातील शंभर सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांच्या शिवारात स्मार्ट ‘पीआयएस’ तंत्रज्ञानाच्या माध्यमातून कृत्रिम बुद्धिमत्ता अर्थात ‘एआय’चा वापर करण्यात येणार आहे. त्यासाठी राहुरीच्या कृषी विद्यापीठाकडून शेतकऱ्यांना पहिल्या टप्प्यात प्रशिक्षण देण्यात येणार आहे. सोमवारी (ता. २६) जिल्ह्यातील शेतकरी राहुरी विद्यापीठात अभ्यास दौऱ्यावर जात आहेत.

कृषी क्षेत्राला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देणे ही काळाची गरज आहे. आगामी काळात कृत्रिम बुद्धिमत्ता, ड्रोन आणि रोबोटिक्ससारख्या तंत्रज्ञानाच्या प्रभावी वापरातून शेती उत्पादन आणि उत्पन्न वाढीसाठी हा महत्त्वपूर्ण प्रकल्प हाती घेतला आहे. त्याला राहुरी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. शरद गडाख हे सकारात्मक असल्याची माहिती आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी दिली.

महात्मा फुले कृषी विद्यापीठाला आमदार पाटील यांनी नुकतीच भेट दिली. महाराष्ट्र इन्स्टिट्यूशन फॉर ट्रान्सफॉर्मेशन (मित्र) या राज्यशासनाला आर्थिक व धोरणात्मक दिशा देणाऱ्या संस्थेचे उपाध्यक्ष दिलेल्या भेटीदरम्यान त्यांनी विद्यापीठातील विविध प्रकल्प व प्रयोगशाळांचा आढावा घेत शास्त्रज्ञांशी संवादही साधला.

Soybean Sowing
Ai in Agriculture: केळीसाठी ‘एआय’चा वापर महत्त्वाचा

विद्यापीठाने तंत्रज्ञानावर मोलाचे काम केले आहे. हे तंत्रज्ञान शेतकऱ्यांच्या शिवारात प्रत्यक्षात उतरवण्यासाठी धोरणात्मक प्रयत्न आवश्यक आहेत. विद्यापीठाने विकसित केलेल्या ‘स्मार्ट पी. आय. एस.’ सेन्सर बेस सिंचन तंत्रज्ञानाचा वापर जिल्ह्यात यशस्वीपणे करण्याचा काटेकोर प्रयत्न करीत असल्याचेही आमदार पाटील यांनी सांगितले.

विद्यापीठातील सेंटर ऑफ एक्सलन्सअंतर्गत कृषी फवारणी ड्रोन प्रयोगशाळा, हायपरस्पेक्ट्रल इमेजींग प्रयोगशाळा, रोबोटिक्स प्रयोगशाळा, फुले स्मार्ट हवामान केंद्र, ऑटो पी.आय.एस. सिंचन प्रणाली आदींची माहिती आमदार पाटील यांनी जाणून घेतली.

Soybean Sowing
Ai Pest Control: कीड नियंत्रणामध्ये ‘एआय’ तंत्रज्ञानाचा वापर

उत्पन्न वाढीसाठी ‘एआय’चा पर्याय

‘एआय’ तंत्राद्वारे पिकांमध्ये अचानक होणारे बदल, खतांची उपलब्ध व आवश्यक मात्रा, पाण्याचे प्रमाण, हायपर स्पेक्ट्रल कॅमेऱ्याच्या मदतीने रोगकिडीचा होत असलेला व संभाव्य प्रादुर्भाव या साऱ्या माहितीचे संकलन होऊन पिके अधिक कार्यक्षम व उत्पादनक्षम करण्यासाठी शेतकऱ्यांना मार्गदर्शन होते.

जमिनीच्या वरचा भाग आपण आपल्या डोळ्यांनी पाहतो, मात्र जमिनीखालच्या भौतिक व रासायनिक बदलांची माहिती वारंवार व तातडीने देऊन त्या ठिकाणी होत असलेल्या भविष्यात पिकांच्या येऊ घातलेल्या अडचणींवर वेळीच उपाय शोधता येणार आहे. त्यामुळे उत्पादन आणि उत्पन्न दोन्हींत कमालीची वाढ अपेक्षित असल्याचे आमदार पाटील यांनी सांगितले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com