Sericulture : रेशीम शेतीत सातत्य ठेवत साधली आर्थिक प्रगती

Silk Farming : सन २०१६ मध्ये त्यांनी रेशीम शेतीला सुरवात केली. त्यानंतर आजगायत आठ वर्षांचे सातत्य ठेवत टप्प्याटप्प्याने त्यात प्रगतीच साधली.
Sericulture
Sericulture Agrowon
Published on
Updated on

Agriculture Success Story : सोलापूर जिल्ह्यात पंढरपूर- शेटफळ रस्त्यावर पंढरपूरपासून १०-१२ किलोमीटरवर बाभळगाव हे सुमारे चारहजार लोकसंख्येचे गाव आहे. भीमा नदीच्या पाणलोट क्षेत्रात असल्याने या भागात सर्वाधिक ऊसशेती व त्यानंतर फळे- भाजीपाला पिके होतात.

गावात अण्णासाहेब भारत माळी यांची केवळ अडीच एकर शेती आहे. वयाच्या पंचविशीत असलेल्या अण्णासाहेबांचे १० वीपर्यंत शिक्षण झाले आहे. त्यानंतर त्यांना शेतीतच उतरावे लागले.

त्याला कारणही तसेच घडले. कांद्याच्या ट्रॉलीसोबत जात असताना जिवावर बेतणाऱ्या अपघाताला वडिलांना सामोरे जावे लागले. त्यामुळे शेती कऱणे त्यांना अवघड होऊन ती जबाबदारी अण्णासाहेबांना आपल्या खांद्यावर घ्यावी लागली.

मिळाला रेशीमशेतीचा मार्ग

शेतीच्या पदार्पणात अण्णासाहेबांनी ज्वारी, गहू, हरभरा अशी पारंपरिक पिके, तसेच मोठ्या उत्साहाने ऊस, डाळिंब अशी पिके घेण्यासही सुरवात केली. पण त्यातून अर्थकारण सक्षम होत नव्हते. त्यावेळी गावातील काही शेतकरी रेशीमशेतीत सक्रिय होते. त्याचे अर्थकारण माहीत करून हा पर्याय आपणही वापरून पाहावा असे अण्णासाहेबांना वाटले. धाडस केले. निर्णय पक्का झाला.सन २०१६ च्या सुमारास रेशीमशेतीला सुरवात झाली.

Sericulture
Sericulture Farming : रेशीम शेतीने दिला युवकांना रोजगार

रेशीमशेतीतील `मैत्री`

रेशीम शेतीत एकट्याने उतरण्यापेक्षा लिंगराज माळी आणि अण्णासो चव्हाण या गावातील आपल्याशेतकरी मित्रांनाही त्यांनी रेशीम शेतीत सोबत घेतले. मग त्यातील तंत्रज्ञान, अडचणी, मार्केट या मुद्यांवर तिघांमध्ये सातत्याने चिंतन होऊ लागले. त्यातून अडचणींवर मार्ग निघू लागला.

सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे या मित्रांनी भंडीशेगाव (ता.पंढरपूर) येथील प्रगतिशील रेशीम उत्पादक हणमंत सांगोलकर यांच्या युनिटला भेट दिली. तिघाही मित्रांनी दोन महिने येथे राबून प्रत्यक्ष कामाचा अनुभव घेतला. तुती लागवडीपासून, त्याचे व्यवस्थापन ते रेशीम कीटक संगोपन, कोष निर्मिती अशा प्रत्येक टप्प्यावरील बारकावे समजावून घेतले. या क्षेत्रातील अनुभवी मार्गदर्शक डॅा. संतोष थिटे (अनगर) यांचेही मोलाचे मार्गदर्शन मिळाले.

Sericulture
Sericulture : सांगलीतील शेतकऱ्यांचा रेशीम शेतीकडे कल

ववस्थापनातील ठळक बाबी

  • सुरवातीला रोपे आणून प्रत्येकी सव्वा एकरांत दोन प्लॅाटमध्ये तुतीची पाच बाय दोन फूट अंतरावरलागवड. आजही संपूर्ण अडीच एकरांत लागवड. उर्वरित अर्ध्या एकरांत घर, शेड, विहीर आदी बाबी.

  • तुतीची शास्त्रोक्त पद्धतीने छाटणी. जमिनीलगत होते कापणी. त्यामुळे सकस आणि भरपूर पाला मिळतो असा अनुभव.

  • नव्याने बहार धरण्याआधी दरवर्षी एकरी दोन ट्रॅाली शेणखताचा वापर.

  • सुरवातीला दररोज अर्धा तास, त्यानंतर एक ते दोन तास याप्रमाणे वाफसा पाहून पाणी नियोजन.

  • रेशीम कीटक संगोपनासाठी ७० बाय २७ फूट आकाराचे शेड.

  • चॅाकी अवस्थेत कीटकांची घेतात विशेष काळजी.

  • वर्षभर घेतात सुमारे नऊ बॅचेस. प्रति बॅच २५० ते ३०० अंडीपुंजांची.

  • त्यापासून २२५ ते २५० किलोपर्यंत किंवा प्रति १०० अंडीपुंजांमागे ८० ते ९० किलो रेशीमकोष उत्पादन.

  • सकाळी आणि संध्याकाळी अशा दोन वेळेस पाला देण्यात येतो.

  • एकाचवेळी एकसमान कोष उत्पादन मिळावे यासाठी योग्य काळजी. .

  • कोष काढणी पूर्ण झाल्यानंतर पुढील बॅचसाठी संगोपनगृहाची साफसफाई, निर्जंतुकीकरण.

रामनगर मार्केटला विक्री

अण्णासाहेब सांगतात की आमचा सुमारे पाच रेशीम उत्पादकांचा गावातील गट आहे. त्यामुळे सर्वांचा माल एकाचवेळी कर्नाटकातील रामनगर येथे घेऊन जाणे सोपे पडते. एका ट्रीपमध्ये सुमारे एक टनांच्या आसपास माल असतो.

पंढरपूर ते सोलापूर रेल्वे स्टेशन व तेथून संध्याकाळी रेल्वे निघूनती सकाळी इच्छित स्थळी पोचते. कोरोनानंतरच्या काळात रेशीम कोषांना अधिक दर मिळाले. काहीवेळा ते प्रति किलो कमाल ८०० रुपयांपर्यंतचाही मिळाले. अलीकडील काळात किमान दर ४५० रुपये व त्यापुढे मिळतो.

सध्या ५७५ ते ६०० रुपये दर सुरू आहे. प्रति बॅच सुमारे २५ हजार रुपये खर्च होतो. तर प्रति बॅच सुमारे ४० ते ५० टक्के नफा मिळतो. वर्षभरातील नऊ ते १० बॅचेसमधून वर्षभराचे अर्थकारण सक्षम होते.

कर्जमुक्त झालो...

अण्णासाहेब सांगतात की सन २०१६ पूर्वी म्हणजे रेशीम शेती सुरू करण्यापूर्वी डोक्यावर कर्ज होते. मात्र या शेतीत जसजशी प्रगती करीत गेलो त्यानुसार चांगले उत्पादन व उत्पन्न मिळवू लागलो. आज रेशीम शेतीतून पूर्णपणे कर्जमुक्त झालो आहे. शेतातच घर बांधले याचे समाधान आहे. साधारण प्रति दोन महिन्याच्या कालावधीत खात्रीशीर व ताजे उत्पन्न मिळत असल्याने घरखर्चाची सोय झाली आहे.

केवळ तीन एकरच शेती व त्यातही अडीच एकरांत तुती असल्याने रेशीम शेती हाच आमच्या आयुष्याचा महत्त्वाचा आधार झाल्याचे अण्णासाहेबांनी सांगितले. वडील भारत, आई उमा व शिक्षण घेत असलेला धाकटा भाऊ अतुल असे सर्वांचे श्रम या शेतीत होत असल्याने ताण कमी झाला आहे. मजुरीभारही कमी झाला आहे असेही ते म्हणाले.

अण्णासाहेब माळी ८३७९९०३०५७

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com