Stop Foof West Day: 'स्टॉप फूड वेस्ट डे'; अन्नाची नासाडी रोखण्यासाठी जागरूकता आवश्यक

Food Waste Solution: या लेखात अन्न नासाडी रोखण्यासाठी जगभरात सुरू असलेल्या नावीन्यपूर्ण स्टार्टअप्सचा आणि उपाययोजनांचा आढावा घेण्यात आला आहे.
Stop Foof West Day
Stop Foof West DayAgrowon
Published on
Updated on

डॉ. शिल्पा हणमंतराव तरटे

Food Loss Prevention: जगभरामध्ये २८ एप्रिल हा दिवस 'स्टॉप फूड वेस्ट डे' म्हणून साजरा केला जातो. अन्नाची नासाडी रोखण्यासाठी जागरूकता निर्माण करणे, असा यामागे उद्देश आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावरील विविध संस्थांच्या अभ्यासानुसार, २०५० पर्यंत अन्नाची नासाडी दुपटीने वाढू शकते.

कृषी क्षेत्रातील अन्न उत्पादन, प्रक्रिया, वितरण, विक्री आणि उपभोग या साखळीमध्ये अन्नाची विविध टप्पावर नासाडी होते.

अन्न आणि कृषी संघटनेच्या (FAO) मते, दरवर्षी जागतिक स्तरावर उत्पादित होणाऱ्या अन्नापैकी सुमारे एक तृतीयांश अन्न वाया जाते. परिणामी केवळ पाणी आणि ऊर्जा यासारख्या नैसर्गिक संसाधनांवर भार पडतोच. तसेच हरितगृह वायू (GHG) उत्सर्जनातही लक्षणीय वाढ होत आहे.

अन्नाची नासाडी टाळण्यासाठी सरकार तसेच विविध सामाजिक संस्था उपक्रम राबवत आहेत. तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर खाजगी कंपन्यांनी देखील उपाय योजनांच्या अनुषंगाने गुंतवणूक सुरू केली आहे. त्यामुळे अन्न नासाडी रोखण्यासाठी स्टार्टअप्स निर्माण होऊ लागले आहेत.

Stop Foof West Day
Food Processing Business : प्रक्रिया उद्योगासाठी कसं मिळवाल कर्ज आणि अनुदान? काय आहेत नियम, अटी आणि पात्रता

'टोस्ट अले'- 'ब्रेड' हा आहाराचा भाग बनलेला आहे. परंतु जे ब्रेड विकले जात नाहीत किंवा वाया जातात, अशा ब्रेडपासून बियर बनवण्याचा उद्योग यूकेमधील 'टोस्ट अले' या कंपनीने सुरु केला आहे.

ही कंपनी आधुनिक समस्येचे निराकरण करण्यासाठी किण्वन या प्राचीन तंत्रज्ञानाचा पुनर्वापर करत आहे. तसेच बेकरी आणि फूड बँकांसोबत भागीदारी केली जात आहे. त्यातून लँडफिलमधून न विकलेल्या ब्रेडचा वापर करून त्याचे पर्यावरणपूरक उत्पादनात रूपांतर केले जात आहे.

अन्न पॅकेजिंग कचरा हा जागतिक कचरा समस्येत प्रमुख घटक आहे. काही स्टार्टअप्स अन्न कचरा पॅकेजिंग साहित्यात रूपांतरित करून, बायोडिग्रेडेबल रॅप्स, कंटेनर आणि इतर उत्पादन निर्मितीचा शाश्वत पर्याय शोधत आहेत.

उदा. मशरूमचे देठ, समुद्री शेवाळ आणि फळांच्या साली कंपोस्टेबल आणि पर्यावरणपूरक पॅकेजिंगसाठी वापरल्या जात आहेत. यामुळे प्लास्टिक पॅकेजिंगवरील अवलंब कमी होतो.

Stop Foof West Day
Food Processing Success Story: १० हजारांपासून १० लाखांपर्यंत! विजयमाला देशमुख यांचा उद्योग प्रवासाचा यशोगाथा

'इव्होवेअर'- इव्होवेअर ही एक इंडोनेशियन कंपनी आहे. खाण्यायोग्य आणि जैवविघटनशील पॅकेजिंगसाठी समुद्री शेवाळ वापर ही कंपनी करते. त्यांचे नाविन्यपूर्ण पॅकेजिंग प्लास्टिक कचरा कमी करते.

तसेच पौष्टिक अन्न स्रोत म्हणून देखीलत त्याचा वापर करता येतो. ऑस्ट्रेलियातील 'राईप रोबोटिक्स' अ‍ॅग्रीटेक स्टार्टअपने एक ‘रोबोटिक हार्वेस्टिंग सोल्यूशन’ विकसित केले आहे. जे योग्य वेळी पिकलेली फळे निवडून तसेच शेतात कुजण्यासाठी शिल्लक राहिलेल्या उत्पादनाचे प्रमाण कमी करून अन्नाची नासाडी कमी करते.

बायो-बीन ही युनाटेड किंगडममधील कंपनी आहे. ही कंपनी टाकाऊ कॉफी ग्राउंड्सचा वापर शाश्वत जैवइंधन तयार करण्यासाठी करते. त्यांचे कॉफी लॉग्स पुनर्नवीनीकरण केलेल्या कॉफी ग्राउंड्सपासून बनवले जातात आणि कोळशासारख्या पारंपारिक इंधनांना अधिक पर्यावरणपूरक पर्याय म्हणून विकले जातात.

अमेरिकेतील एक स्टार्टअप कंपनी, फुल सर्कल बायोप्लास्टिक्स, अन्न कचरा आणि शेती उप-उत्पादनांपासून कंपोस्टेबल प्लास्टिक पर्याय तयार करते. त्यांची उत्पादने प्लास्टिक कचऱ्याच्या वाढत्या समस्येवर लक्ष केंद्रित करण्यास मदत करतात. तसेच अन्न कचरा कमी करतात.

'टू गुड टू गो' हे एक लोकप्रिय मोबाईल अ‍ॅप आहे. जे ग्राहकांना हॉटेल्स आणि सुपरमार्केटमधून अन्न खरेदी करण्यास मदत करते. या अॅपमुळे चांगले अन्न वाया जाण्यापासून रोखलं जातं. त्याची किंमत कमी असते.

मॅगॉट शेती उपक्रम (झिम्बाब्वे आणि केनिया)- झिम्बाब्वेच्या न्यांगाम्बे प्रदेशात, शेतकऱ्यांनी मॅगॉट शेतीचा अवलंब केला आहे. ज्यामुळे काळ्या सैनिक माशी अळ्यांचे प्रजनन होऊन कुजणाऱ्या सेंद्रिय कचऱ्याचे प्रथिनेयुक्त पशुखाद्यात रूपांतर होते. ही पद्धत उत्पादन खर्च कमी करते आणि ग्रीनहाऊस गॅस (GHG) उत्सर्जन कमी करून पर्यावरणीय शाश्वततेला समर्थन देते.

तसेच, केनियाचा प्रोजेक्ट मिला या अळ्यांचा वापर अन्न कचऱ्याचे निराकरण करण्यासाठी आणि शाश्वत माशांचे खाद्य पुरवण्यासाठी करतो. ज्यामुळे स्थानिक मत्स्यपालनाला फायदा होतो आणि वन्य माशांच्या साठ्यावरील अवलंबित्व कमी होते.

या नवोपक्रमांचा परिणाम अन्न कचरा कमी करण्यापलीकडे जातो - तो सर्वांसाठी अधिक शाश्वत आणि भविष्यात समान अन्न व्यवस्था निर्माण करण्यात नक्कीच हात भार लावेल.

(लेखिका छत्रपती संभाजीनगर येथील एम जी एम कृषी जैवतंत्रद्यान महाविद्यालयामध्ये सहाय्यक प्राध्यापक पदावर कार्यरत आहेत.)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com