Soybean Trading : खेडमध्ये सोयाबीन खरेदी-विक्री सुरू

Soybean Market Update : खेड तालुका खरेदी-विक्री संघाच्या देखरेखीखाली सोयाबीन खरेदीला सुरुवात झाली असून, ४८ रुपये ९२ पैसे प्रतिकिलो प्रमाणे खरेदी होत आहे.
Soybean Market
Soybean MarketAgrowon
Published on
Updated on

Rajgurunagar News : खेड तालुका खरेदी-विक्री संघाच्या देखरेखीखाली सोयाबीन खरेदीला सुरुवात झाली असून, ४८ रुपये ९२ पैसे प्रतिकिलो प्रमाणे खरेदी होत आहे, अशी माहिती संघाचे व्यवस्थापक प्रताप टाकळकर यांनी दिली.

यंदा खेड तालुक्यात उच्चांकी खरीप हंगामात सोयाबीनचे उत्पादन निघाले; मात्र प्रतिकिलोचा बाजारभाव कोसळल्याने ५० रुपये किलोच्या आत हा बाजारभाव स्थिर राहिल्याने उत्पादक शेतकरी वर्गात नाराजी पसरली होती.

Soybean Market
Soybean Procurement : सोयाबीन खरेदी सुरू; अडचणींचा डोंगर कायमच

ऐन विधानसभा निवडणुकीत महायुती सरकारने नाफेडमार्फत खरेदी करण्याचा निर्णय घेऊन शेतकऱ्यांना ऑनलाइन अर्ज केल्यानंतर पडताळणी करून खरेदी करण्यात येत आहे. खेड तालुक्यातील खरेदी-विक्री संघ म्हणून एजन्सी नेमली असली तरी नाफेडमार्फत ही सोयाबीनची खरेदी केली जात आहे.

Soybean Market
Soybean Purchase Target : सोयाबीन खरेदीसाठी जिल्ह्यांना सुधारित उद्दिष्ट

खरेदी करण्यात आलेले सोयाबीन हे रांजणगाव शासकीय गोदामात साठवले जात आहे. येथे खरेदी केलेले सोयाबीन शासकीय गोदामात पोहोच होताच शेतकरीनिहाय यादी आणि झालेली रक्कम संबंधित शेतकऱ्यांच्या बँक खात्यात थेट जमा होत आहे.

नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांकडून खरेदी

सोयाबीन विक्रीसाठी ऑनलाइन नोंदणी बंद असून ज्या शेतकऱ्यांनी यापूर्वीच ऑनलाइन नोंदणी केली आहे, अशा सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांकडून सोयाबीन खरेदी करण्यात येत असल्याची माहिती संघाचे लिपिक मास्कर जगदाळे यांनी दिली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com