radhakrishna Vikhe Patil
radhakrishna Vikhe PatilAgrowon

Vithhal Rukmini Mandir : विठ्ठल-रुक्मिणी मंदिर परिसराची पालकमंत्र्याकडून पाहणी

Ashadhi Wari 2023 : आषाढी वारीमध्ये प्रथा परंपरेप्रमाणे पादुका स्नानाचे महत्त्व अनन्यसाधारण असल्याने महाद्वार घाटावरून नदीपात्रात या सोहळ्यासाठी मोठ्या प्रमाणात वारकरी भाविक येतात.
Published on

Pandharpur News : पंढरपूर आषाढी वारीच्या पार्श्‍वभूमीवर श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर, शहर व परिसरात भाविकांना देण्यात सोयीसुविधांचा आढावा घेण्यासाठी महसूल, पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय विकासमंत्री तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी शुक्रवारी (ता. ९) मंदिर व परिसर, महाद्वार चौक, नदीपात्र, पत्रा शेड, ६५ एकराची पाहणी करून आवश्यक त्या सूचना दिल्या.

या वेळी त्यांच्यासमवेत खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर, आमदार समाधान आवताडे, विभागीय आयुक्त सौरभ राव, प्र. जिल्हाधिकारी तुषार ठोंबरे, जिल्हा पोलिस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे, माजी आमदार प्रशांत परिचारक, मंदिर समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिनकर, अतिरिक्त पोलिस अधीक्षक हिम्मत जाधव, प्रांताधिकारी गजानन गुरव, तहसीलदार सुशील बेल्हेकर, मुख्याधिकारी अरविंद माळी उपस्थित होते.

radhakrishna Vikhe Patil
Ashadhi Wari 2023 : संत ज्ञानेश्‍वर महाराज यांच्या पालखीचे आज पंढरपूरकडे प्रस्थान

आषाढी वारीमध्ये प्रथा परंपरेप्रमाणे पादुका स्नानाचे महत्त्व अनन्यसाधारण असल्याने महाद्वार घाटावरून नदीपात्रात या सोहळ्यासाठी मोठ्या प्रमाणात वारकरी भाविक येतात. पोलिस प्रशासनाने घाटावरील गर्दीचे योग्य नियोजन करावे. तसेच महाद्वार घाटावरील अडथळादायी वायर्सच्या पार्श्‍वभूमीवर आवश्यक ती दक्षता घ्यावी.

radhakrishna Vikhe Patil
Ashadhi Wari 2023 : आषाढी वारीच्या आनंद सोहळ्यास प्रारंभ

मंदिर परिसरातील अतिक्रमणे तत्काळ काढावीत, जेणेकरून भाविकांना अडथळा येणार नाही, असे पालकमंत्री विखे पाटील म्हणाले. चंद्रभागा नदीपात्रातील पाणी स्वच्छ रहावे, यासाठी आषाढी एकादशीपूर्वी सात दिवस आधी पाणी सोडावे, तसेच चंद्रभागा नदी पात्रातील खड्डे बुजवावेत. नदी पात्रात धोक्याच्या ठिकाणी बॅरिकेड्‍स तसेच धोक्याच्या ठिकाणाची माहिती देणारे फलक लावावेत. नदीपात्र वेळोवेळी स्वच्छ राहील, याची दक्षता घ्यावी, असेही ते म्हणाले.

दिंड्यांना ओळखपत्र

सोईसुविधा पुरवण्याच्या दृष्टीने नियोजन व्हावे, यासाठी यंदा प्रथमच मानाच्या पालख्यांसमवेत नव्याने येणाऱ्या दिंड्यांना ओळखपत्र देण्यात येणार आहेत. नोंदणीकृत नसलेल्या दिंड्यांना सुविधा देणे अवघड होऊ शकते, त्यामुळे अनोंदणीकृत पालख्या व दिंड्यांनी मंदिर संस्थानकडे तातडीने नोंदणी करावी, असे आवाहनही पालकमंत्री विखे पाटील यांनी केले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com