Summer Sowing : उन्हाळी गळितधान्यांचा १६ हजार ७५० हेक्टरवर पेरा

Sowing Update : यंदाच्या (२०२४) उन्हाळी हंगामात शुक्रवार (ता. १२) पर्यंत गळितधान्यांची १६ हजार ७५० हेक्टरवर पेरणी झाली आहे.
Summer Sowing
Summer Sowing Agrowon
Published on
Updated on

Parbhani News : कृषी विभागाकडील माहितीनुसार परभणी -हिंगोली जिल्ह्यात यंदाच्या (२०२४) उन्हाळी हंगामात शुक्रवार (ता. १२) पर्यंत गळितधान्यांची १६ हजार ७५० हेक्टरवर पेरणी झाली आहे. त्यात भुईमूग, सोयाबीन, तीळ, सूर्यफूल या पिकांचे समावेश आहे. तृणधान्ये व कडधान्ये मिळून एकूण अन्नधान्यांची २ हजार ६३८ हेक्टरवर पेरणी झाली आहे. त्यात ज्वारी, बाजरी, मका, मूग उडदाचा समावेश आहे. आजवर या दोन जिल्ह्यात एकूण उन्हाळी पिकांची १९ हजार ३८९ हेक्टरवर पेरणी झाली आहे.

परभणी जिल्ह्यात उन्हाळी हंगामातील पिकांचे सरासरी १० हजार ९५८ हेक्टर आहे. शुक्रवार (ता. १२) पर्यंत ६ हजार ३३३ हेक्टरवर (५७.७९ टक्के) पेरणी झाली आहे. गळीत धान्यांची ९ हजार ४८२ पैकी ५ हजार २५५ हेक्टरवर (५५.४३ टक्के) पेरणी झाली. त्यात भुईमुगाची ६ हजार ७९६ पैकी ३ हजार ८८९हेक्टर (५७.२३ टक्के), सोयाबीनची २ हजार ६६२ पैकी १ हजार ३५० हेक्टर (५०.७२ टक्के),

Summer Sowing
Summer Crops : दोन हजार हेक्टरवर उन्हाळी पिके

तिळाची ११.२४ पैकी १०.७ हेक्टर (९५.२० टक्के) पेरणी झाली आहे. तृणधान्यांची १ हजार ४२७ पैकी १ हजार ५५ हेक्टर (७३.९२टक्के) पेरणी झाली. त्यात ज्वारीची ५९.५ हेक्टर, बाजरीची ५०.२७ पैकी २०१ हेक्टर, मक्याची १ हजार ३७७ पैकी ७९४ हेक्टर (५७.६७ टक्के) पेरणी झाली आहे. कडधान्यांची ४९.०७ पैकी ४ हेक्टर (८.१५ टक्के) पेरणी झाली आहे. त्यात मुगाची ३२.४ पैकी २२ हेक्टर (६७.९०टक्के) पेरणी झाली आहे. एकूण अन्नधान्यांची १ हजार ४७६ पैकी १ हजार ७७ हेक्टर (७२.९५) टक्के पेरणी झाली.

हिंगोली जिल्ह्यात उन्हाळी पिकांचे सरासरी क्षेत्र २६ हजार ३४८ हेक्टर आहे. शुक्रवार (ता. १२) पर्यंत १३ हजार ५६ हेक्टरवर (४९.५५ टक्के) पेरणी झाली आहे. गळीत धान्यांची १४ हजार ८५६ पैकी ११ हजार ४९५ हेक्टरवर (७७.३७ टक्के) पेरणी झाली. उन्हाळी भुईमुगाचे सरासरी क्षेत्र ६ हजार ४६३.९९ असतांना १० हजार ३३६ हेक्टर (१५९.९१ टक्के) पेरणी झाली.

Summer Sowing
Summer Crop Cultivation : उन्हाळी पिकांच्या लागवडीत मोठी वाढ

सोयाबीनची ८ हजार ३९२ पैकी १ हजार १४७ हेक्टर (१३.६७ टक्के)पेरणी झाली आहे. तृणधान्यांची ५ हजार ९६२ पैकी ८५२ हेक्टरवर (१४.२९ टक्के) पेरणी झाली. त्यात ज्वारीची १ हजार ९५ पैकी ४४८ हेक्टर (४०.९१ टक्के), मक्याची १ हजार २ पैकी ३७५ हेक्टर (३७.४३ टक्के) पेरणी झाली आहे. कडधान्यांची ५ हजार ५३० पैकी ७०९ हेक्टर (१२.८२ टक्के) पेरणी झाली. त्यात मुगाची १ हजार ९१२ पैकी ५४३ हेक्टर (२८.३९ टक्के), उडदाची ३ हजार ५४८ पैकी १४३ हेक्टर (४.०३ टक्के) पेरणी झाली. एकूण अन्नधान्यांची ११ हजार ४९२ पैकी १ हजार ५६१ हेक्टर पेरणी झाली.

परभणी-हिंगोली जिल्हा उन्हाळी गळितधान्ये पेरणी स्थिती (क्षेत्र हेक्टरमध्ये)

तालुका भुईमूग सोयाबीन

परभणी १७६ १५

जिंतूर १८५० ८११

सेलू १४१ ६४

मानवत २३७ ७४

पाथरी १३९ ११०

सोनपेठ ४७ ९

गंगाखेड ६५ ००

पालम ७० १५

पूर्णा ११६३ २५२

हिंगोली ४१९ १९७

कळमनुरी ३९० ३३५

वसमत १९७८ ००

औंढा नागनाथ ५८०० ५७०

सेनगाव १७४९ ४५

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com