Power Supply : ‘भीमा’काठचा वीजपुरवठा दोन तास सुरू राहणार

Agriculture Electricity Update : शेतकऱ्यांच्या सततच्या रेट्यामुळे आता दोन तास वीजपुरवठा सुरू ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिले आहेत.
Electricity
ElectricityAgrowon
Published on
Updated on

Solapur News : उजनी धरणातून सोलापूरसाठी भीमा नदीतून पाणी सोडण्यात आल्याने आणि सोलापूरपर्यंत हे पाणी विनाअडथळा पोहाचावे, यासाठी नदीकाठचा वीजपुरवठा गेल्या पंधरा दिवसांपासून बंद करण्यात आला आहे.

परंतु त्याचा नदीकाठच्या शेतकऱ्यांना फटका बसत असून, पिके करपू लागली आहेत. पण शेतकऱ्यांच्या सततच्या रेट्यामुळे आता दोन तास वीजपुरवठा सुरू ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिले आहेत. परंतु या दोन तासांत किती पाणी उपसा होणार, हा प्रश्न उपस्थित होतो आहे.

Electricity
Electricity Supply : दहा लाख वीजग्राहकांना सहा कोटींचा परतावा

गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यात उन्हाची तीव्रता मोठया प्रमाणात वाढली आहे. तापमान ४० अंश सेल्सिअसच्या घरात गेले आहे. या परिस्थितीत पिकांना झळ बसत असताना, उजनी धरणातील पाणी सोलापूरला सोडल्याने नदीकाठचा वीजबंदचा फटका या भागातील शेतकऱ्यांना बसला आहे.

Electricity
Electricity Supply : पावसाळ्यात वीजयंत्रणेपासून कशी काळजी घ्यावी?

सध्या या भागातील शेतीच्या पाण्यासाठी अडचण झाली आहेच, पण त्याही पेक्षा अधिक जनावरांच्या पिण्याच्या पाण्यासाठी वणवण करण्याची वेळ आली आहे. यात माढा, पंढरपूर, मोहोळ, मंगळवेढा तालुक्यांतील शेतकऱ्यांना त्याचा फटका बसला आहे. वीजपुरवठा सुरू करावा, यासाठी गेल्या काही दिवसांपासून या भागातील शेतकरी सातत्याने प्रशासनाकडे हेलपाटे मारत आहेत.

...पण दोन तासांत किती पाणी उचलणार?

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे पंढरपूर तालुकाध्यक्ष सचिन पाटील यांनीही शिष्टमंडळासह जिल्हाधिकारी आणि संबंधित प्रशासनाकडे निवेदन दिले. पण कोणतीच दखल घेतली जात नव्हती. पण आता सततच्या रेट्यामुळे दोन तास वीजपुरवठा सुरू करण्याचे आदेश जिल्हाधिकारयांनी दिले आहेत. पण या दोन तासांत किती पाणी उपसणार, असा प्रश्न आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com