Water Management : मराठवाडा पाणी परिषद : पाण्यासारखा पैसा नव्हे, पैशासारखं पाणी जपा

Marathwada Pani Parishad : खाद्याने आर्थिक उधळपट्टी केली तर आपण पाण्यासारखा पैसा खर्च केला असे म्हणतो आता पुढील काळात पैशासारखे पाणी खर्च करा, वापरा त्याला जपा असे म्हणावे लागेल, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी डॉ.दिलीप स्वामी यांनी केले.
Marathwada Pani Parishad
Marathwada Pani Parishad Agrowon
Published on
Updated on

Chh. Sambhajainagar News : एखाद्याने आर्थिक उधळपट्टी केली तर आपण पाण्यासारखा पैसा खर्च केला असे म्हणतो आता पुढील काळात पैशासारखे पाणी खर्च करा, वापरा त्याला जपा असे म्हणावे लागेल, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी डॉ.दिलीप स्वामी यांनी केले.

मराठवाडा विभागातील जलसंधारणाच्या महत्त्वपूर्ण प्रश्नावर विधायक चर्चा करण्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या गोपीनाथराव मुंडे राष्ट्रीय ग्रामीण विकास आणि संशोधन संस्था व मालवीय मिशन टीचर्स ट्रेनिंग सेंटर यांच्या संयुक्त विद्यमाने येत्या सोमवारी (ता. १०) एक दिवसीय मराठवाडा पाणी परिषदेचे आयोजन करण्यात आले. त्याचे उद्घाटक म्हणून जिल्हाधिकारी स्वामी बोलत होते.

या परिषदेत जलतज्ज्ञ, धोरणकर्ते व भागधारकांना एकत्र आणण्याचा प्रयत्न होता. परिषदेचे उद्घाटन विद्यापीठाच्या नाट्यगृहात करण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी कुलगुरू डॉ. विजय फुलारी होते. यावेळी प्र कुलगुरू डॉ. वाल्मीक सरवदे, जलदूत किशोर शितोळे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.

Marathwada Pani Parishad
Water Management : पाणीदार गावासाठी आराखड्याचे नियोजन

उद्घाटनप्रसंगी जिल्हाधिकारी स्वामी म्हणाले, की निसर्गाने माणसाला उपलब्ध करून दिलेल्या जल, भूमी, झाडे या बाबींकडे माणसाचे दुर्लक्ष होत आहे. नैसर्गिक स्रोत विचारात घेऊन पाण्याचे व्यवस्थापन केले पाहिजे. विशेषतः घरगुती वापरासाठी तोलून मापून पाणी वापरले पाहिजे, असेही डॉ. स्वामी म्हणाले.

यावेळी पाणलोट विकासाची तत्त्वे या डॉ. सतीश पाटील व डॉ. चंद्रशेखर पवार यांच्या तसेच महाराष्ट्र राज्यातील ग्रामीण उपजीविकेवर बांबू शेतीचा सामाजिक, आर्थिक प्रभाव या डॉ. संजय साळुंके यांच्या व जलव्यवस्थापन महाराष्ट्राच्या शाश्वत विकासाचा ध्यास या डॉ. डी. बी. पानसकर यांच्या पुस्तकांचे प्रकाशन करण्यात आले. कुलगुरू डॉ. फुलारी म्हणाले, की निसर्गावर मात करण्याच्या वृत्तीमुळे निसर्गाचा ऱ्हास होत आहे. उद्घाटन सत्राचे सूत्रसंचालन डॉ. मुस्तजिब खान यांनी केले.

Marathwada Pani Parishad
Water Management : पाण्याचे योग्य नियोजन करावे ः अजित पवार

दिवसभर मंथन...

परिषदेत दिवसभर चार सत्रात मंथन करण्यात आले यामध्ये भास्कर मुंडे, डॉ.अशोक तेजनकर, नरहरी शिवपुरे, संतोष जोशी, डॉ.सुहास आजगावकर यांनी अनुभव कथन केले. तर तिसऱ्या सत्रात जल व्यवस्थापन - नागरी, औद्योगिक पाण्याची विवेकी वापर, भूजल पुनर्भरण आणि जलसंधारण तंत्र, शेतीसाठी पाणी व्यवस्थापन आणि बदलत्या हवामानाला अनुकूल शेती, जलधोरणे आणि सरकारी योजना या विषयावर चर्चा झाली.

यामध्ये डॉ.उपेंद्र कुलकर्णी, डॉ.अशोक तेजनकर, डॉ.दत्तात्रय रेगूलवार, डॉ.सुहास आजगावकर, प्रा.अश्विनी रांजणीकर, प्रा.कौशल्या लोंढे, नरहरी शिवपुरे, संतोष जोशी, अरविंद नरोडे, अ‍ॅड.राजेंद्र काळे, पराग सदगीर, अ‍ॅड.जयसिंग हिरे, सर्जेराव वाघ यांनी सहभाग घेतला.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com