Agriculture Compensation
Agriculture CompensationAgrowon

Crop Damage Compensation : नुकसानीचे पंचनामे करून भरपाई द्या ः काँग्रेसची मागणी

Heavy rain Crop Loss : छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात २ व ३ एप्रिल २०२५ रोजी अवकाळी पावसासह वादळी वारे, गारपीट आणि विजांच्या गडगडाटामुळे शेतकरी व सामान्य नागरिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले.
Published on

Chh. Sambhajinagar News : नैसर्गिक आपत्तीने झालेल्या नुकसानीची भरपाई तत्काळ देण्याची मागणी जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने जिल्हाधिकारी यांना सोमवारी (ता. ७) दिलेल्या निवेदनातून करण्यात आली.

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात २ व ३ एप्रिल २०२५ रोजी अवकाळी पावसासह वादळी वारे, गारपीट आणि विजांच्या गडगडाटामुळे शेतकरी व सामान्य नागरिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले.

या नैसर्गिक आपत्तींमुळे शेतातील उभ्या रब्बी हंगामातील पिकांमध्ये गहू, मका, हरभरा, कांदा, लसूण, बीजवाई कांदा, भाजीपाला, फुलशेती, पान मळे यांचे अतोनात नुकसान झाले आहे. आंबा व इतर फळबागांचेही मोठे नुकसान झाले आहे. अनेक ठिकाणी पीक आडवे झाले असून सोंगणीला आलेले पीक वाया गेले आहे.

Agriculture Compensation
Compensation E-KYC Error : अतिवृष्टीच्या मदत यादीत नावांच्या भाषांतरामुळे गोंधळ

जनावरांच्या चाऱ्याचेही मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. जनावरांसाठी उभारलेल्या शेडचे पत्रे उडून गेले आहे. घर व व्यावसायिक मालमत्तेचे नुकसानः वादळी वाऱ्यामुळे अनेक घरांवरील छप्पर व पत्रे उडून गेले आहेत.

किराणा दुकानांवरील पत्र्याचे शेड उडून गेल्यामुळे दुकानातील मालसामानाचे नुकसान झाले आहे. घरामधील संसारोपयोगी वस्तूंनाही पावसामुळे हानी पोहोचली आहे. वादळामुळे विद्युत पोल पडल्याने व तारा तुटल्यामुळे अनेक भागात वीजपुरवठा पूर्णपणे खंडित झाला आहे.

Agriculture Compensation
Sukhoi Crash Compensation : सुखोई विमान दुर्घटनाग्रस्त शेतकऱ्यांना ३२ लाखांची मदत

या सर्व प्रकारच्या नुकसानीमुळे शेतकरी व नागरिक प्रचंड अडचणीत आले असून त्यांच्यासमोर आर्थिक संकट उभे राहिले आहे. त्यामुळे, तातडीने पाहणी करून पंचनामे करण्याची व नुकसानग्रस्त शेतकरी व नागरिकांना त्वरित नुकसानभरपाई देण्याची गरज आहे.

तसेच, वीजपुरवठा लवकरात लवकर पूर्ववत करण्यासाठी संबंधित विभागांमार्फत तातडीची पावले उचलावी, अशी अपेक्षा जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने करण्यात आली आहे. यासंदर्भात खासदार डॉ. कल्याण काळे, किरण पाटील डोणगावकर, जगन्नाथ काळे, संतोष शेजूळ आदींच्या स्वाक्षरीने दिलेल्या निवेदन देण्यात आले आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com