Co-Operative Bank : सहकारी बँकांची समृद्धी गरजेची

Nitin Gadkari : जिल्हा सहकारी बँकेला पॉवरफुल्ल इंजिनची आवश्यकता होती. त्यादृष्टीने राज्य सहकारी बँकेने घेतलेली जबाबदारी स्वागतार्ह आहे. गेल्या सहा वर्षांपासून राज्य सहकारी बँक उत्तम काम करत आहे.
Nitin Gadkari
Nitin GadkariAgrowon
Published on
Updated on

Nagpur News : सहकारी बँकांची समृद्धी होणे अत्यंत गरजेचे आहे. राज्य किंवा जिल्हा बँकेने सहकारी बँकांना शक्ती देणे शेतकऱ्यांसाठी फायद्याचे आहे, असे प्रतिपादन केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी येथे केले.

नागपूर जिल्हा बँकेवर राज्य सहकारी बँकेची संस्थापक प्रशासक म्हणून नियुक्ती-पदभार स्वीकृतीचा कार्यक्रम रविवारी (ता. ३०) आयोजित करण्यात आला. त्यावेळी केंद्रीय मंत्री श्री. गडकरी बोलत होते. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रमुख उपस्थिती होती.

Nitin Gadkari
Mumbai Bank Cooperative Building : मुंबै बँकेच्या सहकार भवनसाठी ‘पशुसंवर्धन’ ऐवजी म्हाडाची जमीन

गांधीसागर येथील शिक्षक सहकारी बँकेच्या सभागृहात या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर, आशीष जयस्वाल, आमदार आशीष देशमुख, आमदार चरणसिंग ठाकूर, राज्य सहकारी बँकेचे प्रशासक विद्याधर अनास्कर आदींची उपस्थिती होती.

मंत्री श्री. गडकरी म्हणाले, ‘‘जिल्हा सहकारी बँकेला पॉवरफुल्ल इंजिनची आवश्यकता होती. त्यादृष्टीने राज्य सहकारी बँकेने घेतलेली जबाबदारी स्वागतार्ह आहे. गेल्या सहा वर्षांपासून राज्य सहकारी बँक उत्तम काम करत आहे. त्यांची उलाढाल तर वाढलीच आहे, शिवाय नफाही मोठ्या प्रमाणात कमावला आहे.

Nitin Gadkari
Maharashtra State Cooperative Bank : उत्कृष्ट कामगिरीबद्दल राज्य बँकेचा सन्मान

साखर आणि इथेनॉल उद्योगाला देखील मोठे सहकार्य बँकेने केले आहे. त्यामुळे त्यांच्या माध्यमातून सहकारी बँकांना शक्ती मिळाली तर शेतकऱ्यांनाच फायदा होईल. शेतकऱ्यांच्या कर्ज पुरवठ्याचे मार्ग खुले होतील.’’ बँकेचे भविष्य बदलायला सुरवात झाली आहे. त्याचा लाभ ग्रामीण जनतेला नक्की होईल, असा विश्वासही गडकरी यांनी व्यक्त केला.

बँकांवर शेतकऱ्यांची जबाबदारी - मुख्यमंत्री

जिल्हा सरकारी बँक चांगली असेल, तर शेतकऱ्यांना फायदा होतो. आज जिल्ह्यातील अनेक बँका शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात मदत करतात. जिल्हा आणि राज्य सहकारी बँकेवर शेतकऱ्यांची मोठी जबाबदारी आहे, असे मत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले. सहकारातून समृद्धीच्या दिशेने प्रवास सुरू झाला असल्याचेही ते म्हणाले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com