Nagpur News: सोयाबीनला किमान दर मिळावा म्हणून शासनाने हमीभाव जाहीर केला आहेत. मात्र ओलाव्याचे कारण समोर करीत केंद्रावर खरेदी करण्यास नकार दिला जात असल्याने शेतकऱ्यांना नाईलाजाने खुल्या बाजारात मिळेल त्या भावात सोयाबीन विकावे लागत असल्याचे चित्र आहे. सध्या सोयाबीनचे दर ३८०० ते ४२०० रूपयांवर स्थिरावले आहेत..जिल्ह्यात सोयाबीन खरेदीसाठी सात तालुक्यांत हमीभाव केंद्रे सुरू करण्यात आली आहेत. पणन विभागाकडून आवश्यक बारदाना व त्यासोबतच गैरप्रकार नियंत्रणासाठी क्यूआर कोडची उपलब्धता करून देण्यात आली आहे. शेतकऱ्यांनी हमीभावात शेतीमाल विक्रीसाठी नोंदणीही केली आहे. नोंदणी झालेल्या शेतकऱ्यांना मोबाईलवर संदेश पाठवून खरेदीस सुरुवात झाली आहे..Soybean MSP: धाराशिवमध्ये हमीभाव केंद्रांवर सोयाबीनची खरेदी संथगतीने.हा प्रकार काटोल आणि नरखेड येथील हमीभाव केंद्रांवर घडल्याचे सांगण्यात आले. बहुतेक शेतकऱ्यांच्या शेतीमालाबाबत हेच धोरण अवलंबण्यात आले आहे. परिणामी हमीभाव केंद्रांवर सोयाबीनची आवक होत नसल्याने एका आठवड्यापर्यंत खरेदी बंद करण्यात आली. पुढील आठवड्यापासून पुन्हा खरेदी करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. केंद्र सरकारने यंदाच्या हंगामासाठी सोयाबीनचा हमीभाव ५३२८ रुपये प्रति क्विंटल निश्चित केला आहे. मात्र प्रत्यक्षात खुल्या बाजारात ३३०० ते ४५०० रुपयेच दर मिळत आहे..‘नाफेड’च्या नियमांनुसार, १२ टक्क्यांपर्यंतचा ओलावा ग्राह्य धरला जातो. परंतु बहुतेक ठिकाणी शेतकऱ्यांचा माल १४ ते १६ टक्के ओलावा असल्याचे सांगत नाकारला जात आहे. परिणामी मिळेल त्या भावात शेतकऱ्यांना खुल्या बाजारात शेतीमाल विक्री करावा लागतो आहे. प्रति क्विंटल १ हजार ते दीड हजार रुपयांचा भुर्दंड सोसावा लागत आहे..Soybean MSP Procurement: सोयाबीन खेरदीची जिल्हानिहाय हेक्टरी मर्यादा किती?.पुढील आठवड्यापासून खरेदी नियमितहमीभाव केंद्रांना क्यूआर कोड, बारदाना उपलब्ध करून देण्यात आला आहे. जिल्ह्यात दोन केंद्रांवर नोंदणी झालेल्या शेतकऱ्यांना मोबाईलवर संदेश पाठवीत खरेदीस बोलाविले. मात्र ओलावा अधिक असल्याने हमी दरात खरेदी टाळण्यात आली. ओलाव्याचे कारण देत हमी दरात थांबविलेली खरेदी पुढील आठवड्यात १ डिसेंबरपासून नियमित सुरू करण्याच्या सूचना हमीकेंद्रांना दिल्याचे पणन विभागाच्या वतीने सांगण्यात आले आहे..११०४ शेतकऱ्यांनी केली नोंदणीजिल्ह्यात सात तालुक्यांत हमीभाव केंद्रे सुरू करण्यात आली आहेत. यात भिवापूर, कळमेश्वर, काटोल, उमरेड, नरखेड, रामटेक, सावनेर यांचा समावेश आहे. यापैकी काटोल आणि नरखेड या तालुक्यांत सर्वाधिक ५०७ आणि ३०२ शेतकऱ्यांनी सोयाबीन विक्रीसाठी नोंदणी केली. तर इतर पाच केंद्रावर ५० चा आकडाही ओलांडला गेलेला नाही. नोंदणी करणाऱ्या शेतकऱ्यांचा सातही तालुक्यांतला आकडा १ हजार १०४ वरच थबकला आहे..नॉन एफएक्यू प्रमाण १० टक्के करापरभणी ः शासकीय हमीभाव केंद्रावर सोयाबीन खरेदी करताना नॉन एफएक्यूचे (डॅमेज) प्रमाण १० टक्के ग्राह्य धरावे, अशी मागणी भाजपचे परभणी कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक विलास बाबर यांनी जिल्हा प्रशासनाकडे केली आहे. या वर्षी काढणीच्या वेळी पाऊस झाल्यामुळे सोयाबीनच्या दर्जावर परिणाम झाला आहे. यंदा नॉन एफएक्यू दर्जाच्या सोयाबीनची मर्यादा ५ टक्के वरून ३ टक्क्यांवर आणल्यामुळे ९० टक्के शेतकऱ्यांचे सोयाबीन शासकीय खरेदीच्या निकषात बसत नाही. या खरेदी केंद्राचा फायद्याऐवजी तोटाच शेतकऱ्यांना होत आहे. त्यामुळे डॅमेज (नॉन एफएक्यू) प्रमाण १० टक्के ग्राह्य धरुन सोयाबीन खरेदी करावी, अशी मागणी परभणी बाजार समितीचे संचालक विलास बाबर, डिगांबर सिरसाठ, गंगाधर सोगे, राजेभाऊ राठोड, विनायक सिरसाठ, डिगांबर वाघ या सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांनी केली आहे. .ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.