Soybean rate : सोयाबीन खरेदीची मागणी| भारतरत्न पुरस्कारावरून विरोधकांची टीका|राज्यात काय घडलं?

हमीभावापेक्षा कमी दरानं सोयाबीन खरेदीचे प्रकार घडले. त्यामुळे खरेदी केंद्रही बंद करण्यात आली. त्याचा फटका शेतकऱ्यांना बसतोय. सरकारनं खरेदी केंद्र सुरू करावीत, अशी मागणी शेतकरी करत आहेत.
Soybean rate
Soybean rate
Published on
Updated on

बातमी सोयाबीन खरेदीच्या मागणीची

अमरावती जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी सोयाबीनची खरेदी सुरू करण्याची मागणी केली. अमरावती बाजारात ४ हजार ३०० रुपये क्विंटलचा दर सोयाबीनला मिळतोय. पण शेतकऱ्यांचा त्यातून खर्चही निघत नाही. शेतकऱ्यांचे सोयाबीन घरात पडून आहे. त्यामुळे सरकारनं खरेदी केंद्र सुरू करून सोयाबीनची हमीभावाने खरेदी करावी, अशी शेतकऱ्यांची मागणी आहे. सरकारने खरेदी बंद केल्यानं ४ हजार १०० रुपये क्विंटलने सोयाबीन विकावी लागत आहे, असंही अमरावती जिल्ह्यातील शेतकरी सांगतात. अमरावती जिल्ह्यात काही ठिकाणी खरेदी केंद्र सुरू करण्यात आली होती. परंतु त्यामध्येही हमीभावापेक्षा कमी दरानं सोयाबीन खरेदीचे प्रकार घडले. त्यामुळे खरेदी केंद्रही बंद करण्यात आली. त्याचा फटका शेतकऱ्यांना बसतोय. सरकारनं खरेदी केंद्र सुरू करावीत, अशी मागणी शेतकरी करत आहेत. 

बातमी भारतरत्न पुरस्काराची

केंद्र सरकारनं शुक्रवारी (ता.९) देशाचे माजी पंतप्रधान चौधरी चरणसिंग, माजी पंतप्रधान पी. व्हि नरसिंहराव आणि हरितक्रांतीचे जनक डॉ. एम एस स्वामीनाथन यांना मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार जाहीर केला. त्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदींनी एक्सवरून माहिती दिली. पंतप्रधान मोदींनी चौधरी चरणसिंग आणि डॉ. स्वामीनाथन यांच्या कार्याबद्दल गौरव उद्गार काढत त्यांना भारतरत्न देणं आमच्या सरकारचे भाग्य असल्याचे म्हटले. भारतरत्नच्या घोषणेनंतर राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया उमटल्या. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी तर पत्रकार परिषद घेऊन या घोषणेचं स्वागत केलं. पण जयंत चौधरी एनडीएमध्ये प्रवेश करण्याची शक्यता आहे. जयंत हे चौधरी चरणसिंग यांचे नातू आहेत. त्यामुळं भारतरत्नसाठी सौदेबाजी केली जात असल्याची टीका खरगे यांनी केली. तर शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे प्रमुख तथा माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी डॉ. एमएस स्वामीनाथन यांना पुरस्कार देण्याआधी केंद्र सरकारमध्ये हिंमत असेल तर स्वामीनाथन आयोगाच्या अहवालाची अमंलबजावणी करावी, असे आव्हान दिले आहे. यापूर्वीही लालकृष्ण आडवाणी आणि बिहाराचे माजी मुख्यमंत्री दिवंगत कर्पूरी ठाकूर यांना भारतरत्न पुरस्कार घोषित केला. 

बातमी कांदा निर्यातबंदी विरुद्धच्या आंदोलनाची

कांदा निर्यातबंदीमुळे कांद्याचे दर घसरलेत. केंद्र सरकारने कांद्यावरील निर्यातबंदी तत्काळ मागे घ्यावी या मागणीसाठी देवळा येथे पाचकंदीलवर शुक्रवारी स्वंतत्र भारत पक्षाच्या नेतृत्वाखाली रास्ता रोको करण्यात आला. या रास्ता रोकोमुळे देवळा नाशिक मार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती. आंदोलकांनी केंद्र सरकारच्या विरोधात घोषणाबाजी केली. तसेच निवडणुकीत शेतकरी सत्ताधाऱ्यांना जागा दाखवून देतील, असं म्हणत शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली. आंदोलकांनी प्रशासनाला मागण्याचे निवेदनही दिले. ८ डिसेंबर रोजी केंद्र सरकारनं निर्यातबंदी केली. त्यामुळे शेतकऱ्यांना फटका बसतोय. 

Soybean rate
Agriculture News: राज्यातील सूक्ष्म सिंचनाखालील क्षेत्र वाढल्याचा केंद्रीय कृषिमंत्र्यांचा दावा|शेतकरी व्यापाऱ्यात कापूस दरावरून वाद| राज्यात काय घडलं?

बातमी भारतीय किसान युनियनच्या बंदची

दिल्लीत १६ फेब्रुवारी रोजी ग्रामीण भारत बंदची हाक भारतीय किसान युनियनचे नेते राकेश टिकेत यांनी दिली. १६ फेब्रुवारी रोजी शेतकऱ्यांनी शेतात जाऊ नये, दुकानदारानं दुकान उघडू नयेत. शेतकऱ्यांनी बंदमध्ये सहभागी व्हावं, असंही आवाहन टिकेत यांनी केलं. गुरुवारी ग्रेटर नोएडा भागात शेतकऱ्यांनी जमिनीचा मोबदल्यासाठी रस्त्यावर उतरून संसदेकडे कूच केली होती. मेहंदीपुर गावातील शेतकऱ्यांना संबोधित करून १४ मार्च रोजी दिल्लीच्या दिशेनं शेतकरी संघटना कूच करतील, असंही टिकेत यांनी सांगितलं. त्याआधी १६ फेब्रुवारी रोजी केंद्र सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणांच्या विरोधात गावोगावी बंद करण्यात येणार आहे, असंही टिकेत म्हणाले.

सरकार हमीभावाने शेतीमालाची खरेदी करत नाही. दरवर्षी अर्थसंकल्पात शेतीसाठीच्या तरतूदीत कपात करण्यात येत आहे, सरकार शेतकऱ्यांना छळत आहे, त्याविरोधात भारतीय किसान युनियन बंद आणि आंदोलन करणार असल्याचं टिकेत म्हणाले. यापूर्वी किसान संयुक्त मोर्चा (अराजकीय) देखील १३ फेब्रुवारी रोजी दिल्लीत आंदोलन पुकारलं आहे.  

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com