Rural Development: मान्याचीवाडीत ‘क्यूआर कोड’द्वारे शंभर टक्के कर भरणा

QR Code Tax Collection: पाटण तालुक्यातील मान्याचीवाडी ग्रामपंचायतीने क्यूआर कोडच्या माध्यमातून आपल्या ग्रामस्थांकडून शंभर टक्के कर वसुली केली आहे. २५ वर्षांच्या परंपरेत ही नवीन तंत्रज्ञानाची सुधारणा दाखवताना गावाने एक आदर्श निर्माण केला आहे.
QR Code
QR CodeAgrowon
Published on
Updated on

Satara News: देशात २४ वर्षांत ७८ पुरस्कार घेणाऱ्या पाटण तालुक्यातील मान्याचीवाडी ग्रामपंचायतीने ग्रामविकासात एक-एक पाऊल पुढे टाकत आहे. क्यूआर कोडच्या माध्यमातून सर्व खातेदारांनी घरातूनच ग्रामपंचायतीचा कर भरणा करून वेगळा आदर्श घालून दिला. या सुविधांमुळे नवीन आर्थिक वर्षाच्या पहिल्याच दिवशी शंभर टक्के उद्दिष्ट पूर्ण करत २५ वर्षांची परंपरा कायम ठेवली आहे.

मान्याचीवाडी (ता. पाटण) येथील ग्रामस्थांनी गेल्या वीस वर्षांत लोकसहभागातून गावाचा चेहरामोहराच बदलून टाकला आहे. अवघ्या साडेचारशे लोकसंख्येची मान्याचीवाडी आतापर्यंत शासनाच्या तब्बल ७८ पुरस्कारांची मानकरी ठरली आहे. या गावाने नानाजी देशमुख सर्वोत्तम पंचायत सतत विकास पुरस्कार मिळवत देशपातळीवर आपल्या कामाचा ठसा उमटवला आहे.

QR Code
Rural Development : धुळगावने साधला शेतीसह ग्रामविकास

शासनाच्या ग्रामीण विकासाच्या विविध योजनांमध्ये मान्याचीवाडीचा सहभाग नेहमीच उल्लेखनीय असतो. ग्रामपंचायत गावातील खातेदारांकडून आरोग्य कर, वीज कर, पाणीपट्टी, व्यवसाय कर, घरफळा आदींची कराच्या माध्यमातून वसुली करते. खातेदारांना जिथे असतील तिथूनच कर भरणा करता यावा, यासाठी ग्रामपंचायतीच्या नावे क्यूआर कोड काढला आहे. गावातील प्रत्येक खातेदाराच्या घरावर तो लावल्याने सर्व खातेदार घरातूनच भरणा करत आहेत.

आर्थिक वर्षाच्या पहिल्याच दिवशी एक वर्षाचा आगाऊ कर भरणा करण्याची या ग्रामपंचायतीची परंपरा आहे. सलग २५ वर्षांपासून गावकऱ्यांनी ही परंपरा जपली आहे. गावातील काही ग्रामस्थ नोकरी, व्यवसायानिमित्त परराज्यात राहतात. त्यांनीही तेथूनच घरपट्टी, वीज कर, आरोग्य कर क्यूआर कोडवरून थेट ग्रामपंचायतीच्या खात्यात जमा केला.

QR Code
Rural Development : ग्रामपंचायत अधिकाऱ्यांचे कार्य गावविकासासाठी प्रेरणादायी

ग्रामस्थांना ग्रामपंचायतीच्या माध्यमातून अपेक्षित असणाऱ्या सुविधा विनाअडथळा पुरविल्या जात असल्यामुळे येथील खातेदार आर्थिक वर्षाच्या पहिल्याच दिवशी करभरणा करून ग्रामपंचायतीला सहकार्य करत असल्याचे ग्रामसेवक प्रसाद यादव यांनी सांगितले. एक एप्रिलला ग्रामपंचायतीची शंभर टक्के कर वसुली पूर्ण झाली.

या उपक्रमाबद्दल जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन, उपमुख्य कार्यकारी अधिकारी अर्चना वाघमाळे, गटविकास अधिकारी सविता पवार आदींनी अभिनंदन केले.

गावच्या सर्वांगीण विकासासाठी गावातील ज्येष्ठ, तरुण, महिला ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थांनी एकजुटीने दिलेल्या योगदानामुळे गाव प्रगतिपथावर आहे. कर भरणा वेळेत झाल्यास गावातील विकास कामे सुलभ होत असते. हा कर भरणा घसबसल्या करता यावा यासाठी ही क्यूआर कोडची सुविधा देण्यात आली आहे.
रवींद्र माने, सरपंच

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com