Scholarship Exam : शिष्यवृत्ती परीक्षांच्या जादूगार

ZP School Education : उपक्रमशील आणि अध्यापन कुशल असणाऱ्या जयश्री पलांडे यांनी आपल्या वैशिष्ट्यपूर्ण कामाने ठसा उमटविला आहे. वर्गातील ५० विद्यार्थ्यांपैकी ४२ विद्यार्थी गुणवत्ता यादीत आले. त्यांपैकी सहा विद्यार्थी राज्य गुणवत्ता यादीत होते.
Scholarship Exam : शिष्यवृत्ती परीक्षांच्या जादूगार
Published on
Updated on

डॉ. कैलास दौंड

ZP School Education Improvement : पुणे जिल्ह्यातील वाबळेवाडीची जिल्हा परिषद शाळा ही महाराष्ट्रातील एक नावाजलेली शाळा आहे. साहजिकच येथील शिक्षकही समर्पित भावनेने आणि विद्यार्थ्यांना केंद्रस्थानी ठेवून कार्य करतात. याच शाळेत सौ. जयश्री सुनील पलांडे या सहशिक्षिका म्हणून कार्यरत आहेत. सुरुवातीपासून उपक्रमशील आणि अध्यापन कुशल असणाऱ्या जयश्री पलांडे यांनी आपल्या वैशिष्ट्यपूर्ण कामाचा येथेही ठसा उमटवला.

त्यांच्याकडे आत्तापर्यंत धामारी आणि वाबळेवाडी येथे इयत्ता पाचवीच्या शिष्यवृत्तीचा वर्ग चार वेळा आला. एकूण ९३ विद्यार्थी गुणवत्ता यादीत आलेले आहेत. २०२०-२१ मध्ये कोरोना काळात त्यांनी घेतलेली इयत्ता पाचवीच्या वर्गाची शिष्यवृत्ती परीक्षेची तयारी लक्षवेधी ठरली. वर्गातील ५० विद्यार्थ्यांपैकी तब्बल ४२ विद्यार्थी गुणवत्ता यादीत आले. त्यांपैकी सहा विद्यार्थी राज्य गुणवत्ता यादीत होते.

Scholarship Exam : शिष्यवृत्ती परीक्षांच्या जादूगार
School Education: शाळेत झोपेचा तास ठेवला तर काय होईल?

वाबळेवाडीच्या शाळेत इयत्ता आठवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेचा निकाल उंचावण्यासाठी त्यांनी अध्यापनातून संकल्पना स्पष्ट करणे, नियमितपणे सराव घेणे, प्रश्नपत्रिका सोडून घेणे अशा पद्धतीने सातत्य ठेवल्यामुळे परीक्षेचा निकाल २०२२ मध्ये नव्वद टक्के लागून २८ विद्यार्थी गुणवत्ता यादीत झळकले तर चार विद्यार्थी राज्य गुणवत्ता यादीत आले.

प्रयत्नातील सातत्यामुळे २०२३ वर्गातील ४१ विद्यार्थ्यांपैकी ३५ विद्यार्थी गुणवत्ता यादीत आले, हा एक विक्रमच होता. त्यांपैकी पाच विद्यार्थी राज्य गुणवत्ता यादीत देखील आले होते. ग्रामीण विभागातून राज्यात तिसरा आलेला रूत्विज सावंत हा पलांडे मॅडमचाच विद्यार्थी!

NMMS परीक्षा ही इयत्ता आठवी साठी असलेली महत्त्वाची परीक्षा. ही परीक्षा उत्तीर्ण झाल्यावर विद्यार्थ्यांना चांगली स्कॉलरशिप मिळते. शिष्यवृत्ती परीक्षेसोबतच मॅडमनी जाणीवपूर्वक प्रयत्न करून NMMS परीक्षेची वर्गाची तयारी करून घेतली. या प्रयत्नांची फलश्रुती म्हणून ६१ विद्यार्थी गुणवत्ता यादीत आले.

सारथी शिष्यवृत्तीसाठीही १४ विद्यार्थी पात्र झाले. त्यामुळे या विद्यार्थ्यांना शासनाकडून ४१, ९७, ६०९ रुपये इतकी रक्कम मिळेल. यात आणखी एक विशेष म्हणजे इयत्ता तिसरी मधून शाळा सोडलेला ओंकार देवकुळे नावाचा विद्यार्थी वयोगटानुसार इयत्ता सहावी मध्ये दाखल झाला. त्या विद्यार्थ्याला सुद्धा इयत्ता आठवी मध्ये ही शिष्यवृत्ती मिळाली.

विद्यार्थ्यांना प्रेरणा देत स्पर्धात्मक वातावरण तयार करण्यासाठी त्यांनी बक्षीस ठेवले. इयत्ता आठवीतील विद्यार्थ्यांना वर्षाच्या सुरुवातीला आव्हान दिले की, जर ८४ टक्के विद्यार्थी गुणवत्ता यादीत येण्याचा तुमचाच विक्रम तुम्ही आणखी उंचावला तर तुम्हाला खास बक्षीस देण्यात येईल. याचा परिणाम म्हणून जो तो गुणवत्ता यादीत स्थान मिळवण्यासाठी मन लावून अभ्यास करू लागला.

खरोखर तो विक्रम विद्यार्थ्यांनी मोडला आणि ८५ टक्के विद्यार्थी गुणवत्ता यादीत येण्याचा नवीन विक्रम प्रस्थापित केला. बोलल्याप्रमाणे वर्गशिक्षिका म्हणून जयश्री पलांडे यांनी प्रत्येक विद्यार्थ्याला साडेपाचशे रुपये किमतीची स्कूल बॅग बक्षीस म्हणून दिली. NMMS आणि शिष्यवृत्ती मध्ये गुणवत्ता यादीत आलेल्या प्रत्येक विद्यार्थ्याला ही भेट त्यांनी दिली. त्यासाठी २०९०० रुपये स्वतः खर्च केले.

Scholarship Exam : शिष्यवृत्ती परीक्षांच्या जादूगार
Rural Development : ग्रामीण भागाच्या विकासासाठी शिक्षकांच्या पाठीशी

अशा स्पर्धात्मक परीक्षेची तयारी करण्यासाठी दररोज शालेय वेळेपेक्षा अधिकचे किमान तीन तास, शनिवार - रविवार आणि दिवाळीची सुट्टी नाही. हे सगळे आनंदाने, आत्मिक तळमळीने आणि स्वयंस्फूर्तीने करावयाचे हा जयश्री मॅडमचा परिपाठ!

त्याला मिळणारी विद्यार्थ्यांची साथ. हे आपले वैशिष्ट्यपूर्ण काम करत असतानाच शाळेत राबवल्या जाणाऱ्या सर्व सामूहिक उपक्रमातही त्या सहभागी होतात. जवाहर नवोदय विद्यालय प्रवेशासाठी आत्तापर्यंत त्यांच्या सात

विद्यार्थ्यांची निवड झाली आहे. विद्यार्थ्यांच्या नवनिर्मितीला चालना देण्यासाठी केलेला ‘उद्योजकतेची मानसिकता’ या उपक्रमांतर्गत प्रकल्प निर्मिती स्पर्धेमध्ये ‘शेतकऱ्यांचा मित्र’ हा त्यांच्या विद्यार्थ्यांचा प्रोजेक्ट गेल्या वर्षी मध्ये राज्यात प्रथम आला.

महाराष्ट्र राज्य गणित अध्यापक मंडळ आयोजित गणित प्रावीण्य आणि गणित प्रज्ञा या दोन्ही परीक्षेत देखील त्यांच्या विद्यार्थ्यांनी उत्तम कामगिरी केली. MTS परीक्षा २०२४ मध्ये देखील आठवीचे आठ विद्यार्थी राज्य गुणवत्ता यादीत आले.

२०२४ मध्ये पुणे जि. प.च्या वतीने ‘जिल्हा शिक्षक’ पुरस्कार देऊन त्यांच्या कार्याला गौरविण्यात आले आहे. तर शिष्यवृत्ती मार्गदर्शक पुरस्कारही त्यांना सहा वेळा मिळालेला आहे.

(लेखक नामांकित साहित्यिक व शिक्षक आहेत.)

(जयश्री पलांडे ९७६७०२२०८६)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com