Cotton Soybean Rate : ‘शेतकऱ्यांच्या हातावर तुरी...’

Assembly Winter Session : कापूस, धान आणि सोयाबीनला भाव मिळावा, यासाठी रस्त्यावर उतरलो आहे. सरकारचे आयात-निर्यात धोरण शेतकऱ्याच्या मुळावर उठले आहे.
Winter Session
Winter Session Agrowon
Published on
Updated on

Nagpur News : कापूस, सोयाबीन आणि धानाला भाव मिळावा, यासाठी महाविकास आघाडीच्या आमदारांनी विधानभवनाच्या पायथ्याशी शुक्रवारी (ता. ८) धरणे देत सरकारविरुद्ध जोरदार घोषणाबाजी केली.

आंदोलनात विधानसभा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, विधान परिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, अशोक चव्हाण, अनिल देशमुख, नाना पटोले, अभिजित वंजारी, रवींद्र वायकर, सचिन अहीर आदींचा सहभाग होता.

Winter Session
Winter Session : पीक विमा योजनेतून फायदा कोणाला ? विजय वड्डेटीवार यांचा सरकारला सवाल

दानवे म्हणाले,‘‘कापूस, धान आणि सोयाबीनला भाव मिळावा, यासाठी रस्त्यावर उतरलो आहे. सरकारचे आयात-निर्यात धोरण शेतकऱ्याच्या मुळावर उठले आहे. दहा हजार कोटींच्या मदतीची घोषणा खोटी आहे.

Winter Session
Assembly Winter Session : केंद्राकडून शेतीमाल निर्यातीचे मार्ग बंद करण्याच्या धोरणावर राज्याची भूमिका काय ? जयंत पाटलांनी केली सरकारची कोंडी

सरकार फक्त आकडेवारी फेकते आहे. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री शहरालगतच्या शेतात गेले पण त्यातून काहीही साध्य झालेले नाही. ज्यावेळी जायचे होते तेव्हा ते तेलंगणाच्या निवडणुकीत प्रचार करण्यात व्यस्त होते. आम्ही सभागृहात कापूस, धान, सोयाबीनला भाव मिळावा यासाठी संघर्ष करू.’’

आंदोलनात कापसाच्या माळा घालून आमदारांनी ‘अवकाळी पावसाने शेतकरी त्रस्त, पंचनामे करणारे सरकार सुस्त,’ ‘अवकाळीने निघते शेतकऱ्यांचे दिवाळे, गद्दारांना लागले मंत्रिमंडळ विस्ताराचे डोहाळे,’ ‘शेतकऱ्यांच्या डोळ्यात अश्रूंचा सागर, सरकार देते नुसते गाजर,’ अशा लक्षवेधक घोषणा दिल्या.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com