Mumbai Bank Cooperative Building : मुंबै बँकेच्या सहकार भवनसाठी ‘पशुसंवर्धन’ ऐवजी म्हाडाची जमीन

Mhada Department Land : केवळ एका पत्राच्या आधारे गोरेगाव येथील पशुवैद्यकीय महाविद्यालयाची तीन एकर जागा मुंबै बँकेच्या सहकार भवनासाठी देण्याचा निर्णय मागे घेत राज्य सरकारने अखेर म्हाडाची ऐन मोक्याची सायन येथील जागा देण्याचा निर्णय घेतला आहे.
Bank
BankAgrowon
Published on
Updated on

Mumbai News : केवळ एका पत्राच्या आधारे गोरेगाव येथील पशुवैद्यकीय महाविद्यालयाची तीन एकर जागा मुंबै बँकेच्या सहकार भवनासाठी देण्याचा निर्णय मागे घेत राज्य सरकारने अखेर म्हाडाची ऐन मोक्याची सायन येथील जागा देण्याचा निर्णय घेतला आहे.

रविवारी (ता. २५) झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत गृहनिर्माण विभागाच्या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली असून, या प्रस्तावावर विधी व न्याय विभागाने प्रतिकूल शेरे मारूनही हा प्रस्ताव मंजूर केला आहे.

Bank
PDCC Bank Pune : उत्कृष्ट सतरा सहकारी संस्थांना बक्षीस वितरण

बोरिवली येथील पशुवैद्यकीय महाविद्यालयाची तीन एकर जागा भाजपचे आमदार प्रवीण दरेकर अध्यक्ष असलेल्या मुंबै बँकेच्या सहकार भवनासाठी देण्याचा निर्णय शासन आदेश काढून केला होता. मात्र, अवघ्या काही तासांत हा शासन आदेश राज्य सरकारच्या संकेतस्थळावरून काढून टाकण्यात आला. तसेच या आदेशात पशुसंवर्धन विभागाला १०० कोटी रुपये द्यावेत, अशी अट टाकली होती.

मात्र, या आदेशातील मुंबै बँकेचा उल्लेख काढून टाकावा यासाठी भाजपच्या गोटातून आग्रह धरला होता. परंतु पशुसंवर्धन विभागाने त्यास नकार दिला होता. त्यानंतर म्हाडाच्या जागेवर सहकार भवन उभारण्यासाठी प्रस्ताव दिला. सायनमधील ही जागा २४६६. ५७ चौरसमीटर क्षेत्रफळाची असून त्याची बाजारभावानुसार किंमत २४ कोटी २३ लाख ५३९ हजार रुपये आहे.

Bank
Land Acquisition Issue : शेतकऱ्यांचा ‘डुबकी मारो’ आंदोलनाचा इशारा

मात्र, ही जागा देण्यासाठी गृहनिर्माण विभागाने स्पष्ट मत व भूमिका घेतल्याचे दिसून येत नाही. तसेच यामुळे प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष दायित्वाचा, महसूल हानीचा उल्लेख विभागाने केलेला नाही, असा शेरा विधी व न्याय विभागाने मारला आहे.

जागा देण्यावरून गदारोळ

गोरेगाव येथील पशुवैद्यकीय महाविद्यालयाची तीन एकर जागा देण्यावरून मोठा गदारोळ झाला होत. पशुवैद्यकीय महाविद्यालयाची बहुतांश जागा डोंगराळ आहे. तर जी जागा वापरण्यायोग्य असलेली तीच तीन एकर जागा सहकार भवनासाठी दिल्याने टीका होत होती. तसेच पशुसंवर्धन व दुग्धविकास विभागाने जागा देण्याचा सपाटा लावल्याने टीका करण्यात येत होती.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com