
Panchayat Raj : भारतीय संविधानाच्या ७३ व ७४ दुरुस्तीनुसार प्रत्येक राज्यासाठी राज्य निवडणूक आयोगाची स्थापना करण्यात आली. त्यानुसार महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाची स्थापना २६ एप्रिल १९९४ रोजी करण्यात आली.
संविधानातील भाग -९ मधील अनुच्छेद २४३ नुसार ग्रामीण भागातील स्थानिक स्वराज्य संस्था (जिल्हा परिषद, पंचायत समिती व ग्रामपंचायत) आणि अनुच्छेद (२४३ ZA) नुसार नागरी भागातील स्थानिक स्वराज्य संस्था (महानगरपालिका, नगर परिषद व नगर पंचायत) यांच्या निवडणुका घेण्याची संविधानिक जबाबदारी राज्य निवडणूक आयोगावर सोपविण्यात आलेली आहे.
संविधानातील सदर अनुच्छेदातील तरतुदीनुसार निवडणुकांसाठी मतदार याद्या तयार करण्याच्या कामाचे अधिक्षण, संचलन आणि नियंत्रण आणि अशा निवडणुकांचे आयोजन अशी जबाबदारी राज्य निवडणूक आयोगावर सोपविलेली आहे. हा आयोग भारतीय निवडणूक आयोगाच्या आधिपत्त्याखाली काम करतो. त्याचे निर्णय याला बंधनकारक असतात.
वित्त आयोग
केंद्र शासन राज्यघटनेच्या अनुच्छेद २८० दर पाच वर्षांनी केंद्रीय वित्त आयोग गठित करते.
वित्त आयोग आयोगाची मुख्य कार्यकक्षा म्हणजे केंद्र व राज्य सरकारच्या वित्तपुरवठ्याचे मूल्यांकन करणे, केंद्रीय कराचे केंद्र व राज्य शासनामध्ये वाटून देण्याचे सूत्र आणि या राज्य शासनाच्या हिश्शातील प्रत्येक राज्याचा हिश्शाच्या करांचे वितरण ठरविणारी सूत्राची शिफारस करणे.
केंद्र शासनाच्या एकत्रित निधीतून राज्यासाठी सहायक अनुदानासाठी शिफारस करणे तसेच स्थानिक संस्थांसाठी निधी वाटपाबाबत शिफारस करण्यात येते.
वित्त आयोगाची स्थापना करण्यामागील घटनात्मक तरतूद
भारतीय संविधानाच्या अनुच्छेद २४३ (झ)(१) व २४३(म) (१) अनुसार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या (ग्रामीण व नागरी) आर्थिक स्थितीचे पुनर्विलोकन करण्यासाठी वित्त आयोग गठित करण्याची शिफारस.
राज्यपाल, आयोगाने या अनुच्छेदा अन्वये केलेली प्रत्येक शिफारस आणि त्यावर केलेल्या कार्यवाहीसंबंधीचे एक स्पष्टीकरणात्मक राज्याच्या विधान मंडळापुढे मांडण्याची व्यवस्था करील.
महाराष्ट्र वित्त आयोग (संकीर्ण तरतूद) अधिनियम, १९९४ मध्ये राज्यासाठी वित्त आयोग स्थापना व त्याच्या संरचनेची तरतूद केली आहे.
उपरोक्त तरतुदींनुसार राज्याने एकूण पाच राज्य वित्त आयोगांची स्थापना केली आहे. वित्त विभाग, मंत्रालय यांनी आयोगांनी सादर केलेल्या अहवालातील शिफारशींवर स्पष्टीकरणात्मक ज्ञापन विधान मंडळासमोर त्या वेळी मांडण्यात येते.
घटनेच्या ११ व्या अनुसूचीतील २९ विषय ग्रामपंचायतीकडे देण्याची शिफारस ः
स्वातंत्र्य प्राप्तीनंतर ग्रामपंचायती पंचायत समिती आणि जिल्हा परिषदा या स्वराज्याच्या घटक झाल्याने त्यांना पुरेशी स्वायत्तता मिळाली. प्रशासकीय अधिकार, निधी आणि आवश्यक मनुष्यबळ देखील मिळाले. राज्य वित्त आयोग आणि केंद्रीय वित्त आयोगामार्फत निधी आणि त्याच्या खर्चाचे आणि नियोजनाचे अधिकार मिळाले. या सर्व बाबींचा योग्य उपयोग करून अनुसूचीतील २९ विषयांवर दीर्घ कालीन नियोजन करून त्याची अंमलबजावणी केल्यास गरम पंचायती आणि सर्वच त्रीस्तरातील स्थानिक स्वराज्य संस्था विकासाचे मापदंड नक्कीच निर्धारित करतील.
घटनेच्या १२ व्या अनुसूचीतील १८ विषय नगरविकास विभागाकडे
७३ व्या घटना दुरुस्तीनंतर लगेचच ७४ वी घटना दुरुस्ती घेण्यात आली. त्यानुसार नागरी भागाचे देखील कार्यवहन सुसूत्रतेमध्ये यावे यासाठी एकूण १८ विषय देखील नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांकडे देण्याची शिफारस करण्यात आलेली आहे.
मागील काही वर्षांतील स्थित्यंतरे पाहत असताना महाराष्ट्रात २०११ च्या जनगणेनेनुसार सुमारे ४५ टक्के नागरी भाग असल्याचे आकडेवारी सांगते. २०२६ मध्ये होणाऱ्या जनगणनेमध्ये ही नक्कीच ५० टक्के आणि त्यावर जाईल असे अभ्यासकांचे मत आहे.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.