Cabinet Meetings
Cabinet MeetingsAgrowon

Cabinet Meetings : यंत्रमागांना अतिरिक्त वीज सलवत लागू; लघुदाब उपसा जलसिंचन ग्राहकांसाठीही मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय

Chief Minister Eknath Shinde : राज्यातील शिंदे सरकारने यंत्रमागांना अतिरिक्त वीज सवलत लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे यंत्रमागांना प्रति युनिट १ रुपया अतिरिक्त वीज सलवत मिळणार आहे. हा निर्णय मंगळवारी (ता.११) मंत्रिमंडळ बैठकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेत घेण्यात आला
Published on

Pune News : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी (ता.११) मंत्रिमंडळ बैठक पार पडली. या बैठकीत विविध निर्णय घेण्यात आले. यावेळी यंत्रमागांना प्रति युनिट १ रुपया अतिरिक्त वीज सलवत लागू करण्यासह जलसिंचन ग्राहकांना वीज दर सलवत योजनेस मुदतवाढ देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयामुळे २७ एचपी पेक्षा कमी जोडभार असलेल्या यंत्रमागांना प्रति युनिट १ रुपया अतिरिक्त वीज सलवत मिळणार आहे. तर लघुदाब उपसा जलसिंचन ग्राहकांसाठी १ रुपया प्रति युनिट व स्थिर आकारात १५ रुपये प्रति महिना अशी सवलतीचा लाभ मिळणार आहे. 

गेल्या अनेक दिवसांपासून वीज सवलत देण्यात यावी अशी यंत्रमाग धारकांची मागणी होती. यावर मंगळवारी (ता.११) पार पडलेल्या मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय घेण्यात आली. २७ एचपी (अश्वशक्ती) पेक्षा जास्त पण २०१ एचीपी पेक्षा कमी जोडभार असलेल्या यंत्रमागांना प्रति युनिट ७५ पैसे अतिरिक्त वीज सवलत देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तर जे यंत्रमाग २७ एचपी पेक्षा कमी जोडभार आहेत आशा यंत्रमागांना प्रति युनिट १ रुपया अतिरिक्त वीज सलवत लागू करण्यात येणार आहे. 

Cabinet Meetings
Cabinet Meeting : बांबू लागवडीस अनुदान तर संपूर्ण राज्यात राबवणार मधाचे गाव योजना; मंत्रिमंडळाच्या बैठकीतील महत्त्वाचे निर्णय

तर ही सवलत वस्त्रोद्योग विभागाकडे नोंदणी करणाऱ्या २७ एचपी (अश्वशक्ती) पेक्षा कमी आणि २७ एचपी जास्त पण २०१ एचपी पेक्षा कमी जोडभार असणाऱ्या यंत्रमागांना दिली जाणार आहे. तसेच ही सवलत वस्त्रोद्योग धोरण २०२३ ते २०२८ कालावधीपर्यंत लागू असेल.

Cabinet Meetings
Cabinet Meeting : अवकाळग्रस्‍त शेतकऱ्यांना दिलासा, एनडीआरएफच्या निकषाप्रमाणे नुकसान भरपाई देणार

लघुदाब उपसा वीज दर सलवत

दरम्यान अतिउच्चदाब, उच्चदाब व लघुदाब उपसा जलसिंचन योजनांमधील ग्राहकांना देखील दिलासा देणारा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. अतिउच्चदाब, उच्चदाब व लघुदाब उपसा जलसिंचन योजनांमधील ग्राहकांना ३१ मार्च २०२५ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.

यात अतिउच्चदाब व उच्चदाब ग्राहकांना १.१६ पैसे प्रति युनिट व स्थिर आकारामध्ये २५ रुपये प्रति केव्हीए सवलत मिळेल. तर लघुदाब उपसा जलसिंचन ग्राहकांसाठी १ रुपया प्रति युनिट व स्थिर आकारात १५ रुपये प्रति महिना सलवत मिळणार आहे. 

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com