Citrus Crop Disease: लिंबूवर्गीय फळ पिकांवरील कोळी

Spider Mite Control: लिंबूवर्गीय फळपिकांवर सध्या कोळी किडीचा प्रादुर्भाव गंभीर बनत आहे, ज्यामुळे पिकांचे मोठे नुकसान होऊ शकते. या किडीच्या नियंत्रणासाठी योग्य उपाययोजना करण्याची गरज आहे, ज्यामुळे नुकसान टाळता येईल.
Citrus Crop
Citrus CropAgrowon
Published on
Updated on

राहुल वडघुले

Citrus Pest Management: लिंबू, मोसंबी आणि संत्रा या लिंबूवर्गीय फळपिकांमध्ये विविध कीड-रोगांचा प्रादुर्भाव दिसून येतो. त्यात मुख्यत: खोड पोखरणारी आळी, नागअळी, मावा, काळी माशी, लेमन बटरफ्लाय, मिलीबग, फुलकिडे, फळातील रस शोषणारी फुलपाखरे तसेच कोळी किडीचा प्रादुर्भाव आढळून येतो. सध्या लिंबूवर्गीय फळपिकांवर काळी माशी व कोळी किडीचा जास्त प्रादुर्भाव दिसून येत आहे. या किडींच्या प्रादुर्भावामुळे पिकांचे वेगवेगळ्या प्रकारे नुकसान होते. त्यामुळे वेळीच त्यावर नियंत्रणात मिळविणे आवश्यक आहे.

किडीचे नाव : सिट्रस हिंदू माइट (कोळी)

वर्ग : Arachnida

शास्त्रीय नाव : Schizotetranychus hindustanicus

नुकसानीचा प्रकार : रस शोषक

नुकसान होणारा झाडाचा भाग : पाने, फळे

यजमान पिके : एरंडी, फ्रेंच बीन, लिंबूवर्गीय पिके.

नुकसान : या किडीच्या प्रादुर्भावामुळे फळपिकांचे साधारणतः २० ते ५० टक्क्यांपर्यंत नुकसान होण्याची शक्यता असते.

नुकसान करणारी अवस्था : प्रौढ आणि पिल्ले अवस्था सोंडेसारखा अवयव पानामध्ये घुसवून आतील रस शोषण करतात.

Citrus Crop
Lemon Prices: वाढत्या उन्हामुळे लिंबाला मागणी

लक्षणे

कोळी किडीच्या प्रादुर्भावाची लक्षणे पाने व फळांवर दिसून येतात.

कीड पानाच्या मागील बाजूस राहून रस शोषण करते. त्यामुळे पानावर अत्यंत विशिष्ट प्रकारचे पांढऱ्या रंगाचे ठिपके पडतात.

हे कोळी अतिशय सूक्ष्म असल्यामुळे उघड्या डोळ्यांनी दिसत नाहीत. तसेच इतर कोळी प्रमाणे हे जाळे तयार करत नाहीत, त्यामुळे प्रादुर्भावाची लक्षणे लवकर लक्षात येत नाहीत.

हे कोळी फळावर हल्ला करत नाहीत. परंतु बऱ्याच वेळा फळांवर देखील अशा प्रकारची पांढरी ठिपक्यांची लक्षणे दिसतात.

जीवनक्रम

कोळी किडीच्या अंडी, अळी, प्रोटोनिम्फ, डिटोनिम्फ आणि प्रौढ अशा एकूण पाच अवस्था असतात.

कोळी किडीचा संपूर्ण जीवनक्रम १२ ते २० दिवसात पूर्ण होतो. किडीची मादी सुमारे ५० ते ५५ अंडी घालते. अंडी अवस्था ५ दिवसांची असते.

अंडी : मादी कोळी एक किंवा समूहात ५० ते ५५ गोलाकार पिवळसर रंगाची अंडी घालते. ही अवस्था ४ ते ५ दिवसांची असते.

अळी : ही पहिली अवस्था अंड्यामधून निघते. या अवस्थेतील अळीला ६ पाय असतात. ती १ ते २ दिवसांची असते.

प्रोटोनिम्फ आणि डिटोनिम्फ : अळी अवस्थेनंतर ही अवस्था सुरू होते. या अवस्थेत ८ पाय असतात. हे प्रौढ कोळी सारखे दिसतात, मात्र आकाराने लहान असतात. हे पानाच्या पेशी खातात. प्रत्येक अवस्था ही २ ते ३ दिवस राहते.

प्रौढ : शरीर अंडाकृती असते. नर आकाराने लहान, तर मादी मोठी असते. ही अवस्था १० ते २० दिवसांची असते. पानातील रस शोषण करतात.

Citrus Crop
Lemon Rate : सोलापूरच्या बाजारात लिंबाचे दर घसरले

नियंत्रणाचे उपाय

नत्रयुक्त खतांचा अति वापर टाळावा.

पिकास पाण्याचा ताण पडणार नाही याची काळजी घ्यावी. योग्य वेळेत सिंचन करावे.

बागेत तणांचा प्रादुर्भाव होणार नाही याची काळजी घ्यावी. वेळीच तण नियंत्रणासाठी उपाययोजना कराव्यात.

पानांवर व फळांवर धूळ येणार नाही याची काळजी घ्यावी. त्यासाठी रस्त्यालगत असलेल्या लिंबूवर्गीय फळबागांभोवती कापड लावावे. जमिनीवर आच्छादन करावे. झाडांवर पाण्याची फवारणी करावी.

कोळी किडीचे नियंत्रण करणाऱ्या शत्रू कोळी (Phytoseiulus persimilis, Amblyseius spp.), ढालकिडा (लेडी बर्ड बीटल) यांचे संवर्धन करावे.

निमतेल तसेच धुरळणीद्वारे सल्फरचा वापर फायदेशीर ठरू शकतो. तत्पूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.

रासायनिक नियंत्रण

डायफेन्थ्युरॉन (५० टक्के डब्ल्यूपी)

स्पायरोटेट्रामेट (१५.३१ टक्के डब्ल्यू/डब्ल्यू ओडी)

सूक्ष्मदर्शिकेखाली काय दिसते ?

कोळी अत्यंत सूक्ष्म म्हणजे ०.३ ते ०.५ मिमी इतक्या आकाराचे असल्यामुळे उघड्या डोळ्यांनी दिसत नाहीत.

किडीचा रंग फिक्कट पिवळा, तर हिरवट पांढरा असतो. आकार अंडाकृती दिसतो, तर डोक्याच्या बाजूला थोडा चपटा झालेला असतो. वरील आणि खालील बाजूने हे चपटे असतात. पाठीच्या बाजूला केस असतात.

दोन लाल रंगाची डोळे डोक्याच्या बाजूला दिसून येतात. शरीराच्या एका बाजूला चार आणि दुसऱ्या बाजूला चार असे एकूण आठ पाय दिसून येतात.

नर हे आकाराने मादीपेक्षा लहान असतात. मादी जास्त गोलाकार असते. पिले आकाराने लहान प्रौढ कोळी सारखेच दिसतात. त्यांच्या पाठीवर काळे ठिपके असतात.

किडीला Piercing and Sucking प्रकारचे तोंड असते. याचा वापर करून ते पानांमधील रस शोषण करतात.

किडीची अंडी गोलाकार पिवळसर रंगाची असते.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com