Water Management : पाण्याचे योग्य नियोजन करावे ः अजित पवार

Canal Water Management : जिल्ह्यातील हवेली, इंदापूर, दौंड, बारामती तालुक्यातील शेती सणसर जोड कालव्यावर अवलंबून आहे. त्यासाठीच्या पाण्याचे योग्य नियोजन करून पुणे व पिंपरी-चिंचवड महानगरपालिकांनी १५ जुलैपर्यंतच्या पाण्याचे काटेकोरपणे नियोजन करावे.
Ajit Pawar
Ajit PawarAgrowon
Published on
Updated on

Pune News : जिल्ह्यातील हवेली, इंदापूर, दौंड, बारामती तालुक्यातील शेती सणसर जोड कालव्यावर अवलंबून आहे. त्यासाठीच्या पाण्याचे योग्य नियोजन करून पुणे व पिंपरी-चिंचवड महानगरपालिकांनी १५ जुलैपर्यंतच्या पाण्याचे काटेकोरपणे नियोजन करावे. यासाठी सर्व यंत्रणा सज्ज ठेवून तारतम्याने कामे पूर्ण करा, पाणी गळती शोधून त्याची दुरुस्ती करा, अशा सुचना राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केल्या.

जिल्ह्यातील विविध धरण प्रकल्पांच्या कालवे सल्लागार समित्यांची बैठक उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली आणि जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत विभागीय आयुक्त कार्यालयात शनिवारी (ता. १) झाली. त्या वेळी उपमुख्यमंत्री श्री. पवार यांनी या सुचना केल्या.

Ajit Pawar
Water Management : दरवर्षी लाखो लिटर पाणी वाया; जल व्यवस्थापनाची तातडीची गरज

या वेळी मंत्री दत्तात्रय भरणे, नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ, खासदार मेधा कुलकर्णी, आमदार रामराजे नाईक निंबाळकर, विजय शिवतारे, राहुल कुल, चेतन तुपे, सिद्धार्थ शिरोळे, भीमराव तापकीर, हेमंत रासने, बापूसाहेब पठारे, ज्ञानेश्वर ऊर्फ माऊली कटके, विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार, मनपा आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले, पिंपरी-चिंचवड मनपा आयुक्त शेखर सिंह, जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, पाटबंधारे विभागाचे कार्यकारी संचालक अतुल कपोले तसेच उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, खासदार सुप्रिया सुळे दुरदृश्य प्रणालीद्वारे उपस्थित होते.

उपमुख्यमंत्री श्री. पवार म्हणाले, ‘‘नवीन मुठा उजवा कालवा पहिले आवर्तन कालावधी ६० ऐवजी ५५ दिवस व दुसरे आवर्तन दौंड नगरपालिका व इतर पिण्याच्या पाण्यासाठी ३८ ऐवजी ४५ दिवस करावे, जनाई-शिरसाई उपसा सिंचन योजनेच्या कामाची निविदा मंजूर करण्यात आली असून चांगल्या प्रतीची पाइपलाइन करा, कंत्राटदारांनी कामात कोणत्याही प्रकारची दिरंगाई केल्यास त्यांना काळ्या यादीमध्ये टाकण्यात येईल. जनाई-शिरसाई योजनेच्या कामासाठी आवश्यक निधी शासनाकडून उपलब्ध करून देण्यात येईल.’’

Ajit Pawar
Water Management : पाणीदार गावासाठी आराखड्याचे नियोजन

जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील म्हणाले, ‘‘प्रकल्प आराखड्यानुसार मंजूर करण्यात आलेले पाणी सर्व प्रकल्पांना वितरित करावे. उपसा सिंचन पाणीपट्टी वाढीला स्थगिती देण्यात आली आहे. सर्व गावांतील शेतकऱ्यांना समान पाणी देण्यात यावे, पंढरपूर व सांगोला येथे आवर्तन सुरळीत करण्याची कार्यवाही तातडीने करावी, सणसर जोड कालव्याला मंजूर पाणी देण्यात यावे. कालव्यांची दुरुस्ती आवश्यक असल्यास एका आठवड्यात पूर्ण करावी, पाण्याचा पुनर्वापर करण्यावर भर द्यावा, पाण्याच्या वापरावर नियंत्रण ठेवण्यासाठी मीटर बसवावेत.’’

सणसर जोड कालव्यासाठी ३.९ टीएमसी पाणी मंजूर आहे. या कालव्याला सिंचन आराखड्यात पाणी देण्यात आले नाही. मंजूर पाणीसाठ्याप्रमाणे पाणी मिळाल्यास इंदापूर तालुक्यातील शेतकऱ्यांना अडचणीला सामोरे जावे लागणार नाही.
- दत्तात्रय भरणे, राज्यमंत्री, क्रीडा व युवक कल्याण विभाग
शहरातील कालव्यांची प्रलंबित कामे तातडीने पूर्ण करावीत. भिलारेवाडी बंधाऱ्याबाबत शहरातील पाणी गळतीबाबत महानगरपालिकेने तातडीने कार्यवाही पूर्ण करावी.
- माधुरी मिसाळ, राज्यमंत्री, नगरविकास विभाग
पुरंदर उपसा सिंचन योजना सुरळीत करावी, भेकराईनगरच्या बोगद्याला अर्थसंकल्पात निधी देण्यात यावा, खडकवासला परिसरातील वाढते प्रदूषण लक्षात घेऊन उपाययोजना कराव्यात.
- सुप्रिया सुळे, खासदार

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com