Agriculture Sowing : अकोल्यातील रखडलेल्या पेरण्यांना वेग

Kharif Season : मागील चार दिवसांत पश्‍चिम विदर्भातील तीनही जिल्ह्यात चांगला पाऊस झाला. काही ठिकाणी होत आहे. या पावसामुळे खरीप हंगामातील रखडलेल्या पेरण्यांना वेग येणार आहे.
Agriculture Sowing
Agriculture SowingAgrowon
Published on
Updated on

Akola News : मागील चार दिवसांत पश्‍चिम विदर्भातील तीनही जिल्ह्यात चांगला पाऊस झाला. काही ठिकाणी होत आहे. या पावसामुळे खरीप हंगामातील रखडलेल्या पेरण्यांना वेग येणार आहे. तर उगवलेल्या पिकांनाही नवसंजिवनी मिळाली. प्रामुख्याने अकोल्यातील ३५ टक्के क्षेत्र आजवर नापेर होते, ते आता पेरणीखाली येईल.

या हंगामात जून महिन्यात सार्वत्रिक पाऊस न झाल्याने अर्धा जुलै लोटण्याच्या मार्गावर असतानाही संपूर्ण क्षेत्रावर पेरणी होऊ शकलेली नाही. अकोला जिल्ह्यात अद्यापही एक लाख हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्रावर पेरणी व्हायची आहे. त्यामुळे पावसाची नितांत गरज होती. रविवारपासून (ता.७) पश्‍चिम विदर्भात मॉन्सून सक्रीय झाला.

Agriculture Sowing
Kharif Sowing : खानदेशात पाऊस सुरूच; ९० टक्क्यांवर पेरण्या पूर्ण

काही भागांत पावसाने जोरदार बरसात केली. अद्यापही पावसाचे वातावरण बनलेले आहे. या पावसाने शेतकऱ्यांना तसेच सर्वसामान्यांनाही दिलासा मिळाला. तापमानात घट झाली आहे. प्रामुख्याने पेरणी करण्यासाठी हा पाऊस पोषक झाला.

अकोला जिल्ह्यात ४ लाख ४३ हजार ११८ हेक्टरपैकी २ लाख ८५ हजार २५ हेक्टरवर पेरणी झाली होती. सरासरीच्या ६४.३२ टक्केही लागवड झाली. पाऊस नसल्याने खारपाण पट्ट्यातील पेरण्या रखड्लया होत्या. आता या पावसाने दिलासा मिळाला. शेतकरी पुन्हा पेरणीच्या तयारीला लागला.

Agriculture Sowing
Agriculture Sowing : यवतमाळ जिल्ह्यात सहा लाख हेक्टरवर पेरणी

पेरणी आटोपलेल्या भागातील पिकांना या पावसाचा मोठा फायदा झालेला आहे. काही भागात पावसात १० दिवसांपेक्षा अधिक खंड निर्माण झाला होता. परिणामी पिकांची वाढ रखडली होती. आता पाऊस झाल्याने पिकांसाठी फायद्याचे झाले आहे. अकोला जिल्ह्यात आतापर्यंत खरिपाचे ६४.३२ टक्के क्षेत्र लागवड झालेले आहे.

प्रकल्पातील साठ्यात वाढ होऊ लागली

चार दिवसांत झालेल्या पावसाने अकोला जिल्ह्यातील प्रकल्पांना फायदा झाला. प्रामुख्याने काटेपूर्णा प्रकल्पात या चार दिवसांत सुमारे ८ टक्क्यांपर्यंत वाढ झाली आहे. सध्या या प्रकल्पात १८.३५ दलघमी साठा झालेला असून २१.२५टक्के एवढा आहे.

काटेपूर्णा प्रकल्पाच्या क्षेत्रात प्रामुख्याने पाऊस झाल्याचा फायदा या प्रकल्पाला झाला. वाण प्रकल्पाचा साठाही २१.४४ दलघमी म्हणजे २६.१६ टक्के एवढा आहे. अकोला जिल्ह्यातील छोट्या प्रकल्पांमध्येही साठा वाढू लागला. नदी-नाले वाहत आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com