Jayant Patil : कांद्याच्या बाबतीत शेतकऱ्यांवर अन्याय : जयंत पाटील

Onion Update : कांद्याच्या बाबतीत वाईट पद्धतीने शेतकऱ्यांवर अन्याय होत आहे. कांदा उत्पादक भाजपला मतदान करणार नाही. त्यांना बहिष्कार टाकायचे ठरविले आहे.भाजप कांद्याचा विरोधक झाला.
Jayant Patil
Jayant PatilAgrowon
Published on
Updated on

Nashik News : कांद्याच्या बाबतीत वाईट पद्धतीने शेतकऱ्यांवर अन्याय होत आहे. कांदा उत्पादक भाजपला मतदान करणार नाही. त्यांना बहिष्कार टाकायचे ठरविले आहे.भाजप कांद्याचा विरोधक झाला. या भागातला शेतकरी मतदानाची वाट बघत आहे. मतदानातून ते नाराजी व्यक्त करतील, असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी व्यक्त केला.

Jayant Patil
Onion Auction : पांढुर्ली उपबाजारात कांद्याचे लिलाव सुरू

पाटील शनिवारी (ता. २०) नाशिक जिल्हा दौऱ्यावर होते. त्या वेळी त्यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना कांदा प्रश्नावर भाष्य केले. यावेळी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष कोंडाजीमामा आव्हाड, प्रदेश उपाध्यक्ष गोकूळ पिंगळे आदी उपस्थित होते.

महायुतीच्या जागावाटपावर त्यांनी टीका करीत जागावाटपात महायुतीत विसंवाद असल्याचे सांगितले. दुसऱ्या पक्षाचा उमेदवार निवडून येणार नाही, आपल्या पक्षाचाच उमेदवार उभा करा, अशी त्यांची मानसिकता आहे. त्यामुळे उमेदवार ठरविण्यास त्यांचा विलंब होत आहे. उमेदवारांच्या बाबतीत एवढा गोंधळ असेल तर लोकसभेत कसे लोकप्रतिनिधित्व करतील, अशी शंका लोकांच्या मनात येईल, असे पाटील यांनी सांगितले.

Jayant Patil
Onion Harvesting : कांदा काढणीचा दर एकरी १२ हजार रुपयांवर

दिंडोरी मतदारसंघात राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून भास्कर भगरे हे उमेदवार उभे आहेत. नियोजन करण्यासाठी आलो आहे. महायुतीतील जागा वाटपावर बोलताना पाटील यांनी महायुतीत विसंवाद असल्याने, तसेच आपल्या पक्षाची उमेदवारी करण्याची मानसिकता असल्याने उमेदवारीबाबत विलंब होत असल्याचे सांगितले.

मंत्री छगन भुजबळ यांच्याबाबत मला माहीत नाही, त्यांच्या पक्षात काय चालू आहे. आमच्या पक्षात असताना ते आमचे नेते होते. तिकडे गेल्यावर त्यांच्यात काय परिस्थिती आहे मला कसे कळणार, असे त्यांनी सांगितले. उपमुख्यमंत्री अजित पवार, आमदार रोहित पवार यांच्या आरोप-प्रत्यारोपांवर भाष्य करण्याचे त्यांनी टाळले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com