Shaktipith Mahamarg : शक्तिपीठ महामार्गाला शेतकऱ्यांचा तीव्र विरोध तरीही शासनाकडून उपविभागीय अधिकाऱ्यांच्या नियुक्त्या

Maharashtra Government : कोल्हापूर, सांगली जिल्ह्यातील उपविभागीय अधिकाऱ्यांची शासनाने नियुक्ती करत शासनाने हे काम युद्धपातळीवर सुरू केले आहे.
Shaktipith Mahamarg
Shaktipith Mahamargagrowon

Farmers Oppose Shaktipith Mahamarg : महाराष्ट्र आणि गोवा या दोन राज्यांतील महत्वाच्या मंदिरांना जोडणाऱ्या शक्तिपीठ महामार्गासाठी भूसंपादन प्रक्रियेला प्रारंभ झाला आहे. कोल्हापूर, सांगली जिल्ह्यातील उपविभागीय अधिकाऱ्यांची शासनाने नियुक्ती करत शासनाने हे काम युद्धपातळीवर सुरू केले आहे. दरम्यान शक्तिपीठ महामार्गाविरोधात राज्यातील हजारो शेतकऱ्यांनी विरोध केला आहे. अशातच राज्य शासनाकडून युद्ध पातळीवर जमीन अधिग्रहण करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. भविष्यात या कामावरून शासन विरुद्ध शेतकरी असा संघर्ष निर्माण होण्याची चिन्हे आहेत.

गोवा राज्यातील पत्रादेवी ते दिगरस (जि. वर्धा) असा हा ८०२ किलोमीटरचा मार्ग शक्तिपीठ महामार्गाला जोडण्यात येणार आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील ६० पेक्षा अधिक गावांमधून तर सांगली जिल्ह्याच्या १९ गावांतून शक्तिपीठ महामार्ग जाणार आहे. दरम्यान याला कोल्हापूर जिल्ह्यासह अनेक जिल्ह्यातून विरोध होत आहे. हा विरोध होत असतानाच शासनाने भूसंपादनासाठी उपविभागीय अधिकाऱ्यांची नियुक्ती करत विरोधकांच्या जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार केला आहे.

तीर्थक्षेत्रे दळणवळण माध्यमातून जोडण्यासाठी शक्तिपीठ महामार्ग उभारण्यासाठी ८६ हजार ३०० कोटी रुपये प्रस्तावीत खर्च आखण्यात आला आहे. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने मार्गदर्शक तत्त्वांना अनुसरून प्रत्यक्ष स्थळ पाहणीनुसार विविध पर्यायी आखणीचा अभ्यास केला आहे.

शासन पातळीवर मंजुरी प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर गेल्या आठवड्यात शासनाने राजपत्र व अधिसूचना जाहीर केली आहे. शक्तिपीठ महामार्ग अंतर्गत १२ जिल्ह्यातील १२ हजार ५८९ इतक्या गट नंबरमधील २७ हजार ५०० एकरांतून हा महामार्ग जाणार आहे. शक्तिपीठ महामार्गाला गावागावांतील शेतकऱ्यांमधून विरोध होऊ लागला आहे.

विविध गावांमध्ये शेतकऱ्यांनी वज्रमूठ आवळत महामार्गाला कडाडून विरोध केला आहे. गावागावांत बैठका सुरू झाल्या आहेत. भूसंपादनाच्या प्रक्रियेत मोजणी प्रक्रिया होणार आहे. यावेळी शेतकरी आणि शासन प्रतिनिधी यांच्यामध्ये वादाची शक्यता आहे.

Shaktipith Mahamarg
Shaktipith Mahamarg Kolhapur : शक्तीपीठ महामार्गावरून राजू शेट्टींची आक्रमक भूमिका, एकही इंचही शेती...

विभागीय आयुक्तांचे लवाद

भूसंपादनासाठी २७ अधिकाऱ्यांनी नियुक्ती केली आहे. तसेच ५ विभागातून ५ विभागीय आयुक्तांची लवाद म्हणून निवड केली आहे. सांगली जिल्ह्यातील मिरज, तासगाव, कवठेमंकाळ या तालुक्यांसाठी मिरज उपविभागीय अधिकारी, आटपाडी तालुक्यासाठी विटा, खानापूर, शिरोळ.

हातकणंगले तालुक्यासाठी इचलकरंजी उपविभागीय अधिकारी, करवीर तालुक्यासाठी करवीर उपविभागीय अधिकारी, कागल तालुक्यासाठी राधानगरी, भुदरगड व आजरा तालुक्यासाठी भुदरगड तर सावंतवाडी व दोडामार्ग तालुक्यासाठी सावंतवाडी उपविभागीय अधिकारी यांची भूसंपादन अधिकारी म्हणून नियुक्ती केली आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com