Interview on Problems of Agriculture and Farmers : ‘इनोव्हेशन’ सोडवू शकेल शेतकऱ्यांच्या समस्या

Interview With Simone Berg, Dr.Marko Grozdanovic, and Giridhar Ranuwa : इनोव्हेटिव्ह टेक्नॉलॉजी’द्वारेच शेती व शेतकऱ्यांच्या समस्यांची सोडवणूक शक्य असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले आहे. त्यांच्याशी साधलेल्या बातचितीचा हा सारांश.
Simone Berg, Dr.Marko Grozdanovic, and  Giridhar Ranuwa
Simone Berg, Dr.Marko Grozdanovic, and Giridhar Ranuwa Agrowon

This is a summary of the conversation with Senior Vice President of Asia-Pacific Simone Berg, Senior Vice President of Global Strategic Marketing Dr.Marko Grozdanovic and Business Director Giridhar Ranuwa :

जगभरातील शेतीपुढील कोणती आव्हाने आपल्याला दिसतात?

हवामान बदल हे सर्वांत मोठे आव्हान आहे. मॉन्सूनचा लहरीपणा, दुष्काळ, अतिवृष्टी, महापूर, उच्चांकी तापमान किंवा थंडी आदी संकटांचा सामना जगभरातील शेतकरी करीत आहेत. मजुरांची तुटवडा ही देखील जगभरातील सर्वांत मोठी समस्या आहे. भारत व दक्षिण पूर्व आशियात मध्यमवर्गीयांची संख्या वाढते आहे. जगाची लोकसंख्या सात अब्ज आहे. पुढील २५ ते ३० वर्षांत त्यात तीन अब्जांची भर पडण्याची शक्यता आहे. भारताच्या लोकसंख्येपेक्षाही ती दुपटीनेही अधिक असेल. येत्या काळात ७० टक्के ग्रामीण लोकसंख्या शहरी भागात राहण्यासाठी आलेली असेल. शहरे वेगाने विकसित होत आहेत. पूर्वी जिथे शेती होती तेथे घरे, कंपन्यांची कार्यालये होऊ लागली आहेत. भारताची स्थितीही वेगळी नाही. लोकसंख्या सुमारे १.४ अब्ज असून, पुढील दहा ते आठ वर्षांत त्यात १० कोटींची अजून भर पडेल. जगाच्या ६० टक्के लोकसंख्या आशिया पॅसिफिक प्रदेशात राहते. जगातील एकूण मध्यम वर्गापैकी दोन तृतीयांश मध्यमवर्ग हा २०३० पर्यंत आशिया पॅसिफिक भागातील असेल.

एकीकडे अन्नाची मागणी वाढते आहे. दुसरीकडे शेतीखालील जमीन मात्र कमी होत चालली आहे. त्यामुळे शेती, निसर्गाचे संवर्धन अत्यंत गरजेचे झाले आहे. अन्न उत्पादन, अन्नसुरक्षा टिकवणे अत्यंत गरजेचे झाले आहे. अन्नाची गुणवत्तादेखील महत्त्वाचा मुद्दा झाला आहे. विविध देशांकडून सुरक्षित अन्न, कीडनाशकांच्या वापरांबाबतचे नियम, निकषांबाबतच्या अटी, पूर्तता करण्याविषयी मागण्या वाढू लागल्या आहेत. एकूण विचार करता शेती हाच जगाचा पाया आहे. जी जमीन उपलब्ध राहिली आहे त्यातच उत्पादन घेण्याचे आव्हान आहे. पुढील पिढ्यांसाठी शेतीतून शाश्‍वती आणायची आहे.

Simone Berg, Dr.Marko Grozdanovic, and  Giridhar Ranuwa
Interview with Dr. Nandu Lad : सहकारी आरोग्य चळवळीसाठी जनरेटा हवा

आपण कोणते उपाय शोधता आहात?

सध्याच्या समस्यांवर ‘इनोव्हेशन’, आधुनिक तंत्रज्ञान हाच उपाय आहे. त्यावरच आम्ही भर दिला आहे. स्वसंशोधित कीटकनाशके, बुरशीनाशके, तणनाशके आदींमध्ये अग्रेसर आहोत. शिवाय विविध गुणधर्मांच्या पीकजाती, बियाणे विकसित करण्यासाठी जगभरात मोठी गुंतवणूक केली आहे. भारतात आमची मोठी भाजीपाला बियाणे कंपनी आहे. त्या सोबतीला डिजिटल क्षेत्रात मोठ्या गुंतवणुकीला महत्त्व दिले आहे. कमीतकमी स्त्रोतांमध्ये अधिकाधिक चांगले कार्य करायचे व अधिकाधिक शेतकऱ्यांपर्यंत पोचायचे तर तुमच्याकडे खूप मोठ्या प्रमाणात नवनिर्मिती (इन्हेन्शन) होणे गरजेचे आहे. तेवढ्याच प्रमाणात ‘डाटा’ही असणे महत्त्वाचे आहे. याच बाबींचा आधार घेऊनच शेतकऱ्यांना पुढे घेऊन जावे लागेल.

सेंद्रिय उत्पादनांकडे जगभरातील ग्राहकांचा कल आहे. आपला दृष्टिकोन काय आहे?

ग्राहकांच्या पसंतीचा आम्ही आदरच करतो. परंतु शेतकऱ्यांच्या सर्वांगीण समस्यांची सोडवणूक करायची असेल किंवा सध्याच्या आव्हानांचा सामना करायचा तर आवश्‍यक त्या सर्व तंत्रज्ञानांचा वापर आम्हाला अधिक महत्त्वाचा वाटतो. उदाहरण द्यायचे तर पिकाचे २० ते ४० टक्के नुकसान किडी-रोगांमुळे होते. पण केवळ सेंद्रिय तंत्रज्ञानाचा अवलंब असेल तर नुकसानीची तीव्रता दुपटीने अधिकही असू शकते. ‘होलिस्टिक ॲप्रोच अधिक गरजेचा आहे.

जैविक उत्पादनांबाबत आपली भूमिका काय आहे?

केवळ रासायनिक उत्पादनापुरते आम्ही मर्यादित नाही. तर जैविक कीटकनाशके, बुरशीनाशके आदींच्या संशोधनात आधीपासून आहोत. त्यादृष्टीने विस्तार, गुंतवणूक, आवश्‍यक भागीदारीही केली आहे. आमच्याकडे सर्वोत्तम जैविक उत्पादने आहेत. मात्र परिणामकारकता व प्रभाव दिसण्याच्या दृष्टीने उत्पादनांवर अजून काम करण्याची गरज भासते आहे. किंमत हा महत्त्वाचा मुद्दा आहे. अशी उत्पादने शेतकऱ्यांना परवडण्यायोग्य करण्याचा आमचा प्रयत्न आहे. यंदाच्या वर्षी भारतीय शेतकऱ्यांसाठी जैव उत्तेजक (बायोस्टिम्युलंट) आणण्याचा विचार आहे. कोणत्याच एका गोष्टीवर अवलंबून न राहता सामाईक, एकात्मिक तंत्रज्ञान देणे हे आमचे तत्त्वज्ञान आहे.

Simone Berg, Dr.Marko Grozdanovic, and  Giridhar Ranuwa
Interview with Vikas Patil : शेतकऱ्यांनी केवळ युरियाचा आग्रह धरू नये

कृषी रसायने उद्योगात नवे ‘ट्रेंड्‍स’ काय आहेत?

कृषी रसायनांमध्ये आता नवी ‘केमिस्ट्री’ आली आहे. त्या आधारे मागील सहा वर्षांत नऊ, तर तीन वर्षांत सहा उत्पादने आम्ही बाजारपेठेत सादर केली. ‘इनोव्हेशन’ ही आमची ताकद आहे. दीडशे वर्षांहून अधिक काळ कंपनीचे जगात अस्तित्व यामुळेच आहे. एकाचवेळी अधिक किडींचे (मल्टिपल पेस्ट) नियंत्रण करेल, नियंत्रणाची पद्धत जलद (फास्ट ॲक्शन) असेल, परिणामही पिकांवर जास्त काळ राहील आणि मित्रकीटक व मधमाश्‍या यांच्यासाठी सुरक्षित असेल असे सर्व दृष्टिकोन ठेवून आम्ही नवे कीटकनाशक विकसित केले आहे. कोणतेही नवे रसायन बाजारात आणताना किडींमध्ये प्रतिकारक्षमता विकसित होऊन ते मागे पडू नये याची अधिक दक्षता घ्यावी लागते. कीटकांच्या ५८६ प्रजातींमध्ये ३२५ कीटकनाशके व पाच रासायनिक गटांप्रति प्रतिकारक्षमता आल्याची नोंद आहे. म्हणूनच भारतीय बाजारपेठेत आम्ही नुकतेच सादर केलेले कीटकनाशक एकमेवाद्वितीय अशा आयरॅक रासायनिक गटातील आहे. सध्या दुसरे कोणतेच रसायन या गटात उपलब्ध नाही. अशा संशोधनामुळे किडींमध्ये प्रतिकारक्षमता विकसित होण्याचा धोका कमी राहतो.

कोणत्या किडी जास्त महत्त्वाच्या वाटतात?

जगभरात बोलायचे तर पिकांचे कीटकांमुळे सुमारे ३० टक्के, प्रत्येकी १३ टक्के नुकसान रोग व तणांमुळे होते. तर १६ टक्के नुकसान काढणीपूर्व, तर १० टक्के नुकसान काढणीनंतरच्या काळात होते. भारत हा समशीतोष्ण प्रदेशातील देश आहे. अशा हवामानात कीटकांचा प्रादुर्भाव जास्त राहतो. त्यामुळे भारतीय बाजारपेठेत कीटकनाशके जास्त प्रमाणात आढळून येतात. जागतिक स्तरावर भारत हा कापूस उत्पादनात पहिल्या क्रमांकावर आहे. जगातील २३ टक्के कापूस भारतात होतो. भाजीपाला उत्पादनातही भारत जगात दुसऱ्या क्रमांकावर आहे. या दोन्ही पिकांमध्ये ३० टक्क्यांपर्यंतचे नुकसान मावा, तुडतुडे, पांढरी माशी आदी रसशोषक किडींमुळे होते. या दोन्ही पिकांत वापरल्या जाणाऱ्या एकूण कीटकनाशकांपैकी ४७ टक्के कीटकनाशके केवळ या तीन रसशोषक किडींसाठी वापरली जातात. यात मावा १३ टक्के, पांढरी माशी २३ टक्के व तुडतुडा ११ टक्के असे प्रमाण आहे. अन्य पिकांतही रसशोषक किडींचे महत्त्व लक्षात घेऊन त्यानुसार ‘लेबल क्लेम’ घेण्याचे प्रयत्न सुरू आहेत. अळीवर्गीय किटकांवरही आमचे लक्ष असून त्यादृष्टीनेही शेतकऱ्यांसाठी रसायने उपलब्ध केली आहेत.

भारताकडे आपण कसे पाहता?

भारत हा जगातील दुसऱ्या क्रमांकाची शेतीयोग्य किंवा पिकाऊ जमीन असलेला देश आहे. तर जगातील पाचव्या क्रमांकाची त्याची अर्थव्यवस्था आहे. देशाची ही मोठी क्षमता व शेतकऱ्यांच्या गरजा यांची आम्हाला जाणीव आहे. त्यादृष्टीने मागील पाच-सहा वर्षांच्या कालावधीत कंपनी समुहाने ३०० दशलक्ष युरोपेक्षा (पंचवीस ते सत्तावीसशे कोटी) अधिक मोठी गुंतवणूक भारतात संशोधन आणि निर्मिती क्षेत्रात केली आहे. मुंबईत आम्ही ‘इनोव्हेशन कॅंपस’ उभारले आहे. तर भारतीय हवामान, माती यांचा विचार करून पुणे हे ठिकाण निवडून तेथे जागतिक संशोधन केंद्र उभारले आहे. येथे केवळ भारतासाठीच नव्हे तर जगभरासाठी संशोधन केले जात आहे. पीकवाणांच्या तसेच अमेरिका, जर्मनी आदी देशांत विकसित होणाऱ्या उत्पादनांच्या चाचण्या येथे होत आहेत.

शेतकऱ्यांच्या आरोग्याची काळजी कशी घेत आहात?

व्यवसाय करणे ही वेगळी गोष्ट आहे. पण शेतकरी ग्राहकाच्या आरोग्याच्या सुरक्षिततेची काळजी तुम्ही कशी घेता हे त्याहून महत्त्वाचे असते. त्यासाठी कीडनाशकांचा समंजस वापर करण्याविषयी नऊ सूत्रे असलेला ‘सुरक्षा मिशन’ कार्यक्रम आम्ही राबवितो. यात कीडनाशक खरेदी करण्यापासून ते हाताळणी, मिश्रण करणे, फवारणी, संरक्षक पोशाख स्वच्छता अशा विविध मुद्यांवर आम्ही प्रशिक्षण देतो. मागील वर्षी त्याअंतर्गत देशातील पाच लाखांहून अधिक प्रत्यक्ष तर डिजिटल तंत्रज्ञानाच्या माध्यमातून ८० लाख शेतकऱ्यांना प्रशिक्षित केले. मजूर, महिला आणि आता तर शाळांमध्ये जाऊन विद्यार्थ्यांनाही या सुरक्षिततेविषयी परिचय करून देण्यास सुरवात केली आहे. शालेय पिढी अतिशय महत्त्वाची आहे. कारण ही मुले जेव्हा घरी जातात व आपल्या आईवडिलांना आरोग्याची काळजी घेण्याविषयी सांगतात त्यावेळी या विषयाचे वजन अजून वाढलेले असते. यापुढे जाऊन आम्ही डॉक्टर व्यक्तींनाही प्रशिक्षित करण्यास सुरवात केली आहे. काही वेळा अपघाताने एखाद्या कीडनाशकाची विषबाधा होते. बाजारपेठेत विविध कीडनाशके उपलब्ध असतात. अशावेळी प्रथमोपचार तसेच लक्षणांनुसार उपचार कसे केले पाहिजेत याविषयी आम्ही त्यांना योग्यरीत्या मार्गदर्शन करीत असतो.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com