Slit Remove Works : झेडपी, जलसंधारण, जलसंपदाची कामे ठप्प

Work Update : सोलापूर जिल्ह्यात यंदा पाणीटंचाईचे संकट गंभीर झाले आहे. टंचाईच्या संकटाला तोंड देत असतानाच जिल्हा प्रशासनाच्यावतीने आगामी काळातील टंचाई रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना सुरू आहेत.
Slit Removal
Slit RemovalAgrowon

Solapur News : सोलापूर जिल्ह्यात यंदा पाणीटंचाईचे संकट गंभीर झाले आहे. टंचाईच्या संकटाला तोंड देत असतानाच जिल्हा प्रशासनाच्यावतीने आगामी काळातील टंचाई रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना सुरू आहेत.

गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवारमधून मंजूर झालेली ७९ अद्यापही ठप्प आहेत. ही कामे सुरू होण्यासाठी मुहूर्त मिळत नसल्याचे दिसते. काम न सुरू केलेल्या यंत्रणांमध्ये जिल्हा परिषदेचा लघु पाटबंधारे विभाग, जलसंपदा, मृद व जलसंधारण विभागाचा समावेश आहे.

Slit Removal
Road Work Update : पाणंद रस्त्यांची ८५० हून अधिक कामे ठप्प

गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार अभियानांतर्गत २५२ कामामधून ८१ कामे पूर्ण झालेली आहेत. सद्यःस्थितीमध्ये २७ जलसाठ्यामधून गाळ काढण्याचे काम सुरू आहे. त्यातून आत्तापर्यंत ११.६१ लक्ष घनमीटर गाळ काढला आहे.

या योजनेतून मंजूर असलेल्या कामांपैकी ७९ कामे सुरू झालेली नाहीत. त्यामधील १५ कामे ही जलसंपदा विभागाशी निगडित आहेत. जिल्हा परिषदेच्या लघु पाटबंधारे विभागाशी निगडित असलेल्या ५१ कामांचा समावेश आहे. मृद व जलसंधारण विभागाशी निगडित असलेल्या १३ कामांचा यामध्ये समावेश आहे.

Slit Removal
Dam Work Rajapur : राजापुरातील नव्या धरणाचे काम रखडले, पाणीटंचाईची समस्या

या योजनेतून पूर्ण झालेल्या ८१ कामांपैकी ५२ कामे २०२३ मध्ये पूर्ण होऊन त्यातून २१.२३ लक्ष घनमीटर गाळ काढण्यात आला आहे. हा गाळ अंदाजे ६०० हेक्टरवर टाकला आहे. या योजनेतून २०२४ मध्ये २९ कामांमधून २०.६१ लक्ष घनमीटर गाळ काढण्यात आला आहे. हा गाळ अंदाजे ५५० हेक्टर क्षेत्रावर पसरवला आहे.

या योजनेतून काम मंजूर आहे. परंतु काम सुरू न करणाऱ्या, काम वेळेत पूर्ण न करणाऱ्या शासकीय यंत्रणांच्या बाबतीत, ठेकेदारांच्या बाबतीत जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद काय निर्णय घेतात? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com