Summer Sowing : उन्हाळी गळित धान्यांचा १४ हजार ९३३ हेक्टरवर पेरा

Summer Crop Update : परभणी -हिंगोली जिल्ह्यात यावर्षीच्या (२०२४) उन्हाळी हंगामात शुक्रवार (ता. २२) पर्यंत उन्हाळी गळितधान्यांची १४ हजार ९३३ हेक्टरवर पेरणी झाली आहे.
Summer Sowing
Summer SowingAgrowon
Published on
Updated on

Parbhani News : परभणी -हिंगोली जिल्ह्यात यावर्षीच्या (२०२४) उन्हाळी हंगामात शुक्रवार (ता. २२) पर्यंत उन्हाळी गळितधान्यांची १४ हजार ९३३ हेक्टरवर पेरणी झाली आहे. त्यात भुईमुगाचे सर्वाधिक म्हणजे १३ हजार २६ हेक्टर, सोयाबीन १ हजार ९२ हेक्टर या प्रमुख पिकांचा समावेश आहे. हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी, औंढानागनाथ, सेनगाव तालुक्यात भुईमुगाचा पेरा वाढला आहे. या दोन जिल्ह्यात उन्हाळी हंगामातील तृणधान्ये,कडधान्यांच्या क्षेत्रात मोठी घट झाली आहे.

परभणी जिल्ह्यात उन्हाळी हंगामातील पिकांचे सरासरी १० हजार ९५८ हेक्टर आहे.शुक्रवार (ता. २२) पर्यंत ४ हजार ८९५ हेक्टरवर (४४.६७ टक्के) पेरणी झाली आहे. गळीत धान्यांची ९ हजार ४८२ पैकी ४ हजार २३३ हेक्टरवर (४४.६४ टक्के) पेरणी झाली. त्यात भुईमुगाची ६ हजार ७९६ पैकी ३ हजार ९३ हेक्टर (४५.५१ टक्के), सोयाबीनची २ हजार ६६२ पैकी १ हजार १३४ हेक्टर (४२.५८ टक्के),

Summer Sowing
Summer Sowing : उन्हाळी पिकांच्या ६३ टक्के पेरण्या

तिळाची ११.२४ पैकी २ हेक्टर (१७.७९ टक्के) तर सुर्यफुलाची ४ हेक्टर (११.२४ टक्के पेरणी झाली आहे. कडधान्यांची ४९.०७ पैकी ५ हेक्टर (१०.१९ टक्के) पेरणी झाली आहे. त्यात मुगाची ३२.४ पैकी ५ हेक्टर (१५.४३ टक्के) पेरणी झाली आहे. तृणधान्यांची १ हजार ४२७ पैकी ६०५ हेक्टर (१६.६० टक्के) पेरणी झाली. त्यात मक्याची १ हजार ३७७ पैकी ४२५ हेक्टर (३०.८७ टक्के), बाजरीची ५०.२७ पैकी १३५ हेक्टर (२७०.३४ टक्के) पेरणी झाली आहे.

हिंगोली जिल्ह्यात उन्हाळी पिकांचे सरासरी क्षेत्र २६ हजार ३४८ हेक्टर आहे. शुक्रवार (ता.२२) पर्यंत ११ हजार ६७४ हेक्टरवर (४४.३० टक्के) पेरणी झाली आहे. गळीत धान्यांची १४ हजार ८५६ पैकी १० हजार ७०० हेक्टरवर (७२.७३ टक्के) पेरणी झाली. उन्हाळी भुईमुगाचे सरासरी क्षेत्र ६ हजार ४६३.९९ असतांना ९ हजार ९३२.८२ हेक्टर (१५३.६६टक्के) पेरणी झाली. सोयाबीनची ८ हजार ३९२ पैकी ७६८ हेक्टर (९.१५ टक्के)पेरणी झाली आहे.

Summer Sowing
Summer Sowing : उन्हाळी पिकांची १६ हजार हेक्टरवर पेरणी

कडधान्यांची ५ हजार ५३० पैकी ४३४ हेक्टर (७.८५ टक्के) पेरणी झाली. त्यात मुगाची १ हजार ९१२ पैकी २९१ हेक्टर (१५.२१ टक्के), उडदाची ३ हजार ५४८ पैकी १४३ हेक्टर (४.०३ टक्के) पेरणी झाली. तृणधान्यांची ५ हजार ९६२ पैकी ५३९ हेक्टरवर (४.३९ टक्के) पेरणी झाली. त्यात ज्वारीची १ हजार ९५ पैकी २८२ हेक्टर, मक्याची १ हजार २ पैकी २५७ हेक्टर पेरणी झाली आहे.

परभणी हिंगोली जिल्हा उन्हाळी भुईमूग पेरणी स्थिती (हेक्टरमध्ये)शुक्रवार(ता.२२)पर्यंत

तालुका सरासरी क्षेत्र पेरणी क्षेत्र टक्केवारी

परभणी २००० १३३ ६.६५

जिंतूर २३४१ १८५० ७९.०१

सेलू १०१ ७१ ६९.९५

मानवत ३८७ २३७ ६१.१८

पाथरी २०७ ९० ४३.४१

सोनपेठ १९८ ४७ २३.७६

गंगाखेड ४१७ ६५ १५.५८

पालम ६० ५५ ९१.१७

पूर्णा १०८२ ५४५ ५०३६

हिंगोली ७३५ ३५ ४.७६

कळमनुरी २३८ ३७० १५५.२५

वसमत ३६१८ १९७८ ५४.६८

औढानागनाथ ४६३ ५८०० १२५१.८१

सेनगाव १४०८ १७४९ १२४.१९

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com