Soybean Procurement
Soybean ProcurementAgrowon

Soybean Procurement : सोयाबीन खरेदीचा वेग वाढवायला हवा

Soybean Market : खासगी बाजारात सोयाबीनच्या दराचे वांधे असल्याने किमान आधारभूत किमतीने (हमीभाव) सोयाबीन खरेदीला जिल्ह्यात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.
Published on

Nashik News : खासगी बाजारात सोयाबीनच्या दराचे वांधे असल्याने किमान आधारभूत किमतीने (हमीभाव) सोयाबीन खरेदीला जिल्ह्यात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. जिल्ह्यातील आतापर्यंत सुमारे दोन हजार शेतकऱ्यांनी सोयाबीन विक्रीसाठी नावनोंदणी केली. मात्र, सहा केंद्रांवर फक्त २५० शेतकऱ्यांची सोयाबीन खरेदी झाल्याने वेग वाढविण्याची गरज आहे.

जिल्ह्यात सोयाबीनची एक लाख १६ हजार ५९१ हेक्टरवर पेरणी झाली आहे. यंदा पीक अन उत्पन्नही चांगले आले, मात्र भावाने दगा दिला. दोन वर्षांपूर्वी दहा ते बारा हजार रुपये प्रतिक्विंटलपर्यंत गेलेला सोयाबीनचा भाव पुन्हा चार हजारांवर खाली आला.

Soybean Procurement
Cotton, Soybean Market : शेतकऱ्यांनी जगायचे कसे? खरिपातील ८ पिकांचे भाव पडले; बाजारात साधा हमीभावही मिळेना

आजमितीला बाजार समितीसह खासगी बाजारात ३,७०० ते ४,००२; तर सरासरी ३,९३० भाव मिळत आहे. हमीभावाच्या तुलनेत तब्बल ८०० ते १,००० कमी दर शेतकऱ्यांच्या पदरात पडत असल्याने किमान आधारभूत म्हणजेच हमीभावाच्या विक्रीला शेतकऱ्यांची पसंती आहे.

जिल्ह्यात आतापर्यंत सोयाबीन विक्रीसाठी १,९३८ शेतकऱ्यांनी ऑनलाइन नोंदणी केली आहे. यातील २५० शेतकऱ्यांकडून आतापर्यंत २,७७५ क्विंटल सोयाबीन खरेदी झाली. त्यामुळे वेटिंगला असलेल्या शेतकऱ्यांचा नंबर केव्हा येणार आणि त्यांची सोयाबीन केव्हा खरेदी होणार, हा प्रश्नच आहे.

Soybean Procurement
Soybean Market : सोलापुरात सोयाबीनची केवळ १० हजार क्विंटलचीच खरेदी

येवल्यात तब्बल ६४० शेतकऱ्यांनी नावनोंदणी केली असून, आतापर्यंत १२७ शेतकऱ्यांकडून १,७४३ क्विंटल सोयाबीन खरेदी झाली. विशेष म्हणजे जिल्ह्यातील सहा केंद्रांपैकी निम्मी खरेदी एकट्या येवल्यात झाली आहे.

नावनोंदणीला मुदतवाढ

सोयाबीन विक्रीसाठी ऑनलाइन नावनोंदणीला ३१ डिसेंबरपर्यंत मुदतवाढ दिली आहे. खरेदीची मुदत १५ जानेवारी असून, तोपर्यंत नोंदणी झालेल्या शेतकऱ्यांचा सोयाबीन खरेदी होऊ शकणार नसल्याने आता खरेदीला मुदतवाढ मिळावी आणि वेग वाढवावा, अशी अपेक्षा शेतकऱ्यांची आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com