Pune Monsoon Rain : मॉन्सून पूर्व पावसाच्या दणक्यात पुण्याची दाणादाण; सुप्रिया सुळेंची टीका

Pune Rain News : राज्यात यंदा मॉन्सूनची दणक्यात सुरूवात झाली असतानाच पुण्यात मात्र मॉन्सून पूर्व पावसाने अक्षरशः दैना उडवून दिली आहे.
Pune Monsoon Rain
Pune Monsoon Rain Agrowon
Published on
Updated on

Pune News : राज्यात यंदा मॉन्सूनची दणक्यात सुरूवात झाली आहे. त्यामुळे चातकाप्रमाणे वाट पाहणाऱ्या शेतकऱ्याला दिलासा मिळाला आहे. अनेक जिल्ह्यांमध्ये आता खरीपाच्या कामाला वेग आला असून शेतकरी पेरणीच्या कामात गुंतला आहे. यादरम्यान पुण्यात शनिवारी (ता.०८) झालेल्या मॉन्सून पूर्व पावसाने अक्षरशः दैना उडवून दिली आहे. यावरून आता राजकारण तापले असून खासदार सुप्रिया सुळे यांच्यासह रविंद्र धंगेकर यांनी रविवारी (ता.०९) टीका केली आहे. तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह नवनिर्वाचित खासदार मुरलीधर मोहोळ यांनी आपण याबाबत बैठका घेऊन प्रश्न सोडवू असे म्हटले आहे.

पुणे शहराची अक्षरशः दैना उडाली : सुळे

पुणे शहरासह राज्याच्या विविध भागात पावसाची चांगली सुरूवात झाली आहे. यादरम्यान शनिवारी झालेल्या जोरदार पावसामुळे पुणे शहर आणि परिसराची अक्षरशः दैना उडाली. यावरून शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी समाजमाध्यमावर जोरदार टीका केली आहे. सुळे म्हणाल्या, पुणे शहराची जोरदार पावसामुळे अक्षरशः दैना उडाली. शहरातील सिंहगड रस्ता परिसरातील माणिकबाग, धायरी, वडगाव व शिवणे परिसरासह शहरातील जवळपास सर्वच रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे. तसेच लगतच्या अनेक सोसायट्या आणि वस्त्यांमध्ये देखील पाणी शिरले असून नागरीकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे.

Pune Monsoon Rain
Supriya Sule : दूध दरावरून सुप्रिया सुळे भडकल्या; म्हणाल्या, "दूध दर सात दिवसात पुर्ववत करा अन्यथा रस्त्यावर उतरू"

महापालिकेने पावसाळ्याच्या तोंडावर आवश्यक असणाऱ्या उपाययोजना केल्या नाहीत. त्यामुळे हे पाणी तुंबले असे नागरीकांचे म्हणणे आहे. पावसाळा अत्ताच सुरू झाला असतानाच हे चित्र पहावे लागत आहे. त्यामुळे पुढच्या दिवसात नागरीकांना किती त्रास सहन करावा लागेल याची कल्पना उद्भवलेल्या परिस्थितीवरुन लक्षात येते, अशी टीका सुळे यांनी केली आहे.

नालेसफाई घोटाळा झाला खोटा : धंगेकर

पुण्यातील जलमयस्थितीवरून रविंद्र धंगेकर यांनी देखील जोरदार निशाना साधला आहे. धंगेकर यांनी, आजच्या एका दिवसाच्या पावसात स्मार्टसिटीची अक्षरशः दाणादाण उडाली. सर्वच रस्त्यांवर पाणी साचले. आज प्रत्येक पुणेकर ट्रॅफिक जॅममध्ये अडकला आहे. पुढच्या ५० वर्षाचा विचार करून केलेला विकास तातडीने पाण्याखाली गेला. प्रामाणिकपणे टॅक्स भरून आमच्या नशिबी पुन्हा हाल अपेष्टाच आल्याची टीका धंगेकर यांनी केली आहे. तसेच पुणेकरांनो तुम्ही कुणाला जाब विचारायचा भानगडीत पडू नका, कारण "पाऊसच जास्त झाला" असे त्यांचे नेहमीचे उत्तर ठरलेले आहे. सुखरूप घरी पोहचा... काळजी घ्या... असा टोलाही धंगेकर यांनी लगावला आहे.

Pune Monsoon Rain
Monsoon Update : महाराष्ट्रात मॉन्सून दाखल

अजित पवार यांचे स्पष्टीकरण अन् सूचना

यादरम्यान पुणे शहर परिसरात पाऊस कमी वेळेत जास्त पडल्यामुळे जनजीवन विस्कळीत झाल्याचे स्पष्टीकरण उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले आहे. तसेच पुण्यातील तुंबलेल्या पाण्यावरून प्रशासनाकडून माहिती घेण्यात आली आहे. याबाबत तातडीने उपाययोजना करण्यासह नागरीकांना मदत करण्याच्या सूचना दिल्या आहेत. तसेच विस्कळीत वाहतूक सुरळीत करण्याच्या सूचना देखील दिल्याचे पवार यांनी म्हटले आहे.

मोहोळ यांचे आश्वासन

पुणे शहर परिसरात मॉन्सूनमुळे जनजीवन विस्कळीत झाल्यावरून टीका होत आहे. यावरून नवनिर्वाचित खासदार मुरलीधर मोहोळ यांनी, यंदाच्या पावसाने नागरिकांचं नुकसान होणार नाही आणि रस्ते तुंबणार नाही, याची काळजी घेतली जाईल. त्याबाबत लवकरच प्रशासनाची बैठक घेणार असल्याचे आश्वासन मोहोळ यांनी दिले आहे.

पुण्यात ढगफुटीसदृष्य पाऊस

शनिवारी सायंकाळी ४ वाजेच्या सुमारास अचानक मुसळधार पावसाने हजेरी लावली. त्यामुळे पुणेकरांची तारांबळ उडाली. शिवाजी नगर, जेएम रस्ता, हडपसर, सिंहगड रोड परिसर, वारजेसह शहराच्या विविध भागात पाऊस सुरू होता. सायंकाळी ४ वाजता सुरू झालेला पाऊस रात्री ८ वाजेपर्यंत होता. यामुळे आपटे रोड परिसरातील रस्त्याला नदीचे स्वरूप आले होते. तर येरवडा परिसरात पाणीच पाणी झाले. येथे अनेक ठिकाणी पाणी घरांमध्ये घुसल्यामुळे सामानाचे नुकसान झाले. तसेच पुणेकरांचे प्रचंड हाल झाले. त्यामुळे पुणे महानगरपालिकेने केलेल्या नालेसफाईवर आता प्रश्नचिन्ह उपस्थित केला जात आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com