Shaktipith Mahamarg Kolhapur : शक्तीपीठ महामार्गावरून राजू शेट्टींची आक्रमक भूमिका, एकही इंचही शेती...

Raju Shetti : शासनाने संपादित करणाऱ्या जमीनीला चौपटीने दर दिला तरच महामार्गासाठी जमीनी देवू अन्यथा हा महामार्ग होवू देणार नसल्याचा इशारा राजू शेट्टी यांनी दिला.
raju shetti
raju shettiagrowon

Maharashtra Goa Shaktipeeth Highway : राज्य सरकारच्यावतीने धार्मिक स्थळांच्या सर्वांगिण विकासासाठी तसेच पर्यटनांच्या दृष्टीने महाराष्ट्र राज्यातील पवनार जि. वर्धा ते पत्रादेवी जि. सिंधुदुर्ग या महाराष्ट्र - गोवापर्यंतच्या प्रवेश नियंत्रित शिघ्रसंचार द्रुतगती महामार्गाचे (महाराष्ट्र शक्तीपीठ महामार्ग) बांधकाम करण्याचा निर्णय नुकतेच राज्य सरकारने घेतले आहेत. या मार्गासाठी शासनाने संपादित करणाऱ्या जमीनीला चौपटीने दर दिला तरच महामार्गासाठी जमीनी देवू अन्यथा हा महामार्ग होवू देणार नसल्याचा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक राजू शेट्टी यांनी दिला.

प्रस्तावित महामार्ग हा वर्धा, यवतमाळ, हिंगोली, नांदेड, परभणी, बीड, लातुर, धाराशिव, सोलापूर, सांगली, कोल्हापूर व सिंधदुर्ग या १२ जिल्ह्यातून पुढे कोकण द्रुतगती महामार्गास गोवा महाराष्ट्र सरहद्दीवर जोडणे प्रस्तावित आहे.या रस्त्यासाठी शासनाकडून लाखो शेतक-यांची हजारो एकर संपादित केली जाणार आहे.

सदर प्रकल्पा करिता भूसंपादन करताना महाराष्ट्र शासन महसूल व वन विभाग शासन निर्णय क्र. एलक्युएन १२/२०१३/प्र.क्र.१९० (भाग-१५)/अ-२ मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरु चौक, मंत्रालय, मुंबई - ४०० ०३२, दिनांक:- ०६ ऑक्टोबर, २०२१ मधील राष्ट्रीय/ राज्य महामार्ग प्रकल्पाच्या भूसंपादन प्रकरणी मोबदल्याच्या रकमेची परिगणना करताना सदरील आदेशानुसार भूसंपादनाची मोबदल्याच्या रकमेची परिगणना करताना गुणांक घटक 1.00 राहणार आहे.

राज्यामध्ये विकास झाला पाहिजे पण विकास होत असताना शेतकऱ्यांचे शोषण करून अथवा शेतकऱ्यांचा बळी घेऊन विकास करणे हा विकास अभिप्रेत नाही. ज्या शेतकऱ्यांच्या जमीनी संपादीत होणार आहेत त्यांना अत्यल्प मोबदला मिळणार असून यामध्ये अनेक शेतकरी भुमिहीन होणार आहेत. अल्पभुधारक शेतकरी भुमिहीन झाल्यानंतर त्याची जनावरे व इतर उपजीविकेचा व्यवसाय बंद होणार असून सध्याच्या नियामाप्रमाणे मिळणाऱ्या मोबदल्यातून त्यांना जमीनीही घेता येणार नाहीत. यामुळे राज्यातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होणार असून अल्पभुधारक शेतकऱ्यांच्या कुटूंबांची या निर्णयामुळे राखरांगोळी होणार आहे.

raju shetti
Raju Shetti : 'अन्यथा २६ फेब्रुवारी रोजी राज्यातील बाजार समित्या बंद', राजू शेट्टींचा इशारा

यामुळे सदर महामार्ग करत असताना राज्य सरकारने केलेला सदर प्रकल्पाकरिता भूसंपादन करताना महाराष्ट्र शासन महसूल व वन विभाग शासन निर्णय क्र. एलक्युएन १२/२०१३/प्र.क्र.१९० (भाग-१५)/अ-२ मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरु चौक, मंत्रालय, मुंबई - ४०० ०३२, दिनांक:- ०६ ऑक्टोबर, २०२१ मधील राष्ट्रीय/ राज्य महामार्ग प्रकल्पाच्या भूसंपादन प्रकरणी मोबदल्याच्या रकमेची परिगणना कायदा पुर्वीप्रमाणे चौपटीने करूनच भुसंपादन करावे अन्यथा राज्यातील शेतकरी हा प्रकल्प होवू देणार नाहीत. प्रसंगी रक्ताचे पाट वाहतील पण शेतकऱ्यांची एक इंचसुध्दा जमीन सरकारला संपादीत करू देणार नसल्याचे राजू शेट्टी यांनी म्हणाले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com