Sugarcane Crushing : नांदेड विभागात ९४ लाख टन उसाचे गाळप

Sugarcane Update : कारखान्यांनी बुधवारअखेर (ता. २०) ९३ लाख ७७ हजार ६१३ टन उसाचे गाळप केले आहे. तर ९२ लाख ४८ हजार ५०५ क्विंटल साखरचे उत्पादन केल्याची माहिती साखर सहसंचालक सचिन रावल दिली.
Sugarcane Crushing
Sugarcane CrushingAgrowon
Published on
Updated on

Nanded News : नांदेड प्रादेशिक सहसंचालक (साखर) कार्यालयांतर्गत नांदेड विभागात मागील हंगामात २९ साखर कारखाने सुरू झाले होते. यातील एक कारखाना बंद झाला आहे. या कारखान्यांनी बुधवारअखेर (ता. २०) ९३ लाख ७७ हजार ६१३ टन उसाचे गाळप केले आहे. तर ९२ लाख ४८ हजार ५०५ क्विंटल साखरचे उत्पादन केल्याची माहिती साखर सहसंचालक सचिन रावल दिली.

नांदेड प्रादेशिक सहसंचालक (साखर) विभागातील नांदेडसह परभणी, हिंगोली व लातूर या चार जिल्ह्यांतून गाळप हंगाम २०२३-२४ साठी ३० कारखान्यांनी ऑनलाइन अर्ज केले होते. यातील आजपर्यंत २९ कारखान्यांना गाळप परवाना मिळाला आहे. यातील सर्वच २९ कारखान्यांनी गाळप हंगाम सुरू केला आहे. यात १९ खासगी, तर १० सहकारी साखर कारखान्यांचा समावेश आहे.

Sugarcane Crushing
Sugarcane Crushing : ‘विठ्ठल’चे १०७ दिवसांत आठ लाख टन ऊस गाळप

हिंगोली जिल्ह्यातील टोकाई सहकारी साखर कारखान्याचे गाळप आटोपल्याने हा कारखाना १८ जानेवारीपासून बंद झाला आहे. विभागात बुधवारअखेर (ता. २०) ९३ लाख ७७ हजार ६१३ टन उसाचे गाळप केले आहे. तर ९२ लाख ४८ हजार ५०५ क्विंटल साखरचे उत्पादन केल्याची माहिती साखर सहसंचालक सचिन रावल दिली. साखरेचा सरासरी उतारा ९.५४ टक्के नांदेड विभागात सर्वाधिक ११ साखर कारखाने लातूर जिल्ह्यात सुरू झाले आहेत.

यात पाच खासगी तर सहा सहकारी साखर कारखान्यांचा समावेश आहे. यानंतर परभणी जिल्ह्यात सात कारखाने सुरू झाले आहेत. हे सर्वच कारखाने खासगी आहे. नांदेड जिल्ह्यात सहा कारखान्यांनी गाळप सुरू केले आहे. यात पाच खासगी, तर एक सहकारी साखर कारखान्याचा समावेश आहे. हिंगोली जिल्ह्यात दोन खासगी तर तीन सहकारी साखर कारखान्यांनी गाळप सुरू केले आहे. यातील एक सहकारी साखर कारखाना सध्या बंद झाला आहे.

Sugarcane Crushing
Sugarcane Crushing : खानदेशात ऊस गाळप सुरूच

गंगाखेड शुगरचे सात लाख टन गाळप

नांदेड विभागात मागील काही वर्षांपासून परभणी जिल्ह्यातील गंगाखेड शुगर हा खासगी साखर कारखाना गाळपात अव्वल राहिला आहे. या कारखान्याने आजपर्यंत सहा लाख ९८ हजार ९५० टन, तर साखर उत्पादन सहा लाख ८४ हजार ६०० क्विंटल झाले आहे.

व्टेन्टीवन शुगर देविनगर तांडा या कारखान्याने सहा लाख ४० हजार ३७० टन उसाचे गाळप केले आहे. तर साखरेचे पाच लाख ४२ हजार चारशे क्विंटल उत्पादन केले आहे. यासोबतच जागृती शुगर व विकासरत्न विलासराव देशमुख या कारखान्यानेही गाळपात मोठी आघाडी घेतली आहे.

कारखानिहाय ऊसगाळप व साखर उत्पादन

(गाळप टनांत साखर उत्पादन क्विंटलमध्ये)

जिल्हा कारखाने ऊस गाळप साखर उत्पादन

नांदेड ६ १६,१४,२८४ १५,६४,०२०

लातूर ११ ३७,२१,३३८ ३८,१५,२००

परभणी ७ २८,१६,५२५ २६,९४,६८५

हिंगोली ५ १२,२५,४६६ ११,७४,६६०

एकूण २९ ९३,७७,६१३ ९२,४८,५०५

विभागाचा सरासरी उतारा : ९.६४

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com