Amravati News: दिवाळीनंतर उघडलेल्या बाजार समितीत सोयाबीन आवक वाढत आहे. शनिवारी (ता २५) बाजार समितीत तब्बल १४ हजार क्विंटल पेक्षा अधिकची आवक नोंदविण्यात आली. त्यानंतर सोमवारी (ता २७) सोयाबीन आवक वीस हजार क्विंटलच्या पार गेली. पैशाची गरज असल्याने शेतकऱ्यांनी सोयाबीन विक्रीवर भर दिला असल्याचे चित्र आहे..खरीप हंगामातील पहिले व नगदी पीक असलेल्या सोयाबीनची पावसाने दाणादाण उडवली आहे. यंदा उत्पादनाची सरासरी कमी राहण्याचा अंदाज असून प्रति एकर दोन ते तीन क्विंटलची सरासरी सध्या शेतकऱ्यांना मिळत आहे..Soybean Market Rate: जाणून घ्या; आजचे कोबी, मेथी, सोयाबीन, लसूण आणि वांगीचे बाजारभाव .आर्थिक निकडीपायी शेतकऱ्यांनी बाजारात सोयाबीन आणले असून आर्द्रता व बारीक दाणा, अशा सबबीखाली खरेदीदारांनी भाव पाडले आहेत. शासकीय खरेदीचा घोळ सरकारदप्तरी सुटत नसल्याने खरेदी केंद्र सुरू होऊ शकलेली नाहीत. त्याचा पूर्ण लाभ खरेदीदारांनी खुल्या बाजारात घेतला आहे..दरम्यान शासनाने गुरुवार (ता. ३०) पासून हमीभावाने खरेदी करता नोंदणीची प्रक्रिया सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र शासकीय खरेदीला बराच विलंब लागणार असल्याने पैशाची निकड लक्षात घेता शेतकऱ्यांकडून खुले बाजारातच विक्रीवर भर दिला जात आहे. त्यामुळे येत्या काळात बाजारातील आवक आणखी वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. .Soybean Market: अहिल्यानगरला सोयाबीनला साडेतीन ते चार हजारांचा दर.१४ हजार ४८४ पोत्यांची आवकशनिवारी (ता.२५) येथील बाजार समितीत १४ हजार ४८४ सोयाबीन पोत्यांची आवक झाली. बाजार सुरू झाल्यानंतर झालेल्या लिलावात सोयाबीनला ३७५० ते ४२११ रुपये प्रतिक्विंटलचा दर मिळाला. सरासरी ३८५० रुपये दर शेतकऱ्यांना मिळाला आहे. दिवाळी होताच उघडलेल्या बाजार समितीत शुक्रवारी ३९८० रुपये दर होता, तो दुसऱ्याच दिवशी १३० रुपयांनी खाली आला..सोयाबीनमध्ये ओलाव्याचे प्रमाण अधिक आहे. त्याचप्रमाणे दाणा बारीक असून प्रतवारी घसरली आहे. सोयाबीनच्या दर्जानुसार भाव देण्यात येत असून यंदा कमी उत्पादन सरासरीमुळे सोयाबीनची आवक मंदावण्याची शक्यता आहे.-राजेश पाटील, खरेदीदार..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.