Agriculture Technology : स्पेनमधील कृषी तंत्रज्ञानाचा शेतकऱ्यांना फायदा होणार

Spain Agriculture Technology : तंत्रज्ञानाचा अचूक वापर, वैज्ञानिक दृष्टिकोन, योग्य व्यवस्थापन, काढणी पश्चात तंत्रज्ञान, प्रक्रिया उद्योग आणि लहान शेतकऱ्यांचे संघटनात्मक सक्षमीकरण यावर स्पेनमध्ये भर दिला जातो. हे मॉडेल आपल्या शेतकऱ्यांसाठी फायदेशीर ठरू शकते.
Agriculture Technology
Agriculture Technology Agrowon
Published on
Updated on

ॲग्रोवन वृत्तसेवा

Nanded News : नांदेड : तंत्रज्ञानाचा अचूक वापर, वैज्ञानिक दृष्टिकोन, योग्य व्यवस्थापन, काढणी पश्चात तंत्रज्ञान, प्रक्रिया उद्योग आणि लहान शेतकऱ्यांचे संघटनात्मक सक्षमीकरण यावर स्पेनमध्ये भर दिला जातो. हे मॉडेल आपल्या शेतकऱ्यांसाठी फायदेशीर ठरू शकते. या शेतकऱ्यांना मार्गदर्शनाची गरज आहे, अशी माहिती प्रा. व्यंकट शिंदे यांनी दिली.

केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्गमंत्री नितीन गडकरी यांच्या पुढाकाराने आणि सह्याद्री फार्म्सच्या सहकार्याने महाराष्ट्रातील काही निवडक शेतकऱ्यांचा अभ्यास दौरा स्पेन येथे १७ ते २४ फेब्रुवारीदरम्यान आयोजित करण्यात आला होता. सगरोळी (ता. बिलोली) येथील कृषी विज्ञान केंद्राचे प्रा. व्यंकट शिंदे यांची या अभ्यास दौऱ्यासाठी निवड झाली होती. या वेळी त्यांनी स्पेनमधील आधुनिक तंत्रज्ञानाबद्दल माहिती दिली.

Agriculture Technology
Agriculture Technology : दुर्गम दगडधानोऱ्यात कृषी तंत्रज्ञानाचा जागर

स्पेनमध्ये मोठ्या प्रमाणात लिंबू वर्गीय फळपिकांसोबतच ऑलिव्ह, बदाम, पिस्ताची लागवड केली जाते. विशेषतः व्हॅलेंसिया हा प्रांत संत्रा लागवडीसाठी प्रसिद्ध आहे, टँगो हे बी-विरहित आणि उच्च उत्पादनक्षम वाण शेतकऱ्यांच्या आवडीचे आहे. याचे ७०-७५ टन प्रती हेक्टर उत्पादन घेतले जाते. जे महाराष्ट्रातील पारंपरिक उत्पादनाच्या तुलनेत पाचपट अधिक आहे.

रुंद वरंब्यावर केलेली लागवड, छाटणी व झाडाला वळण देण्याचे तंत्रज्ञान, जैविक मल्चिंग, संतुलित अन्न द्रव्यांचा आणि कीटकनाशकाचा वापर आणि अचूक पाणी व्यवस्थापन हे येथील वैशिष्ट्य आहे. विदर्भ, मराठवाडा आणि इतर काही भागातील जमीन व हवामान लिंबूवर्गीय फळ पिकांसाठी अनुकूल आहे मात्र, कमी उत्पादन, तंत्रज्ञानाचा अभाव कीड-रोग समस्या आणि बियांचे अधिक प्रमाण त्यामुळे प्रक्रिया उद्योगांमधे कमी मागणी म्हणून लागवड मर्यादित राहिली आहे. स्पेनचे हवामान ही थोड्या फार प्रमाणात इथल्यासारखेच आहे.

योग्य कालावधीमध्ये तेथील वाण व तंत्रज्ञानाचा अभ्यास करून अवलंब केल्यास या अडचणी दूर होऊ शकतात व गुणवत्ता पूर्ण उत्पादनात वाढ होऊ शकते. सह्याद्री फार्म्सच्या सहकार्याने टँगो वाणाची प्रायोगिक तत्वावर लागवड केली जाणार आहे. सगरोळी (ता. बिलोली) येथील कृषी विज्ञान केंद्राच्या वतीने संघटनात्मक पातळीवर हे तंत्रज्ञान शेतकऱ्यांना उपलब्ध होणार आहे. शेतकऱ्यांना चांगला पर्याय देण्याचा कृषी विज्ञान केंद्राचा प्रयत्न असेल. शेतकरी गटांनी आणि शेतकरी उत्पादक कंपनीने तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली सामूहिकरीत्या अशा वाणांची लागवड व तंत्रज्ञान आत्मसात करण्याचा प्रयत्न करावा. येणाऱ्या समस्यांना एकत्रितरीत्या समोर जावे तरच बदल शक्य आहे, असे व्यंकट शिंदे यांनी सांगितले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com