Summer Sowing : उन्हाळी पिकांच्या ६३ टक्के पेरण्या

Summer Crop : गेल्या महिन्यापासून उन्हाळी हंगामातील पिकांच्या पेरण्या सुरू झाल्या आहेत. यंदा पाण्याची उपलब्धता बऱ्यापैकी कमी असल्याने पेरणीच्या क्षेत्रात काही प्रमाणात घट होण्याची शक्यता आहे.
Summer Sowing
Summer SowingAgrowon

Pune News : गेल्या महिन्यापासून उन्हाळी हंगामातील पिकांच्या पेरण्या सुरू झाल्या आहेत. यंदा पाण्याची उपलब्धता बऱ्यापैकी कमी असल्याने पेरणीच्या क्षेत्रात काही प्रमाणात घट होण्याची शक्यता आहे. पुणे विभागात आत्तापर्यंत सरासरी क्षेत्राच्या २७ हजार ६२५ हेक्टरपैकी १७ हजार ४११ हेक्टर म्हणजेच ६३ टक्के पेरण्या झाल्या आहेत. यात प्रामुख्याने उन्हाळी बाजरी, मका, भूईमूग या पिकांचा समावेश असल्याचे कृषी विभागाच्या सूत्रांनी सांगितले.

मागील काही वर्षापासून उन्हाळ्यात चाराटंचाईचा मोठा प्रश्न उद्भवत आहे. त्यामुळे शेतकरी मोठ्या प्रमाणात चारा पिकांच्या पेरणीकडे वळू लागले आहेत. परिणामी विभागात उन्हाळी पिकाच्या क्षेत्रात घट होत असल्याचे चित्र आहे. गेल्या वर्षी पाऊस कमी झाल्याने अनेक भागात पाणीपातळीत चांगलीच घट झाली आहे. त्याचा फटका उन्हाळी पेरण्यांना बसण्याचा अंदाज आहे.

Summer Sowing
Summer Soybean Sowing : उन्हाळी सोयाबीनची १०९५ हेक्टरवर पेरणी

उन्हाळी मक्याची ७६०८, बाजरी ५०१८, उन्हाळी मूग ११, भूईमूग ४४५६, सोयाबीन ७९ हेक्टरवर पेरणी झाली आहे. नगर जिल्ह्यात रब्बी हंगामातील ज्वारी पिकाचे दाणे परिपक्व झालेले असून काही भागात ६० टक्के क्षेत्रावरील पिकाची काढणी पूर्ण झाली आहे. गहू पीक परिपक्व झाले असून २५ टक्के क्षेत्रावरील पिकाची काढणी पूर्ण झाली आहे.

मका पिकाच्या कणसातील दाणे पक्वतेच्या अवस्थेत असून १५ टक्के क्षेत्रावरील पिकाची काढणी झाली आहे. हरभरा पीक घाटे परिपक्वतेच्या अवस्थेत असून ४० टक्के क्षेत्रांवरील काढणी झाली आहे. करडई पिकाचे बोंडे पक्वतेच्या अवस्थेत आहे. सूर्यफूल पिकाची फुले पक्वतेच्या अवस्थेत आहे. तीळ पीक पक्वतेच्या अवस्थेत आहे. उन्हाळी हंगामातील मका, बाजरी, भुईमूग व सोयाबीन पिकांची ६४९८ हेक्टर क्षेत्रावर पेरणी झालेली आहे.

Summer Sowing
Summer Sowing : उन्हाळी पिकांची १६ हजार हेक्टरवर पेरणी

पुणे जिल्‍ह्यात रब्बी हंगामातील ज्वारी पिकाची ९० टक्के क्षेत्रावरील काढणी पूर्ण झाली आहे. गहू पिकातील दाणे पक्वतेच्या अवस्थेत असून पिकाची काढणी सुरू आहे. मका पिकाची ९५ टक्के क्षेत्रावरील काढणी पूर्ण झाली आहे. हरभरा पिकाची ८० टक्के क्षेत्रावरील काढणी पूर्ण झाली आहे. उन्हाळी हंगामातील मका, ज्वारी व भुईमूग पिकांची ६२५४ हेक्टर क्षेत्रांवर पेरणी झाली आहे.

सोलापूर जिल्ह्यात रब्बी हंगामातील ज्वारी पिकाची ९० टक्के क्षेत्रावरील काढणी पूर्ण झाली आहे. मका पीक पक्वतेच्या अवस्थेत असून, पिकाची काढणी सुरू आहे. गहू व हरभरा पिकाची ९० टक्के क्षेत्रांवरील काढणी पूर्ण झाली आहे. उन्हाळी हंगामातील मका, बाजरी व भुईमूग पिकांची ४६५९ हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली आहे. उन्हाळी मका पीक वाढीच्या अवस्थेत आहे. भुईमूग पिकाची उगवण झाली असून पीक स्थिती चांगली आहे.

जिल्हानिहाय झालेली पेरण्या ः (हेक्टरमध्ये)

जिल्हा --- सरासरी क्षेत्र -- पेरणी झालेले क्षेत्र -- टक्के

नगर --- ८८८६ --- ६४९८ --- ७३

पुणे --- ११०९४ --- ६२५४ --- ५६

सोलापूर --- ७६४५ --- ४६५९ -- ६१

एकूण --- २७,६२५ --- १७४११ -- ६३

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com