Sugarcane FRP : ‘सोमेश्वर’चा शंभर रुपयांचा दुसरा हप्ता आज देणार

Sugarcane Season : श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या २०२३-२०२४ विक्रमी गळीत हंगामाची नुकतीच सांगता झाली आहे.
Sugarcane FRP Rate
Sugarcane FRP Rateagrowon

Pune News : श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या २०२३-२०२४ विक्रमी गळीत हंगामाची नुकतीच सांगता झाली आहे. दरम्यान, कारखाना १०० रुपये प्रतिटन प्रमाणे दुसरा हप्ता ऊस उत्पादकांच्या खात्यात आज (ता. ६) वर्ग करण्यात येणार असल्याचे कारखान्याचे अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप यांनी जाहीर केले.

कारखान्याने १७६ दिवसांमध्ये एकूण १५ लाख २३ हजार ८७६ टन उसाचे सर्वोच्च गाळप करून बी हेवीसह १२.२१ टक्के सरासरी साखर उतारा राखून १८ लाख २६ हजार ५०० क्विंटल साखरेचे उत्पादन झाले आहे.

Sugarcane FRP Rate
Sugarcane FRP : ‘एफआरपी’ थकविणारे कारखाने कारवाईच्या रडारवर

त्याचबरोबर कारखान्याच्या डिस्टीलरीमधून ८४ लाख ३१ हजार ४३८ लि. अल्कोहोल, ३१ लाख ८२ हजार ५५४ लि. इथेनॉलचे उत्पादन व को- जन प्रकल्पातून ९ कोटी ६५ लाख १५ हजार ३४५ युनिट्स विजेची निर्मिती होऊन ५ कोटी १४ लाख ४४ हजार ८३१ युनिटची विक्री झाली आहे. सध्या हे दोन्हीही प्रकल्प सुरू आहेत.

Sugarcane FRP Rate
Sugarcane FRP : पेच थकित ‘एफआरपी’चा!

राज्यातील ७ हजार ५०० टन प्रतिदिनी गाळप क्षमता असणाऱ्या कारखान्यांमध्ये सोमेश्वरचे सर्वोच्च गाळप व साखर उत्पादन झाले आहे. हंगाम कालावधीमध्ये प्रतिदिन सरासरी ८ हजार ६५८ टन गाळप करून स्थापित क्षमतेनुसार ११५ टक्के कार्यक्षमतेने २ लाख ३ हजार ८७६ टन जादाचे गाळप केले आहे. ऊस बिलापोटी प्रथम हप्ता ३ हजार रुपये प्रतिटन प्रमाणे १५ एप्रिलपर्यंत गळितास आलेल्या उसास अदा केला आहे.

‘‘अंतिम पंधरवड्याचे बिल ३ हजार अधिक २०० रुपये प्रमाणे अनुदान शनिवारी (ता. ४) बँक खात्यात जमा केले. जानेवारी, फेब्रुवारी, मार्च व एप्रिल, २०२४ साठी अनुक्रमे ७५, १००, १५० व २०० रुपये असे अनुदानही यापूर्वीच आदा केले आहे,’’ असे अध्यक्ष श्री. जगताप यांनी सांगितले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com