Jayant Patil : भाजपने पुण्यात समुद्रही आणून दाखवला; जयंत पाटील यांचा टोला

Jayant Patil On BJP : पुण्यात शनिवारी झालेल्या मॉन्सून पूर्व पावसाच्या दणक्याने महापालिका प्रशासनाच्या कारभारावर प्रश्न उठवले जात आहेत. यादरम्यान जयंत पाटील यांनी भाजपवर टीका केली आहे.
Jayant Patil
Jayant PatilAgrowon

Pune News : राज्यात नैऋत्य मोसमी वाऱ्यांसाठी (मॉन्सून) पोषक वातावरण असून मॉन्सूनची पुढे वाटचाल सुरू आहे. यादरम्यान शनिवारी (ता.०८) पुण्यात झालेल्या मॉन्सून पूर्व पावसाने अनेक टिकाणी रस्त्यांना नदीचे स्वरूप आले. तर अनेक ठिकाणी घरांमध्ये पावसाचे पाणी शिरले यावरून शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी भाजपला रविवारी (ता.०९) टोला लगावला. पाटील यांनी, भाजपने पुण्यात समुद्रही आणून दाखवला असे ट्विट करत खोटच टोला लगावला आहे.

शनिवारी पुणे शहराच्या विविध भागात सायंकाळी ४ वाजेच्या सुमारास मॉन्सून पूर्व मुसळधार पावसाची सुरूवात झाली. त्यामुळे शिवाजी नगर, जेएम रस्ता, हडपसर, सिंहगड रोड परिसर, वारजेसह शहराच्या विविध भागात पावसाचे पाणी तुंबले. अनेक वाहनधारकांना याचा फटका बसला. तर अचानक आलेल्या पावसामुळे पुणेकरांची तारांबळ उडाली.

Jayant Patil
Pune Monsoon Rain : मॉन्सून पूर्व पावसाच्या दणक्यात पुण्याची दाणादाण; सुप्रिया सुळेंची टीका

यावरून जयंत पाटील यांनी भाजपवर निशाना साधला आहे. पाटील म्हणाले, काल पुण्यामध्ये झालेल्या मुसळधार पावसात संपूर्ण पुणे शहर जलमय झाल्याची दृश्ये पाहायला मिळाली. रस्त्यांवरून अक्षरशः नद्या वाहत होत्या. संपूर्ण चौकच्या चौक पाण्यात बडून गेले होते. अनेक चार चाकी गाड्या देखील पाण्यात पूर्णपणे बुडाल्या होत्या. अवघ्या दोन तासांच्या पावसात पुणे शहराची ही अवस्था झाली.

पुणे महानगरपालिकेमध्ये सलग पाच वर्ष सत्तेत राहून तत्कालिन सत्ताधाऱ्यांनी काय विकास केला हे आज सिद्ध झाल्याची टीका पाटील यांनी केली. तर पुण्यात समुद्र नाही याची पुणेकरांना कायम खंत होती म्हणूनच की काय भाजपाने पुण्यात समुद्रही आणून दाखवला! असा टोला पाटील यांनी लगावला आहे.

Jayant Patil
Jayant Patil : कांद्याच्या बाबतीत शेतकऱ्यांवर अन्याय : जयंत पाटील

दरम्यान शहराच्या विविध भागात पावसामुळे पाणी साचल्यावरून खासदार सुप्रिया सुळे यांच्यासह रविंद्र धंगेकर यांनी देखील जोरदार निशाना साधला. सुळे यांनी समाजमाध्यमावर टीका करताना, जोरदार पावसामुळे शहराची अक्षरशः दैना उडाल्याचे म्हटले आहे. तसेच शहरातील सिंहगड रस्ता परिसरातील माणिकबाग, धायरी, वडगाव व शिवणे परिसरासह शहरातील जवळपास सर्वच रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात पाणी साचले. त्यामुळे नागरीकांना प्रचंड त्रास सहन करावा लागल्याचे सुळे यांनी म्हटले आहे.

तर धंगेकर यांनी निशाना साधताना आजच्या एका दिवसाच्या पावसात स्मार्टसिटीची अक्षरशः दाणादाण उडाली. पुढच्या ५० वर्षाचा विचार करून केलेला विकास तातडीने पाण्याखाली गेला. प्रामाणिकपणे टॅक्स भरून आमच्या नशिबी पुन्हा हाल अपेष्टाच आल्याचे धंगेकर यांनी म्हटले आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com