Election : नितीन गडकरी ६५ टक्के मते घेऊन विजयी होणार

Chandrakant Bavankule : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हेच नागपूरचे उमेदवार राहतील आणि ते ६५ टक्के मते घेऊन विजयी होतील, असा दावा भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी शनिवारी (ता. २) पत्रकार परिषदेत केला.
Nitin Gadkari
Nitin GadkariAgrowon

Nagpur News : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हेच नागपूरचे उमेदवार राहतील आणि ते ६५ टक्के मते घेऊन विजयी होतील, असा दावा भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी शनिवारी (ता. २) पत्रकार परिषदेत केला. या वेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा नमस्कार घरोघरी कार्यकर्त्यांच्या माध्यमातून पोहोचवण्यात येणार असल्याचे सांगितले.

भारतीय जनता युवा मोर्चाच्या अधिवेशनासाठी आयोजित पत्रकार परिषदेत बावनकुळे यांनी १५ मार्चपर्यंत पक्षाच्या वतीने आखण्यात आलेल्या कार्यक्रमांची माहिती दिली. हे बघता आचारसंहिता लागण्यापूर्वीच भाजप प्रचाराची पहिली फेरी पूर्ण करणार असल्याचे स्पष्ट होते.

Nitin Gadkari
Lok Sabha Election : लोकसभेपूर्वी मोहरी ग्रामपंचायतीने दिला बहिष्काराचा इशारा

मोदी सरकारच्या योजनांचा लाभ घेतलेल्या नागरिकांना पंतप्रधानांची नमस्कार पोहोचवण्यात येणार आहे. ३२ हजार ३२३ कार्यकर्ते नमस्काराचे पत्र घेऊन लाभार्थ्यांकडे जाणार आहेत, असेही बावनकुळे यांनी सांगितले. या वेळी प्रदेश उपाध्यक्ष संजय भेंडे, जिल्हाध्यक्ष सुधाकर कोहळे, भाजयुमोचे प्रदेशाध्यक्ष राहुल लोणीकर, विक्रांत पाटील, चंदन गोस्वामी आदी उपस्थित होते.

‘नमो युवा महासंमेलन’

नागपूर विद्यापीठाच्या पटांगणावर सोमवारी (ता. ४) ‘नमो युवा महासंमेलन’ होणार आहे. यात सुमारे एक लाख युवक सहभागी होणार आहेत. या संमेलनाच्या माध्यमातून मागील १० वर्षांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ४० पेक्षा अधिक योजना युवकांसाठी जाहीर केल्या आहेत, त्याची माहिती दिली जाणार आहे. तसेच भविष्यात युवकांसाठी काय करावे याबाबत मतेही युवकांच्या माध्यमातून जाणून घेण्यात येणार आहेत.

Nitin Gadkari
Loksabha Election : निवडणुकीची जबाबदारी काटेकोरपणे पार पाडावी

१० लाख संकल्पपत्रे घेणार

महिला, युवक आणि मोदींच्या नमस्कार या कार्यक्रमांच्या माध्यमातून लोकांची मते जाणून घेण्यात येतील. भाजपने भविष्यात कुठल्या योजना हाती घ्याव्या आणि काय करावे याविषयी मते मागितली जाणार आहेत. अशी एकूण १० लाख संकल्पपत्र केंद्राकडे पाठवली जातील. लोकांच्या मतांचा निवडणूक जाहीरनाम्यात समावेश करणार असल्याचे बावनकुळे यांनी सांगितले.

मोदींचा १५ लाख महिलांशी संवाद

पंतप्रधान नरेंद्र मोदी बुधवारी (ता. ६) आभासी पद्धतीने संपूर्ण विधानसभेतील महिलांशी संवाद साधणार आहेत. नारी शक्ती वंदना कार्यक्रमातून १५ लाख महिलांना ते संबोधित करतील. राज्यातील २८८ विधानसभा मतदार संघांत ऑनलाइन कार्यक्रम होणार असून प्रत्येक मतदार संघातून पाच हजार महिला यात सहभागी होणार आहेत.

अमित शहा उद्या अकोल्यात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा मंगळवारी (ता. ५) अकोला येथे बैठक घेणार आहेत. वर्धा, चंद्रपूर, यवतमाळ, अमरावती आणि बुलडाणा या लोकसभा मतदार संघातील पदाधिकाऱ्यांसमवेत ते बैठक घेणार आहेत. त्यानंतर जळगाव आणि संभाजीनगरला त्यांची जाहीर सभा आयोजित करण्यात आली आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com