Jowar Buying Centers : शासकीय केंद्रांमधून ज्वारी खरेदी रखडत

Purchase of Jowar : खानदेशात सुमारे ३० शासकीय ज्वारी खरेदी केंद्रे मंजूर झाली. परंतु यातील निम्मी खरेदी केंद्रे सुरू नाहीत. जेथे खरेदी सुरू आहे, तेथेही रोज एक ते दीड हजार क्विंटल ज्वारीचीच खरेदी केली जात आहे.
Jowar
Jowar Agrowon

Jalgaon News : खानदेशात सुमारे ३० शासकीय ज्वारी खरेदी केंद्रे मंजूर झाली. परंतु यातील निम्मी खरेदी केंद्रे सुरू नाहीत. जेथे खरेदी सुरू आहे, तेथेही रोज एक ते दीड हजार क्विंटल ज्वारीचीच खरेदी केली जात आहे. खरेदी रखडत सुरू असून, गतीने ही कार्यवाही पार पाडावी, असा मुद्दा उपस्थित केला जात आहे.

ज्वारीचे दर यंदा बाजारात कमी आहेत. ज्वारीला हमीभाव ३१८० रुपये प्रतिक्विंटल असा आहे. परंतु बाजारातील दर २००० रुपयांपर्यंत होते. ८० टक्के शेतकऱ्यांनी ज्वारीची बाजारात कमी दरात विक्री केली. परंतु अनेकांनी शासकीय खरेदी सुरू होईल, या अपेक्षेने ज्वारीचा साठा केला. यानंतर कमाल ज्वारीची बाजारात विक्री झाल्यानंतर शासकीय खरेदीसंबंधी ऑनलाईन नोंदणी सुरू झाली.

Jowar
Summer Jowar : उन्हाळी ज्वारीला हमीभाव नसल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत

या नोंदणीस शेतकऱ्यांनी प्रतिसाद दिला. खानदेशात सुमारे साडेनऊ हजार शेतकऱ्यांनी ज्वारीच्या शासकीय केंद्रात विक्रीसाठी संबंधित पोर्टलवर ऑनलाइन नोंदणी केली आहे. यात जळगाव जिल्ह्यात सुमारे चार हजार ९९० शेतकऱ्यांनी ऑनलाईन नोंदणी केली आहे. अलीकडेच ज्वारीची खरेदी सुरू झाली आहे. परंतु सर्वत्र खरेदी सुरू झालेली नाही.

Jowar
Jowar Crop Policy : ज्वारीला सरकारी धोरणांचा आधार मिळेल?

शासकीय केंद्रात ज्वारी विक्रीसाठी अल्प प्रतिसाद काही भागात मिळाला आहे. यामुळे संबंधित भागात पूर्ण यंत्रणा राबविणे प्रशासनासाठी अडचणीचे आहे. जळगाव जिल्ह्यात पारोळा, भडगाव, अमळनेर, चाळीसगाव, जळगाव या भागांत ज्वारी विक्रीसंबंधीच्या नोंदणीला प्रतिसाद मिळाला. पण यावल, रावेर भागात प्रतिसाद नाही. यावलमध्ये फक्त चार शेतकऱ्यांनी शासकीय केंद्रात ज्वारी विक्रीसाठी नोंदणी केली आहे. नंदुरबारातही तळोदा तालुक्यात अल्प प्रतिसाद मिळाला आहे. तर धुळ्यात शिरपुरात नोंदणीला प्रतिसाद मिळालेला नाही.

प्रशासनाचे ढिसाळ नियोजन

ज्वारीच्या शासकीय खरेदीसाठी प्रशासनाने प्रथम गोदामे, बारदाना व पुरेशा यंत्रणेची व्यवस्था करणे आवश्यक असते. परंतु या कार्यवाहीत प्रशासन मागे पडले. नोंदणी झाली, तरीदेखील अनेक भागात पुरेसा बारदाना नाही. तर काही भागात गोदामे उपलब्ध नाहीत. यामुळे ज्वारीची खरेदी रखडत सुरू आहे. जळगाव जिल्ह्यात सुमारे १८ ज्वारी खरेदी केंद्रे निश्चित केली आहेत. यातील १० केंद्रे ही सुरू झालेली नाहीत. धुळे व नंदुरबारातही अशीच स्थिती असून, तेथेही खरेदी हव्या तेवढ्या केंद्रांत सुरू नाही.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com